agriculture stories in marathi, Processing industry, dal mill has tremendous opportunities in India | Agrowon

डाळनिर्मितीला भारतात मोठी संधी

राजेंद्र वारे
शनिवार, 18 जानेवारी 2020

भारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत पिकवली जाते. उर्वरित ४० टक्के गरज अन्य देशांतून आयात केली जाते. म्हणजेच डाळनिर्मितीला मोठा वाव असल्याचे दिसून येते. आधुनिक तंत्र व
प्रक्रिया साखळीचा वापर करून दर्जेदार डाळनिर्मिती करून बाजारपेठेत त्याचे ब्रॅंडनेम करणे नक्कीच शक्य आहे.

डाळमील उद्दयोगाद्यारे बाजारपेठांची मागणी पूर्ण करण्यास शेतकऱ्यांना चांगली संधी उपलब्ध आहे. हा उद्योग करण्यासाठी स्वतःची डाळमील असल्यास फायदेशीर ठरते. त्याद्वारे ग्राहकांच्या पसंतीनुसार डाळ तयार करणे शक्य होते. हा उद्योग स्वयं व इतरांसाठीही रोजगार निर्माण करू शकतो.

भारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत पिकवली जाते. उर्वरित ४० टक्के गरज अन्य देशांतून आयात केली जाते. म्हणजेच डाळनिर्मितीला मोठा वाव असल्याचे दिसून येते. आधुनिक तंत्र व
प्रक्रिया साखळीचा वापर करून दर्जेदार डाळनिर्मिती करून बाजारपेठेत त्याचे ब्रॅंडनेम करणे नक्कीच शक्य आहे.

डाळमील उद्दयोगाद्यारे बाजारपेठांची मागणी पूर्ण करण्यास शेतकऱ्यांना चांगली संधी उपलब्ध आहे. हा उद्योग करण्यासाठी स्वतःची डाळमील असल्यास फायदेशीर ठरते. त्याद्वारे ग्राहकांच्या पसंतीनुसार डाळ तयार करणे शक्य होते. हा उद्योग स्वयं व इतरांसाठीही रोजगार निर्माण करू शकतो.

डाळमील व्यवसायाचे गमक हे त्या डाळमीलमध्ये नाही तर ते शेतामध्ये आहे. कारण डाळीची गुणवत्ता ही प्रत्यक्ष शेतातच ठरते. डाळ चांगली व उत्कृष्ट बनण्यासाठी जमिनीचा पोत आणि त्यास पोषक वातावरण आवश्‍यक असते. डाळ ही भारताच्या सर्व राज्यांत प्रामुख्याने पिकवली जाते. तसेच रोजच्या आहारात वापरली जाते. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास सर्वसाधारणपणे उस्मानाबाद, बीड, लातूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांत डाळ पिकवली जाते.

डाळ उद्योगाचे महत्त्व
डाळीचा उपयोग सर्व राज्यांत वेगवेगळ्या आहार पद्धतीत केला जातो. डाळी हा सर्वांत उत्तम प्रथिने (प्रोटीन्स), व्हिटॅमिन, मिनरल्स यांचा नैसर्गिक स्रोत आहे. डाळीचा अधिकाधिक वापर उत्तर, मध्य व पूर्व भारतात केला जातो. हरभरा, मूग व तूर डाळीचा वापर दक्षिण भारतात विशेष केला जातो. भारतात डाळींचा वापर प्रतिव्यक्ती साधारणपणे २.८ किलोग्रॅम आहे. भारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत पिकवली जाते. उर्वरित ४० टक्के गरज अन्य देशांतून आयात केली जाते. याचाच अर्थ बाजारपेठांची मागणी पूर्ण करण्यास शेतकऱ्यांना चांगली संधी उपलब्ध आहे. हा उद्योग करण्यासाठी स्वतःची डाळमील असल्यास फायदेशीर ठरते. त्याद्वारे ग्राहकांच्या पसंतीनुसार डाळ तयार करणे शक्य होते. हा उद्योग स्वयं व इतरांसाठीही रोजगार निर्माण करू शकतो.

उद्योगातील आवश्‍यक बाबी
सर्वसाधारणपणे प्रक्रिया करण्यास योग्य अशा डाळींमध्ये हरभरा (चणा), मूग, तूर, मसूर, उडीद आदींचा समावेश होतो. चांगली प्रक्रिया करून डाळीची चांगली शिजण्याची क्षमता आणि जास्त दिवस टिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याचे टरफल (छिलका) काढणे आवश्यक असते. यासाठी थोड्या प्रमाणात जवस तेल (लीनसीड ऑइल) डाळीला चकाकी (पॉलिश) आणण्यासाठी वापरले जाते.

