agriculture stories in Marathi, Planning of Rabbi season crops | Agrowon

नियोजन रब्बी पिकांच्या लागवडीचे...

डॉ. भगवान आसेवार
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

कोरडवाहू शेतीत प्रति हेक्टरी रोपांची योग्य‍ संख्या उत्पादनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाची असते. त्यासाठी योग्य प्रमाणात व योग्य‍ अंतरावर बियाण्यांची पेरणी करावी. योग्य खोली आणि पुरेशा ओलाव्यामुळे उगवण चांगली होऊन, रोपांची योग्य संख्या राहते. पिकांनुसार बियाणांचे प्रमाण व रोपांच्या दोन ओळींतील अंतर हे शिफारशीनुसार ठेवावे.

रब्बी हंगामात आंतरपीक पद्धती अवलंबल्यास हेक्टरी उत्पादन जास्त‍ मिळून नफा होतो. आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी + हरभरा (६:३) आणि रब्बी ज्वारी + करडई (६:३) या पीक पद्धती जास्त आर्थिक फायदा देतात.

आंतरपीक पद्धती ः

कोरडवाहू शेतीत प्रति हेक्टरी रोपांची योग्य‍ संख्या उत्पादनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाची असते. त्यासाठी योग्य प्रमाणात व योग्य‍ अंतरावर बियाण्यांची पेरणी करावी. योग्य खोली आणि पुरेशा ओलाव्यामुळे उगवण चांगली होऊन, रोपांची योग्य संख्या राहते. पिकांनुसार बियाणांचे प्रमाण व रोपांच्या दोन ओळींतील अंतर हे शिफारशीनुसार ठेवावे.

रब्बी हंगामात आंतरपीक पद्धती अवलंबल्यास हेक्टरी उत्पादन जास्त‍ मिळून नफा होतो. आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी + हरभरा (६:३) आणि रब्बी ज्वारी + करडई (६:३) या पीक पद्धती जास्त आर्थिक फायदा देतात.

आंतरपीक पद्धती ः

१) रब्बी ज्वारी + करडई ः रब्बी ज्वारी जास्त प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या क्षेत्रासाठी याची शिफारस केली जाते. वातावरणातील उष्णतामानाच्या तफावतीमुळे येणारी घट या पीक पद्धतीमुळे कमी होते. ही आंतरपीक पद्धत ६:३ या ओळी किंवा तासाच्या प्रमाणात घेण्यात यावी.
२) करडई + हरभरा ः मध्यम ते भारी जमिनीसाठी या पद्धतीची शिफारस आहे. ही आंतरपीक पद्धत ४:२ अथवा ६:३ ओळीच्या प्रमाणात घेतल्यास जास्त फायदा होतो.

दुबारपीक पद्धती ः

या पद्धतीसाठी जमिनीची खोली १ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आवश्‍यक असते. अशा जमिनीसाठी खालील दुबार पीक पद्धतीची शिफारस करण्यात येते.
१) मूग किंवा उडीद, सोयाबीन (खरीप)- रब्बी ज्वारी किंवा हरभरा किंवा करडई
२) खरीप संकरित ज्वारी - करडई किंवा हरभरा किंवा जवस

जमिनीच्या प्रकारानुसार पिके व पीक पद्धती

जमिनीचा प्रकार खोली (सें.मी.) उपलब्ध ओलावा (‍मि.मी.) घ्यावयाची पिके आणि पीक पद्धती
मध्यम २२.५-४५ ६०-६५ सूर्यफूल, करडई
मध्यम खोल

१) ५४-६०

२) ६०-९०

१) ८०-९०

२) १४०-१५०

१) रब्बी ज्वारी, करडई,

२) रब्बी ज्वारी + करडई (६:३) आंतरपीक
रब्बी ज्वारी, करडई, हरभरा
रब्बी ज्वारी + करडई (६:३)
करडई + हरभरा : (६:३)

खोल ९० पेक्षा जास्त १६० पेक्षा जास्त रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पिके, तसेच मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन (खरीप) नंतर रब्बी ज्वारी, करडई, हरभरा या दुबारपीक पद्धती घ्याव्यात.

योग्य जातीची ‍निवड ः

रब्बी हंगामात कोरडवाहू जमिनीमध्ये जास्त‍ उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील तफावतीला कमी बळी पडणाऱ्या जातींची निवड करावी. पावसाचा ताण व कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारीत व संकरित वाणांची निवड करावी.

