agriculture stories in Marathi Pod borer attack on pigeon pea | Agrowon

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

के. एम. जाधव, डॉ. एन. एस. रोडे
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

मागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान राहिल्यामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तूर पिकावर या किडींचा प्रादुर्भाव झाल्यास फुले, पाने व शेंगा भरण्याची अवस्थेवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होते.

मागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान राहिल्यामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तूर पिकावर या किडींचा प्रादुर्भाव झाल्यास फुले, पाने व शेंगा भरण्याची अवस्थेवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होते. या किडीचा वेळीच बंदोबस्त केल्यास उत्पादनातील घट टाळता येऊ शकते.

शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer) : 
शास्त्रीय नाव ः हेलिकोवर्पा आर्मिजेरा (Helicoverpa armigera)
तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा रंग हिरवट पिवळसर असून अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. या किडीचा पतंग रंगाने फिक्कट पिवळसर असून पुढील पंखावर काळे ठिपके असतात.
या किडीचा मादी पतंग सुमारे ७०० ते ३ हजार अंडी कळ्या फुले, देठ पाने, शेंगा यावर घालते. अंड्यातून ३ दिवसात अळी बाहेर येते. अळी अवस्था १४-१५ दिवस असते. अळी जमिनीत कोषावस्था एका आठवड्याची असते. या अळीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यात पूर्ण होतो.

नुकसानीचा प्रकार :
प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळी कळी व फुलावर प्रादुर्भाव करते. नंतरच्या अवस्थेतील अळी शेंगाचे नुकसान करते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने, कळ्या व शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत शेतात आढळतात. आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास ६०-८० टक्के नुकसान होते. एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगांचे नुकसान करते.

अधिक प्रादुर्भावाचा कालावधी :
ढगाळ वातावरणात या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगांपर्यंतच्या काळात आढळून येतो. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

एकात्मिक व्यवस्थापन :

  1. तुरीमध्ये एकरी ४ गंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) पिकांपेक्षा एक फूट अधिक उंचीवर लावावेत.
  2. तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.
  3. पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १५०० पीपीएम) २.५ मिली या प्रमाणे फवारणी करावी.
  4. घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. (२५० एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची १ मिली प्रती लीटर पाणी प्रमाणे हेक्‍टरी ५०० लीटर द्रावणाची फवारणी करावी.
  5. आर्थिक नुकसानीची पातळी : ८-१० पतंग प्रती सापळा २-३ दिवसात किंवा १ अळी प्रती १-२ झाड किंवा ५-१० टक्के नुकसान झालेल्या शेंगा.

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आल्यास
फवारणी प्रती लीटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा
क्‍लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा
प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) २ मि.लि.
अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास,
इमामेक्‍टीन बेन्झोएट (५ टक्के ) ०.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डीअमाईड (३९.३५ एस.सी.) ०.२ मिली

के. एम. जाधव, ८९८३१०४९१९
(साहाय्यक प्राध्यापक, महात्मा गांधी मिशन, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद.)
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात उन्हामुळे धरणांतील...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा...
म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूचम्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत...
मराठवाड्यात उपयुक्त पाणी ६५.८० टक्केचऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांतील उपयुक्त...
`हिंगोलीत केंद्रीय मसाले मंडळाचे...हिंगोली : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना...
अवकाळीच्या नुकसानीचे नांदेडमध्ये १८...नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवेळी...
शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागात निर्माण...
साडेसात हजार खात्यांचे आधार प्रमाणीकरण...नांदेड : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘ई-फेरफार प्रणालीत नाशिक विभागाची बाजी’नाशिक : ‘‘महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीत...
भंडाऱ्यात पणन अधिकाऱ्यांच्या समक्षच...भंडारा : जिल्ह्यात धान लागवड क्षेत्र आणि सरासरी...
अकोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ....अकोला : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
महागाई विरोधात स्वाभिमानीचे लवकरच...कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने...
काजू खरेदी करताना आडकाठी केल्यास पोलिस...सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी-दोडामार्ग फळ बागायतदार...
‘म्हैसाळ’चे पाणी बंदिस्त पाइपद्वारे...सांगली ः जलसंपदा विभागाद्वारे म्हैसाळ योजनेच्या...
कायदा मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा...उत्तूर, जि. कोल्हापूर : आधी पुनर्वसन मग धरण हा...
‘शेतकरी सन्मान’च्या कामांना आता...औरंगाबाद : येत्या ८ मार्चपासून पंतप्रधान शेतकरी...
मार्च महिन्याची सुरुवातच अकोलेकरांसाठी...अकोला : मार्च महिन्याला सुरुवात होताच यंदाचा...
पंतप्रधानांची शेतकऱ्यांसाठी ‘बुक...नाशिक : देशात मागील काही महिन्यांपासून कृषी...
योजनेत गोंधळ झाल्यास ‘महसूल’ जबाबदार...पुणे : ‘‘कृषी खात्यात आम्ही राबतो व श्रेय महसूल...
ताकारी उपसा सिंचन योजनेचे फक्त आठच पंप...सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन १२...
वाशीममध्ये उन्हाळी पिकांच्या लागवडीकडे...वाशीमः या वर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने...