agriculture stories in Marathi, Pokka boing in sugarcane | Agrowon

उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा प्रादुर्भाव

डॉ.एस.बी.महाजन, डॉ.डी के.कठमाळे
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात उसावरील पोक्का बोईंग रोगास अनुकूल हवामान आहे. उसाच्या टोकाकडील काही कांड्याची लांबी कमी झाल्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. रोगाचे प्रमाण अधिक असल्यास काही जातीमध्ये मर दिसू शकते.

सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात उसावरील पोक्का बोईंग रोगास अनुकूल हवामान आहे. उसाच्या टोकाकडील काही कांड्याची लांबी कमी झाल्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. रोगाचे प्रमाण अधिक असल्यास काही जातीमध्ये मर दिसू शकते.

रोगकारक बुरशी :
फ्युजॅरीयम मोनिलीफॉरमी आणि फ्युजॅरीयम सॅकॅरी

१) उसाची जात, रोगकारक बुरशीची प्रजाती आणि सभोवतालचे वातावरण यावर अवलंबून असतात.
२) रोगामुळे उंची, वजन, रसाचे प्रमाण, जाडी, आणि साखरेचे प्रमाण इत्यादी घटकावर विपरीत परिणाम होतो.

पोक्का बोइंग :
१) रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला शेंड्यापासून येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या कोवळ्या पानांवर दिसतो.
२) पानांच्या खालच्या भागात सुरुवातीला फिक्कट हिरवे, पिवळसर अथवा पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. रोगट पानांचा आकार बदलून त्यांची लांबी कमी होते.
३) खोडाकडील भाग आखूड होऊन पाने एकमेकांत गुरफटली जातात. त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत.
४) रोगाची तीव्रता जास्त असल्यास कांडी आखूड होते. शेंडा कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात.

शेंडा कूज :
१) पोक्का बोइंग या रोगाच्या लक्षणाचा पुढील टप्पा म्हणजे शेंडा कूज. रोग वाढीस हवामान अनुकूल असल्यास खोलवर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे वाढीचा अग्र भाग मरून जातो.
२) रोगग्रस्त उसामध्ये शेंड्याकडील भाग चाबका सारखा वाळलेला दिसून येतो. अग्र भागाच्या ऊती कुजल्यामुळे उसाच्या बाजूचे डोळे फुटून वाढलेले दिसतात.
३) ऊस वाढीच्या पेशी मेल्यानंतर बुरशी बाजूच्या पेशीमध्ये वाढत राहते, त्यामुळे वरील पाने मर लागलेल्या रोगाप्रमाणे पिवळसर दिसू लागतात. शेंडा कूज झालेला ऊस पूर्ववत होत नाही.

रोग प्रसार ः
१) रोग हवेद्वारे पसरतो. वाढलेल्या आद्रतेमुळे हा रोग पानावर दिसून येतो. या रोगाची वाढ पावसाळ्याच्या सुरुवातीला उष्ण दमट हवामानात चांगली होते. या काळात उसाची वाढ सुद्धा झपाट्याने होत असते.
२) तीन ते सात महिन्याचे पीक रोगास बळी पडते. काही काळ हवामान उष्ण, कोरडे व त्यानंतर आर्द्रतायुक्त असल्यास पाने लवकर करपतात.
३) हवेतील आर्द्रता ७० ते ८० टक्के ढगाळ हवामान रिमझिम पाऊस रोग वाढीस अनुकूल असते. रोग कारक बुरशीचे बीजाणू उसाच्या पानावर पडून पाण्याबरोबर शेंड्यात जातात. साधारण एक महिन्यानंतर रुजून शेंड्याकडील भागात प्रादुर्भाव करतात.
४) कवकतंतू कोवळ्या पानाच्या ऊती मध्ये शिरल्यामुळे त्या मरतात. त्यानंतर हे कवकतंतू पानातून खोडामध्ये शिरतात. रोगाचा दुय्यम प्रसार हवेतील बीजाणू द्वारे होतो.

रोगापासून नैसर्गिकरीत्या सुधारणा :
१) मान्सूनच्या काळात रोगास अनुकूल हवामान असून रोग सप्टेंबर महिन्यापर्यंत दिसून येतो. त्यानंतर रोगास प्रतिकूल हवामानामुळे रोगाची तीव्रता कमी होते, आणि उसाचा जोमदार वाढीचा काळ संपून, पक्वतेचा काळ सुरू होतो. या काळात रोगाचा प्रादुर्भाव झालेले बहुतांश ऊस आपोआप लक्षणे मुक्त होऊन वाढीस लागतात.
२) उसावर रोगांचे अवशेष म्हणजे रोगट सुरकुतलेली पाने लोंबकळत असलेली दिसून येतात. परंतु या रोगामुळे शेंडा कूज झालेला ऊस पूर्ववत होत नाही.
३) रोगाची तीव्रता जास्त असल्यास अनेक कांडी आखूड होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.

नियंत्रण :
१) निरोगी बेण्याची लागवड करावी.
२) को-८६०३२ या जातीवर कमी प्रमाणात रोग येतो असे दिसून आले आहे.
३) शेंडा कूज झालेले ऊस काढून नष्ट करावेत.

फवारणी ः (प्रति लीटर पाणी)
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा
मॅंन्कोझेब २.५ ग्रॅम
१२ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.
( बुरशीनाशकांना लेबल क्लेम आहे)

संपर्क ः डॉ. एस. बी. महाजन,९४२११२८३३३
(कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि.सांगली)


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...