agriculture stories in Marathi Pests on Turmeric crop | Agrowon

ओळखा हळदीवरील किडींचा प्रादुर्भाव...

डॉ. मनोज माळी, डॉ. रविंद्र जाधव
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

सध्या हळद पीक फुटवे आणि गड्डे तयार होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. पावसाळी हंगामात हळदीच्या खोड आणि फुटव्यांची भरपूर वाढ होते. या काळात पिकावर  किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे गड्ड्यांची संख्या आणि आकारावर अनिष्ट परिणाम होतो. हे लक्षात घेऊन नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

सध्या हळद पीक फुटवे आणि गड्डे तयार होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. पावसाळी हंगामात हळदीच्या खोड आणि फुटव्यांची भरपूर वाढ होते. या काळात पिकावर  किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे गड्ड्यांची संख्या आणि आकारावर अनिष्ट परिणाम होतो. हे लक्षात घेऊन नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

कंदमाशी 

 • ही माशी डासासारखी पण आकाराने मोठी, पाय शरिरापेक्षा लांब व काळसर रंगाची असते. पंख पातळ, पारदर्शक आणि राखाडी रंगाचे असून त्यावर दोन पांढरे ठिपके असतात.
 • कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ किंवा उघड्या कंदावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या उपजिवीकेसाठी कंदामध्ये शिरतात. 
 • प्रादुर्भावीत जागी रोगकारक बुरशी आणि सुत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊन कंद मऊ होतात. पाणी सुटून ते कुजू लागतात.
 • लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक अनुकूल असतो. 
 • ऑक्टोबर ते पीक काढणीपर्यंत नुकसान करते.

नियंत्रण ः (फवारणी प्रति लिटर पाणी)

 • क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मिलि किंवा 
 • डायमेथोएट (३०% प्रवाही ) १ मिलि 
 • दर १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.
 • माती किंवा प्लास्टिकच्या पसरट भांड्यात १.५ लिटर पाण्यामध्ये  २०० ग्रॅम एरंडी बी घ्यावे. या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट घाण वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन मरतात. हेक्टरी ६ भांडी वापरावीत. उघडे पडलेले कंद मातीने झाकावेत. 
 • शिफारशीत वेळेमध्ये हळदीची भरणी करावी.(ॲग्रेस्को शिफारस)
   

खोडकिडा 

 • पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असतो. दोन्ही पंखावर काळ्या रंगांचे ठिपके असतात.  अळ्या पानांच्या कडेचे हरीतद्रव्य खातात. अळी लालसर रंगाची असून अंगभर काळे ठिपके असतात. अळी खोड व कंद पोखरून छिद्र करुन आत शिरते. आतील भाग खाऊन टाकते. 
 • खोडावर पडलेले छिद्र हे खोडामध्ये अळी जिवंत असल्याचे लक्षण आहे. पिकाच्या मध्य भागातील पान पिवळे पडते. खोड वाळायला सुरुवात होते. 

नियंत्रण ः (फवारणी प्रति लिटर पाणी)

 • निंबोळी तेल ५ मिलि
 • एकरी १ या प्रमाणात प्रकाश सापळे वापरावेत. रात्री ७ ते १० या वेळेत सापळे चालू ठेवावेत. सापळ्यामध्ये आकर्षित झालेले प्रौढ पतंग नष्ट करावे. कीडग्रस्त झाडे उपटून लगेच नष्ट करावीत.
 • लागवडीनंतर ४० ते ९० दिवसांच्या अंतराने घाणेरी या वनस्पतीच्या पानांचे एकरी २ टन या प्रमाणात आच्छादन करावे.
 • प्रादुर्भाव जास्त झाल्यास, 
 • क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि  १५ दिवसांच्या अंतराने फवारावे. नैसर्गिकरीत्या मित्र किडींद्वारे खोडकिडीचे नियंत्रण होते. त्यासाठी मित्रकिडींचे निरिक्षण केल्यानंतरच रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी.(ॲग्रेस्को शिफारस)
   

पाने गुंडाळणारी अळी 

 • किडीचा प्रादुर्भाव  नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसतो. 
 • प्रौढ पतंग मध्यम आकाराचा असून पंखावर काळसर तपकिरी रंग असतो. पंखावर पांढऱ्या रंगाचा मोठा ठिपका असतो. पूर्ण  वाढलेली अळी हिरव्या रंगाची असते.
 • अळ्या पाने गुंडाळून आत राहून पाने खातात. पूर्ण वाढलेली अळी पानाच्या गुंडाळीतच कोषावस्थेत जाते. 
 • नियंत्रण ः (फवारणी प्रति लिटर पाणी)
 • क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि
 • प्रादुर्भाव दिसताच, पानांवरील अळ्या व कोष वेचून नष्ट करावेत.
 • अळीने गुंडाळलेली पाने तोडून अळीसह नष्ट करावीत.(ॲग्रेस्को शिफारस)

