agriculture stories in Marathi pheromone trap for white grub in ground nut | Agrowon

हुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध सापळ्यांची निर्मिती

वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

बंगळूर येथील राष्ट्रीय कृषी कीटक स्रोत ब्युरो आणि दुर्गापूर (राजस्थान) येथील अखिल भारतीय मृदा संधिपाद किडीवरील प्रकल्प यांनी एकत्रितरीत्या हुमणीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळा विकसित केला आहे.

भारतीय कृषी संशोधन  संस्थेच्या बंगळूर येथील राष्ट्रीय कृषी कीटक स्रोत ब्युरो आणि दुर्गापूर (राजस्थान) येथील अखिल भारतीय मृदा संधिपाद किडीवरील प्रकल्प यांनी एकत्रितरीत्या हुमणीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळा विकसित केला आहे. हुमणी (शा. नाव - Holotrichia consanguinea) किडीचे भुंगेरे आकर्षित करण्यासाठी सावकाश उत्सर्जित होणाऱ्या गंधाची निर्मिती केली आहे. सावकाश उत्सर्जनासाठी त्यांनी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या प्रक्षेत्र चाचण्या दुर्गापूर, जयपूर, मौलासार (नागौर) येथील कृषी विज्ञान केंद्र, जोधपूर येथे घेण्यात आल्या. 

भुईमूग (शा. नाव -Arachis hypogaea L.) हे महत्त्वाचे तेलबिया आणि पूरक अन्नखाद्य पीक आहे. या पिकांमध्ये लागवडीपासून साठवणीपर्यंत १०० पेक्षा अधिक किडींचा प्रादुर्भाव होत असतो. यामुळे दरवर्षी एकूण नुकसानीच्या सुमारे १५ टक्के इतके म्हणजे १.६ दशलक्ष टन, आणि २५,१६५ दशलक्ष रुपयांचे नुकसान होते. त्यातही मातीतून येणाऱ्या किडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मातीतील किडींमध्ये हुमणी अळी ही मुळांवर उपजीविका करते. या किडीचे भुंगे मे- जून महिन्यामध्ये बाहेर पडतात. हे भुंगे ही रोपवाटिका, भाज्या, लॉन आणि अन्य अनेक हंगामी पिकांचे मोठे नुकसान करतात. त्यातील होलोट्रिकिया कॉनसॅनग्युनिया ही भुईमुगावर प्रादुर्भाव करणारी प्रजात असून, तिच्यामुळे पिकाचे २० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. पांढऱ्या रंगाची ही अळी इंग्रजी सी अक्षराप्रमाणे आकार धारण करते. ही अळी प्राधान्याने हलक्या जमिनीत, तंतुमय मुळे असलेल्या पिके आणि अधिक सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीमध्ये आढळते. जमीन जर पाणथळ, घट्ट, खडकाळ आणि वनस्पतीरहित असेल, तर फारशी आढळत नाही. 

...असे आहे संशोधन
हुमणीचे भुंगेरे मिलनासाठी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट गंध उत्सर्जित करतात. त्यातील मिथॉक्सि बेन्झीन हा गंध संशोधकांनी ओळखला आहे. हे गंध निसर्गामध्ये संप्लवनशील असून, तो लगेच उडून जातो. हे टाळण्यासाठी  मिथॉक्सि बेन्झीनचे नॅनोजेल फॉरम्युलेशन तयार केले आहे. त्यामुळे तो अत्यंत सावकाशपणे उत्सर्जित होत राहतो. त्याच्या चाचण्या राजस्थानमधील हुमणी प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागामध्ये घेण्यात आल्या. 
या जेलपासून त्यांनी गंधगोळ्या (सेप्टा) तयार केल्या आहेत. या गंधगोळ्या सुमारे महिनाभर उत्तमपणे कार्य करतात. 
या सापळ्यामध्ये प्रति दिन हुमणीचे भुंगेरे अडकतात. त्याची सरासरी प्रति दिन १७.५ इतकी भरते. सध्या प्रायोगिक पातळीवर या गंधगोळ्यांची किंमत प्रति नमुना १० रुपये अशी ठेवण्यात आली आहे. ते बंगळूर येथील राष्ट्रीय कृषी कीटक स्रोत ब्युरो आणि राजस्थान येथील संशोधन केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

(स्रोत : ICAR- National Bureau of Agricultural Insect Resources, Bengaluru)


इतर टेक्नोवन
गोचिड निर्मूलनासाठी पर्यावरणपुरक पद्धतीजनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी...
सुधारित भोपळा जातीच्या लागवडीतून...ओडिशा येथील चंदन कुमार खुंटिया यांनी केवळ...
फवारणी यंत्राची देखभालआपण शेतामध्ये फवारणी यंत्रांचा अनेक वेळा वापर करत...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगररोटरी नांगर हे प्राथमिक मशागतीसाठी वापरले जाणारे...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
कार्यक्षम जल व्यवस्थापनासाठी नव्या दिशाकाटेकोर सिंचन व कार्यक्षम जलवापर पद्धतीच्या...
शेती नियोजनासाठी ड्रोन तंत्रज्ञानपिकांमधील पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची...
पर्वतीय, पठारी प्रदेशातील शेतीसाठी...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय...
हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणाआज अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे असले, तरी भविष्यात...
आधुनिक काळाची गरज ः कृषी यंत्रमानवजागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कृषी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग व्हावामहाराष्ट्र राज्य अवर्षण, दुष्काळ याबरोबरच अनियमित...
‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञानावर आधारित...नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पुयणी (ता. नांदेड...
ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रेरोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी...
अर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड...आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी...
शून्य मशागतीसह पेरणी यंत्राचा वापरतागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक...
शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव,...
हुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध...भारतीय कृषी संशोधन  संस्थेच्या बंगळूर येथील...
तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...