सुधारित आणि संकरित जाती ः

पीक सुधारित/संकरित जाती
रब्बी ज्वारी मालदांडी ३५-१, एसपीव्ही-६५५, एसपीव्ही-८३९, फुले यशोदा (एसपीव्ही-१३५९), परभणी मोती (एसपीव्ही-१४११), स्वाती (एसपीव्ही-५०४), परभणी ज्योती
सूर्यफूल मॉडर्न, एससीएच-३५, ई.सी. ६८४१४, एलएसएफएच-१७१
करडई भीमा, शारदा, तारा, एन-६२-८, अनेगिरी, नारी -६, पीबीएनएस-१२, पीबीएनएस-४०, पीबीएनएस-८६
हरभरा विजय, बीडीएन-९-३, विशाल जी-४, जी-१२, आयसीसीव्ही-२
जवस एनआय-२०७, एस-३६ एलएसएल-९३

लागवडीचे नियोजन ः

१) योग्य वेळी पेरणी, उपलब्ध ओलावा, अन्नद्रव्यांचा होणारा जास्तीत जास्त उपयोग यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. उशिरा पेरणी झाल्यामुळे, ओलाव्याचा पूर्णपणे वापर होत नाही आणि उत्पादनात घट येते. रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपवावी. करडई पिकाची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.
२) रब्बी पिकांच्या पेरणीनंतर पाऊस पडण्याची खात्री नसते, त्यामुळे बियाण्यांची उगवण जमिनीतील ओलाव्यावर अवलंबून असते. खरीप पिकांच्या कापणीनंतर, रब्बी पिकांसाठी होणाऱ्या पूर्वमशागतीच्या कामांमुळे ओलाव्याचे प्रमाण कमी होते. त्याचा रब्बी पिकांच्या उगवणीस आणि वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पूर्वमशागतीची कामे कमीत कमी प्रमाणात केल्यास पृष्ठभागावरील ओलावा कमी होत नाही.
३) कोरडवाहू शेतीत प्रति हेक्टरी रोपांची योग्य‍ संख्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची असते. त्यासाठी योग्य प्रमाणात व योग्य‍ अंतरावर बियाण्यांची पेरणी करावी. योग्य खोली आणि पुरेशा ओलाव्यामुळे रोपांची उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. यासाठी पिकांनुसार बियाणांचे प्रमाण व रोपांच्या दोन ओळीतील अंतर हे शिफारशीनुसार ठेवावे. पेरणीपूर्वी रासायनिक खते खोल ओलाव्यात पेरून द्यावीत.
४) कोरडवाहू क्षेत्रातील रासायनिक खतांची उपयुक्तता, ही खते कशा पद्धतीने दिली जातात यावर अवलंबून असते. रब्बी हंगामातील पूर्वमशागत झाल्यावर, रासायनिक खते पेरणीपूर्वी १ किंवा २ दिवस आधी सुधारित तिफणीने १२ ते १५ सें.मी. खोल पेरून द्यावीत. यामुळे खते पुरेशा ओलाव्यात पडतात. पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.
५) पाऊस कमी असल्यास पृष्ठभागावरील जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी असते. परंतु जमिनीतील खालच्या थरात पुरेशा प्रमाणात ओलावा उपलब्ध असतो. त्यामुळे रब्बी पिकांची पेरणी ८ ते १० सें.मी. एवढी खोल करावी. बी चांगल्या ओलाव्यात पडल्यामुळे चांगले उगवते.

पीक ः पेरणीचा योग्य‍ कालावधी
रब्बी ज्वारी ः ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर
सूर्यफूल ः २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
करडई ः ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
हरभरा ः ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर
जवस ः २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर

उत्पादनवाढीची सूत्रे ः

रब्बी ज्वारी ः

१) हेक्टरी १० किलो बीज प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे.
२) पेरणी ४५ सें.मी. इतक्या अंतरावर करावी.
३) पहिल्या २० दिवसांत पिकांची विरळणी करून, दोन रोपांतील अंतर १५ ते १७ सें.मी. ठेवावे.
४) पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, आणि २० किलो स्फुरद जमिनीत खोल पेरून द्यावे.
५) पीक २० दिवसांचे झाल्यानंतर, १० ते १२ दिवसांच्या अंतराने तीन कोळपण्या कराव्यात.

