agriculture stories in marathi, pest management in Okra | Agrowon

भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. भैयासाहेब गायकवाड, डॉ. हनुमान गरुड
गुरुवार, 19 मार्च 2020

भेंडी पिकाचे उत्पादन कमी येण्यामागे विविध किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. सध्या शेंडे व फळ पोखरणारी अळी, तुडतुडे, मावा, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे. या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

फळ पोखरणारी अळी 
अळी विविध रंगाची असून शरीराच्या दोन्ही बाजूने गडद पट्टा असतो आणि शरीरावर तुरळक केस असतात. अळी फळांना अनियमित आकाराची मोठी छिद्रे पाडून आतील भाग खाते. अनेकवेळा तिचे अर्धे शरीर आत व अर्धे शरीर बाहेर असते. 

शेंडे व फळ पोखरणारी अळी

भेंडी पिकाचे उत्पादन कमी येण्यामागे विविध किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. सध्या शेंडे व फळ पोखरणारी अळी, तुडतुडे, मावा, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे. या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

फळ पोखरणारी अळी 
अळी विविध रंगाची असून शरीराच्या दोन्ही बाजूने गडद पट्टा असतो आणि शरीरावर तुरळक केस असतात. अळी फळांना अनियमित आकाराची मोठी छिद्रे पाडून आतील भाग खाते. अनेकवेळा तिचे अर्धे शरीर आत व अर्धे शरीर बाहेर असते. 

शेंडे व फळ पोखरणारी अळी

 • ही कीड वर्षभर कार्यक्षम असली तरी जास्त आर्द्रता व जास्त उष्णतामान या किडीला पोषक असते. म्हणून उन्हाळ्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. 
 • अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर या किडीची अळी सुरुवातीच्या काळात कोवळ्या शेंड्यामध्ये पोखरून आत भुयार तयार करते. प्रादुर्भावग्रस्त पोंगा मलूल होतो, खालच्या दिशेने लोंबतो व नंतर वाळतो. 
 • झाडाला कळ्या येण्यास सुरुवात झाल्यावर हीच अळी पुढे कळ्या, फुले व फळे ह्यामध्ये शिरून त्यातील पेशी खाते. ते एका कळीवरून दुसऱ्या कळीवर या प्रमाणे नुकसान करत जातात. एक अळी अनेक कळ्या, फुले व फळांचे नुकसान करू शकते. पोखरलेल्या कळ्या व फुले वाळतात आणि खाली पडतात. प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात. फळांची वाढ होत नाही. अशी फळे विकण्यायोग्य राहत नाहीत. 

तुडतुडे

 •  ही भेंडीवरील प्रमुख कीड आहे. 
 • या कीडीची अंडी निमुळत्या आकाराची लांबट आणि फिकट पिवळसर रंगाची असतात. 
 • पिल्ले पांढुरके फिक्कट हिरवट असून तिरपी चालतात. 
 • पूर्ण वाढ झालेले तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व सुमारे २ मि.मी. लांबीचे फिक्कट हिरवट रंगाचे, समोरील पंखावरील वरच्या भागात एक एक काळा ठिपका असतो. 
 • हिवाळ्यात प्रौढ काही अंशी फिक्कट लालसर दिसतात. 
 • या किडीचे पिल्ले व प्रौढ सहसा पानाच्या खालच्या पृष्ठभागावर राहून पेशीमधील रस शोषण करतात.
 • प्रादुर्भावग्रस्त पाने पिवळसर आणि चुरडल्यासारखी वाटतात. 
 • प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना पाने विटकरी लाल रंगाचे कडक आणि चुरडल्यासारखे दिसतात. 
 • ढगाळ वातावरणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. 

पांढरी माशी 

 • या किडीचे पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात. 
 • जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडतात. 
 • प्रौढ कीटकांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या गोड चिकट द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते. झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर बाधा येते. परिणामी झाडाची वाढ खुंटते. उत्पन्नावर परिणाम होतो. याशिवाय ही कीड विषाणू रोगाचा प्रसार करते.