डाळीचे पॅकिंग

बाजारपेठांच्या मागणीनुसार डाळीचे पॅकिंग केली जाते. होलसेल पॅकिंग साधारणपणे ३० किलोचे असतात. यात डाळ प्राथमिक पीपी बॅग (लायनर) मध्ये तर द्वितीय (सेकंडरी) बीओपीपी बॅगेमध्ये पॅकिंग केले जाते. एक किलोचे पॅकिंग प्रिंटेड बीओपीपी, प्रिंटेड लॅमिनेटेड पिशव्यांमध्ये (पाऊचेस ) होते. तसेच ॲडव्हान्स निर्वात (व्हॅक्यूम) पॅकिंगचाही वापर होतो. यामुळे डाळीची टिकवणक्षमता (शेल्फ लाईफ) वाढवण्यास मदत मिळते. डाळींचे व्यापारी, मोठे शॉपिंग मॉल्स, होलसेल व्यापारी यांना आकर्षक पॅकिंगमध्ये माल देता येईल.

डाळीची प्रक्रिया
प्रथम शेतातून कच्चा माल डाळमीलपर्यंत आणला जातो. त्यानंतर डिस्टोनेर आणि क्लिनिंग होते. या प्रक्रियेत नको असलेले दगड, माती, काडी हे घटक वेगळे काढले जातात. यानंतर वेगवेगळ्या साईझच्या चाळण्यांमधून (ग्रेडर) प्रक्रिया होते. त्यानुसार डाळींचे आकार वा प्रतवारी होते. ग्रेडिंग झालेल्या डाळी अंशतः पाण्यामध्ये तीन ते चार तास भिजवल्या जातात. त्यास सोकींग प्रक्रिया म्हणतात. त्यानंतर रेड अर्थ पावडर (५ टक्के) त्यात समाविष्ट केली जाते. डाळीला आकर्षक पिवळा रंग येण्यासाठी व त्यावरीवल काळे डाग काढण्यासाठी त्याचा वापर होतो. त्यानंतर रात्रभर ‘कंडिशनिंग’ प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर डाळी उन्हामध्ये दोन ते चार दिवस वाळवल्या जातात. चाळणीमधून काढून रेड अर्थ पावडर वेगळी केली जाते. त्यानंतर डाळी, छिलका, कणी व पावडर अशा चार स्वरूपात विभागणी होते. चाळणीतून काढून डाळ ही चकाकी (पॉलिशिंग) आणण्यासाठी पाठवली जाते. या प्रक्रियेत बेल्ट वापरले जातात. यामध्ये पाणी अथवा जवस तेल (५ टक्के) कमी अधिक प्रमाणात वापरले जाते. त्यानंतर योग्य अशा आकर्षक पॅकिंगमधून डाळी बाजारपेठेत पाठविल्या जातात.

संपर्क  ः श्री. वारे, ९८८१४९५१४७
(लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ज्ञ आहेत.) 


इतर कृषी प्रक्रिया
ड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया,...
कवठाची जॅम, जेलीकवठाचे औषधी उपयोग लक्षात घेऊन फळापासून विविध...
पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बारबाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रथिनयुक्त पावडर...
फळे,भाजीपाला साठवणीसाठी उच्च तापमानाचा...फळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
फळांची जेली करताना...चमकदार, पारदर्शक, मऊ आणि उत्कृष्ट जेली...
आवळ्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती आपणा सर्वांना आहारात आणि आयुर्वेदात आवळ्याचे...
फळे,भाजीपाला प्रक्रियेची तत्त्वेफळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
चिकूपासून टॉफी, जॅमनिर्मितीचिकू फळापासून टॉफी, जॅम, जेली, ज्यूस, गर (पल्प),...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-...काढणी, साठवणूक आणि प्रक्रिया यातील अयोग्य हाताळणी...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
शेळीपालन : परतफेड हप्ते ठरवण्यासाठी ...शेळीपालनामुळे शेतमजूर स्त्रियांच्या उत्पन्नामध्ये...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
आवळ्याचे गुणकारी पदार्थआवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही,...
डाळनिर्मितीला भारतात मोठी संधीभारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत...
काथ्या उद्योगासाठी अनुदान आणि वितरणकाथ्या उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत....
अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधीशेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे...
किवी फळापासून प्रक्रिया पदार्थकिवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व...
दुग्ध व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात काय...खरेतर राहुलला आता दूध व्यवसायाने झपाटले होते. दूध...