agriculture stories in marathi processing success story of Anita More | Agrowon

आवळा प्रक्रियेने दिली आर्थिक साथ (video सुद्धा)

संतोष मुंढे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन औरंगाबाद येथील अनिता गोविंद मोरे यांनी आवळा प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांनी विविध पदार्थ बाजारपेठेत आणले. गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि थेट ग्राहकांना विक्री सुविधा असल्याने पदार्थांच्या मागणीत चांगली वाढ झाली. यामुळे कोरडवाहू शेतीला आर्थिक आधार मिळाला आहे.

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन औरंगाबाद येथील अनिता गोविंद मोरे यांनी आवळा प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांनी विविध पदार्थ बाजारपेठेत आणले. गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि थेट ग्राहकांना विक्री सुविधा असल्याने पदार्थांच्या मागणीत चांगली वाढ झाली. यामुळे कोरडवाहू शेतीला आर्थिक आधार मिळाला आहे.

खरीप पिकांवर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीतून एकत्रित कुटुंबाचा खर्च भागवणे शक्‍य नव्हते. त्यामुळे रोजंदारीसाठी मोरे दांपत्याने औरंगाबाद शहर गाठले. परंतू तिथे मिळणाऱ्या मिळकतीतून कुटुंबाचा चरितार्थ भागविणे शक्‍य नव्हते. त्यामुळे अर्थार्जन वाढविण्यासाठी काय करता येऊ शकते, या विचारातून प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणाचा पर्याय समोर आला. अनिता गोविंद मोरे यांनी औरंगाबादच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आवळा प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. तयार केलेल्या पदार्थांच्या विक्री व्यवस्थापनाची जबाबदारी अनिताताईंचे पती गोविंदराव यांनी घेतली. कुटुंबाच्या गरजेतून निर्माण झालेला आवळा प्रक्रिया उद्योग आता 'सई' ब्रॅंडने आकार घेत आहे. त्यांनी प्रक्रिया उद्योगाची नोंदणी केली आहे.

प्रत्यक्ष पहा आवळा प्रक्रियेचा घरगुती उद्योग... video

शेतीतून प्रक्रिया उद्योगाकडे ः

मोरे कुटुंबाची टेळकी (ता. लोहा, जि. नांदेड) गावामध्ये एकत्रित आठ एकर कोरडवाहू शेती. परंतू या शेतीमध्ये केवळ खरिपाच्या पिकाची शाश्वती. त्यामुळे गोविंद मोरे यांनी औरंगाबाद शहरातील खासगी कंपनीत नोकरी पत्करली. २००६ मध्ये त्यांचा विवाह अनिता यांच्याशी झाला. येणाऱ्या मिळकतीत कुटुंबाचा चरितार्थ भागविणे शक्‍य नसल्याने २००८ मध्ये मोरे दांपत्य गावी परतले. परंतू शेती ही निसर्गाच्या भरवशावरच ठरलेली. शेतीतूनही फारसे उत्पन्न हाती येत नव्हते. त्यामुळे २०१० मध्ये पुन्हा गोविंद मोरे यांनी औरंगाबाद गाठून खासगी कंपनीत नव्याने नोकरी सुरू केली. २०११ मध्ये गोविंद मोरे यांनी पत्नी अनितासह मुलांना औरंगाबादमध्ये आणले. मिळकत वाढविण्यासाठी त्यांनी परभणी येथे उत्पादित होणारे दर्जेदार आवळा पदार्थ, लोणची आदी पदार्थांची थेट ग्राहकांच्या घरी जाऊन विक्री सुरू केली. या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून आपणच आवळ्याचे काही पदार्थ का तयार करू नयेत असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. प्रक्रिया उद्योगासाठी प्रशिक्षणाची तयारी अनिताताईंनी दाखविली. प्रशिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला. या केंद्राच्या तत्कालीन गृहविज्ञान शाखा प्रमुख प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी आवळा प्रक्रियेबाबत संपूर्ण मार्गदर्शन केले. अलीकडे मोरे दांपत्याने जमवलेल्या मिळकतीतून औरंगाबाद शहरातील साईराज नगरमध्ये छोटे घर घेतले आहे. या ठिकाणी त्यांनी आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला.