मावा

 • भेंडीच्या पाने व कोवळ्या भागातून रस शोषते. 
 • या किडीच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या मधासारख्या गोड व चिकट पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होते. झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो. 
 • ही कीड विषाणू रोगाचा प्रसार करते. 

एकात्मिक व्यवस्थापन 

 1. उन्हाळ्यामध्ये खोलवर नांगरणी करावी, त्यामुळे जमिनीतील किडीच्या सुप्त अवस्था उन्हामुळे व पक्ष्यांनी खाल्यामुळे नष्ट होतील.
 2.  कीडग्रस्त भेंडी तोडून नष्ट करावी. 
 3. पिकाची फेरपालट करावी.
 4. पक्षांना बसण्यासाठी एकरी १० पक्षी थांबे शेतात लावावेत. 
 5. शेंडे व फळ पोखरणारी अळीचे सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे शेतामध्ये प्रती हेक्टरी ५ या प्रमाणात लावावे.
 6.  कीटकनाशकाचा अनावश्यक वापर टाळावा. त्यामुळे परभक्षी कीटक जसे ढाल, किडा, क्रोयसोपा, सिरफीड माशी, भक्षक ढेकून इ. व परोपजीवी कीटक उदा. ट्रायकोग्रामा, ब्रॅकॉन यांचे संरक्षण होईल. हे मित्रकीटक हानिकारक किडीचे नैसर्गिक नियंत्रणास मदत करतात. 
 7. शेंडे व फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी, 
  एचएनपीव्ही (१० एलई) प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
 8. निंबोळी अर्क (५ टक्के ) किंवा ॲझाडिरेक्टिन ३०० पीपीएम ५ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
 9.  किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. 
 10. रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस.सी.) ०.२५ मि.ली.
 11. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे १० ते १२ प्रती हेक्टर लावावेत.
 12. पांढरी माशी, मावा आणि तुडतुड्यासाठी फवारणी प्रति लीटर पाणी    थायामिथोक्झाम (२५ डब्ल्युजी) ०.४ ग्रॅम किंवा ॲसीटामीप्रीड (२० एसपी) ०.१५ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१८.५ एससी) ०.२५ मिली.

 ः डॉ. भैयासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८
(विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) 


इतर फळभाज्या
कोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी...बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने...
सुधारित भेंडी लागवड फायद्याचीभें डीचे उगमस्थान आफ्रिकेमध्ये आहे. भारतात...
कोबीवरील कीड व्यवस्थापनकोबी व फुलकोबी ही थंड हवामानातील पिके असून,...
तंत्र कारले लागवडीचे...साधारण कारल्याच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या...
निर्यातक्षम भेंडीतील रासायनिक कीडनाशके भेंडी पिकाची उत्पादकता कमी असण्याचे मुख्य कारण...
निर्यातक्षम भेंडी उत्पादनासाठी कीड...निर्यातक्षम भेंडीची गुणवत्ता व उत्पादकता कायम...
वेलवर्गीय काशीफळ लागवड फायदेशीरकाशीफळ हे वेलवर्गीय पीक उत्पादन खर्च आणि लागवड...
भेंडीवर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भावभेंडी पिकावरील फळ पोखरणाऱ्या अळीमुळे ३० ते ४०...
भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक...वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
फ्लॉवर पिकातील विकृतीची लक्षणेव्हीप टेल  या विकृतीमध्ये फुलकोबीच्या...
भाजीपाला रोपवाटिका करताना घ्यावयाची...भाजीपाला पिकांची रोपवाटिका ही अत्यंत महत्त्वाची...
उन्हाळी हंगामात शेवगा पिकाचे छाटणी...शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असून, शेवगा...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे उत्पादन कमी येण्यामागे विविध किडींचा...
बटाटा साठवणुकीच्या पद्धतीबटाटा पिकाची अयोग्य काढणी आणि साठवणुकीत योग्य...
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात...
भेंडी पिकावरील किडींचे नियंत्रण भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख आणि...
खरीप कांद्यावरील रोगांचे नियंत्रण खरीप हंगामात कांदा पिकावर प्रामुख्याने करपा व मर...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...