पाने खाणारी अळी 

 • पाने सुरळी किंवा पोंगा अवस्थेत असताना, अळी पानावर उपजिवीका करते.
 • अळी पाने खाऊन सुरळीमध्ये छिद्र करते. सुरळीतील पान पूर्णपणे उलगडल्यानंतर त्यावर सरळ रेषेमध्ये छिद्र आढळून येते.
 • नियंत्रण ः (फवारणी प्रतिलिटर पाणी)
 • गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावेत.
 • डायमिथोएट (३०% प्रवाही) १ मिलि किंवा 
 • क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मिलि(ॲग्रेस्को शिफारस)

हुमणी 

 • नवीन वाढ होत असलेल्या कंदावर आणि मुळांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
 • अळी पांढऱ्या रंगाची आणि इंग्रजी C आकाराची असते. 
 • अळ्या सुरवातीच्या काळात सेंद्रिय पदार्थ शेणखत) वर उपजिविका करतात. नंतर हळद पिकाची मुळे कुरडतात. त्यामुळे पीक पिवळे पडून वाळते.
 • जास्त प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी कंदही कुरडतात. 
 • प्रादुर्भाव झालेल्या शेतातील पीक सहज उपटून येते. 

एकात्मिक व्यवस्थापन 

 • किडीच्या नियंत्रणासाठी एकत्रित मोहिम राबवून एकात्मिक कीड व्यवस्थापन फायद्याचे ठरते.
 • संध्याकाळच्या वेळी किडीचे बाहेर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावेत.
 • नियंत्रण ः
 • मेटॅरायझिम ॲनसोप्ली (परोपजीवी बुरशी) हेक्टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी. 
 • क्लोरपायरीफॉस ४ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.(ॲग्रेस्को शिफारस)
   

सूत्रकृमी 

 • सूत्रकृमी पिकाच्या मुळांवर गाठी तयार करतात. जमिनीत मुळांभोवती राहून मुळातील रस शोषून घेतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, फुटव्यांचे प्रमाण कमी होते. 
 • सुरवातीला पिकाचा शेंडा मलून होतो. पीक पिवळे पडून झाड मरते. 
 • कालांतराने कीड कंदामध्ये प्रवेश करून कंद सडविते. सडलेले कंद तपकिरी रंगाचे दिसतात. 
 • किडीने केलेल्या जखमांतून रोगकारक बुरशी कंदात शिरते. त्यामुळे कंदकूज होते.

नियंत्रण 

 • ट्रायकोडर्मा प्लस पावडर (जैविक बुरशीनाशक) २ किलो प्रति एकरी २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावी. किंवा
 • भरणी करतेवेळी एकरी ८ क्विंटल निंबोळी पेंड वापरावी.
 • हळद पिकांत झेंडूची सापळा पीक म्हणून लागवड करावी.
 • पुढील वर्षी लागवडीपूर्वी प्रादुर्भावग्रस्त जमिनीची खोल नांगरट करावी. आणि जमीन किमान ३० दिवसांपर्यंत कडक ऊन्हात तापू द्यावी.(ॲग्रेस्को शिफारस)
   

 ः डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४,
डॉ. रविंद्र जाधव, ९७६४२ ३४६३४, 

(हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज,जि. सांगली)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर मसाला पिके
व्यवस्थापन हळद पिकाचेसध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१०...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
आले पिकावरील कंदमाशीचे व्यवस्थापनआले पिकामध्ये कंदमाशी, खवले कीड, खोडकिडा, फुलकिडे...
ओळखा हळदीवरील किडींचा प्रादुर्भाव...सध्या हळद पीक फुटवे आणि गड्डे तयार होण्याच्या...
व्यवस्थापन मसाला पिकांचेनारळ, सुपारी बागेत अतिशय चांगल्या प्रकारे मसाला...
हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या अन्...सध्या काही भागात हळदीची पाने पिवळे पडण्याची...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
हळदीला द्या शिफारशीत खतमात्रापावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी...
तंत्र कारळा लागवडीचे...कारळ्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते...
काळीमिरीची लागवड मिरी लागवडीसाठी आधाराच्या झाडांपासून किमान ४५ सें...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
कढीपत्त्याची व्यावसायिक लागवड फायदेशीरकढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे....
काळी मिरी काढणी तंत्रज्ञानविविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला...
योग्य परिपक्वतेला करा पिकांची काढणीपिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करण्यासाठी...
हळदीची पॉलिशिंग, प्रतवारी करणे...हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने...
व्यवस्थापन दालचिनीचे...वाढीच्या टप्यात असलेल्या दालचिनी कलमांना आधार...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...
दालचिनीची वेळेवर काढणी महत्त्वाचीदालचिनी झाडाची साल ही मसाल्यात दालचिनी म्हणून...