मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
तेलबिया पिके
नियंत्रण करडईवरील रोग, किडीचे...
सतत पडणारा पाऊस, ढगाळ हवामान आणि हवेतील वाढलेले आर्द्रतेचे प्रमाण (८० टक्क्यांच्या वर) यामुळे करडईवर पानांवरील ठिपके, मर/मूळकुज या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हवेतील आर्द्रता ८० टक्क्यांपेक्षा अधिक जास्त काळ टिकून राहिल्यास पानांवरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
सतत पडणारा पाऊस, ढगाळ हवामान आणि हवेतील वाढलेले आर्द्रतेचे प्रमाण (८० टक्क्यांच्या वर) यामुळे करडईवर पानांवरील ठिपके, मर/मूळकुज या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हवेतील आर्द्रता ८० टक्क्यांपेक्षा अधिक जास्त काळ टिकून राहिल्यास पानांवरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
पानांवरील ठिपके रोगः
लक्षणे:
१) पानांवर ‘अल्टरनेरिया’या बुरशीमुळे करपा/ पानावरील ठिपके हा रोग दिसून येतो.
२) प्रथम पानांवर गोलाकार व फिकट किंवा गडद तपकिरी ठिपके दिसून येतात. ठिपक्यांच्या मध्याभोवती वर्तुळाकार वलये दिसतात.
३) पोषक हवामानात (आर्द्रतामय) हे ठिपके आकाराने मोठे होतात. एकाच पानावरील ठिपके एकत्र जुळल्यामुळे संपूर्ण पान करपल्यासारखे दिसते.
नियंत्रण:
१) कार्बेन्डाझिम अधिक मॅंन्कोझेब संयुक्त बुरशीनाशक २ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
मर रोग
लक्षणे:
१) ‘फ्युजेरियम’ बुरशीमुळे होतो. प्रसार जमिनीतून होते.
२) वाढीच्या कोणत्याही अवस्थेत दिसून येतो. रोपे प्रथम वाळतात व नंतर मरतात.
३) फुलोऱ्याच्या अवस्थेतील झाडे पूर्णपणे मरतात किंवा काही वेळेस एकाच झाडाचा अर्धा भाग वाळतो आणि दुसरा अर्धा भाग हिरवा राहतो.
४) मरग्रस्त झाडांची मुळी उभी कापून पाहिली असता मध्य भागातील गाभा बुरशीची वाढ झालेली असल्यामुळे तपकिरी दिसतो.
मूळकुज रोग
लक्षणे ः
१) ‘मॅक्रोफोमिना’ बुरशीमुळे हा रोग होतो. रोपावस्थेत तसेच पुढील वाढीच्या अवस्थेत हा रोग दिसून येतो.
२) प्रादुर्भावीत रोपाचे जमिनीलगतचे खोड काळपट दिसते. रोपांच्या मुळ्यांवर बारीक काळपट बुरशीची अवस्था दिसते.
मर/मूळकूज नियंत्रणः
१) कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कीड नियंत्रण:
पाने खाणारी अळीः
१) ढगाळ हवामानामुळे रोपावस्थेत किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
नियंत्रण ः
क्लोरपायरीफॉस अधिक सायपरमेथ्रिन संयुक्त कीटकनाशक २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संपर्क ः डॉ. डी. आर. मुरूमकर, ९८२२२९२२१८
(अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर)
- 1 of 4
- ››