करडई :

१) हेक्टरी १० ते १२ किलो बीज प्रक्रिया केलेल्या प्रमाणित बियाण्यांची पेरणी करावी.
२) पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद जमिनीत खोल पेरून द्यावे.
३) पिकावर माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यावर योग्य वेळी नियंत्रण करावे.
४) पीक तीन आठवड्यांचे झाल्यानंतर, १० ते १२ दिवसांच्या अंतराने दोन कोळपण्या कराव्यात.
५) मररोगाचा प्रादुर्भाव असलेल्या जमिनीमध्ये करडईचे पीक घेऊ नये.

हरभरा ः

१) हेक्टरी ६० ते ६५ किलो रायझोबियम आणि स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणूची बीज प्रक्रिया करून बियाण्यांची पेरणी करावी.
२) पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद जमिनीत खोल पेरून द्यावे.
३) पीक तीन आठवड्यांचे झाल्यानंतर, १० ते १५ दिवसांच्या अंतराने ३ कोळपण्या कराव्यात.

जवस ः

१) मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचऱ्याची, आम्ल- विम्ल निर्देशांक ५ ते ७ या दरम्यान असणारी जमीन लागवडीसाठी योग्य असते.
२) बियाणे प्रमाण- हेक्टरी २५ ते ३० किलो
३) बीजप्रक्रिया- कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे
४) पेरणीतील अंतर- दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. असावे.
५) खत व्यवस्थापन-
अ) कोरडवाहू लागवड- हेक्टरी ४० किलो नत्र व २५ किलो स्फुरद (संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी.)
ब) बागायती लागवड- प्रति हेक्टरी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी) उर्वरित अर्ध्या नत्राची मात्रा पाण्याच्या पाळीच्या वेळी २५ ते ३० दिवसांनी द्यावी.

संपर्क ः डॉ. भगवान आसेवार, (९४२००३७३५९)
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


फोटो गॅलरी

इतर कृषी सल्ला
वातावरणातील बदलाचे रोगकिडीवर होणारे...वातावरणातील घटकांचे ज्या प्रमाणे मानवावर परिणाम...
उष्ण, कोरडे हवामान , काही जिल्ह्यात...महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा कमी...
सामुहिक पद्धतीने करा रानडुक्करांचे...रानडुक्कर प्रामुख्याने रात्री आणि पहाटे...
जास्तीच्या ओलाव्यामुळे येणाऱ्या ...गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही...
कोरडवाहू शेतीकरीता मुलस्थानी जलसंधारणकोरडवाहु शेती संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावर...
खरीपासाठी निवडा दर्जेदार बियाणे...लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असला तरी शासनाने...
कृषी सल्ला (कोकण विभाग)शुक्रवार ते रविवार (ता. १५ ते १७) दरम्यान तुरळक...
...अशी तपासा बियाणांची उगवणक्षमताबीजोत्पादित केलेल्या बियाणांची उगवण क्षमता...
घडनिर्मिती, डोळा फुटणे अन् स्कॉर्चिंग...गेल्या दोन दिवसापूर्वी द्राक्ष विभागामध्ये पाऊस,...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
उन्हाळी पिकांसाठी सल्लाविदर्भासह विविध ठिकाणी उन्हाळी पिकांमध्ये खालील...
गारपीटीनंतर बागेतील उपाययोजनाद्राक्षबागेत वेलीच्या कालपर्यंत व्यवस्थितरीत्या...
हवामानाच्या अंदाजानुसार करा हंगामाचे...प्रत्येक कामांच्या नियोजनापूर्वी दैनंदिन हवामान...
उष्ण कोरडे हवामान अन् पावसाची शक्‍यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका...
जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा...सेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी...
द्राक्षबागेत जाणवणाऱ्या समस्यावरील...द्राक्षबागेतील वातावरणाचा आढावा घेतल्यास बऱ्याच...
योग्य पद्धतीने करा पीक व्यवस्थापनरब्बी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी...
कृषी सल्ला : कापूस, मका, गहू, उन्हाळी...मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील पाच दिवसात तुरळक...
पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात वादळी...महाराष्ट्रावरील हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका...
..असे करा अचानक वेली सुकत असलेल्या...ज्या भागात कोरडे वातावरण आहे, पाणी जास्त प्रमाणात...