प्रक्रिया उद्योगाला सुरवात ः

अनिता मोरे यांनी आवळा प्रक्रिया प्रशिक्षण घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात आवळा ज्यूस व पावडर निर्मितीला सुरवात केली. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी टप्प्याटप्प्याने आवळा कॅंडी, सुपारी, लोणचे, मुरंबा आणि पावडर निर्मितीस सुरवात केली. पदार्थांची गुणवत्ता आणि थेट विक्रीतून जोडलेल्या ग्राहकांमुळे उत्पादनांना मागणी वाढू लागली. सध्या आवळा कॅंडी ३६० रुपये किलो, आवळा पावडर ४०० रुपये किलो या दराने विकली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार लोणचे, सरबत, मुरंबा बॉटल पॅकिंग करून दिले जाते. या दरम्यान उद्योगाची वाढ करण्यासाठी अनिताताईंनी एमसीईडीच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीविषयी प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणामुळे त्यांना सुरू केलेल्या आवळा प्रक्रिया उद्योगासह विविध गृह व लघू उद्योगातील संधी लक्षात आल्या.

मागणीनुसार उत्पादनांची विक्री ः

केवळ आपल्याकडील उत्पादित प्रक्रिया पदार्थ विकण्यापुरते मर्यादित न राहता गोविंद मोरे हे परभणी येथील मंगल जाधव यांनी तयार केलेल्या आवळा, लिंबू प्रक्रिया उत्पादनांची विक्री करतात. ग्राहकांना कोणते पदार्थ हवेत ते देण्याचा प्रयत्न गोविंदरावांचा असतो, त्यामुळे मिळकतीमध्येही वाढ होत आहे.

ज्यूस विक्रीचा स्टॉल

मोरे दांपत्याने औरंगाबाद शहराच्या म्हाडा कॉलनीतील चौकात सकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत 'सई' ब्रॅंडच्या विविध आरोग्यवर्धक ज्यूसची विक्री सुरू केली. या ठिकाणी आवळा, कारले, दुधी भोपळा ज्यूस तसेच गव्हांकूर रस, गूळवेल रस, कडूलिंब रसाची दहा रुपये ग्लास या दराने विक्री होते. विविध प्रकारच्या ज्यूस विक्रीतून प्रति दिन अडीचशे ते तीनशे रुपये मिळतात.

असा आहे प्रक्रिया उद्योग ः

१) दरवर्षी १५ क्‍विंटल आवळा प्रक्रिया.
२) थेट शेतकऱ्यांकडून आवळा खरेदीला प्राधान्य.
३) मोरे दांपत्य करते आवळा तोडणीचे काम.
४) ग्राहक तसेच सरकारी कार्यालयातून थेट विक्री.
५) यंदाच्या वर्षीपासून हळद पावडर निर्मिती.
६) छोट्या चक्‍कीवर धान्य दळणाचे काम.
७) दर महा सरासरी वीस हजारांची उलाढाल.

कागदी पिशव्यांची निर्मिती ः

प्लॅस्टिकबंदी झाल्यामुळे बाजारपेठेत कापडी, कागदी पिशव्यांची मागणी वाढली. त्याचा फायदा अनिताताईंनाही झाला. कागदी पिशव्या बनविण्याचे तंत्र अवगत करून अनिताताई मागणीनुसार कागदी पिशव्या पुरविण्याचे काम करतात. सरासरी ४५ रुपये प्रतिशेकडा या प्रमाणे विक्री होते.

संपर्क ः अनिता मोरे, ९०११८९१३१८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
अर्थकारण उंचावण्यासाठी मोसंबीसह पेरू,...अस्मानी, सुलतानी संकटे आली तरी त्यातून मार्ग काढत...
सिंचनाची गंगा अवतरली बांधावरयवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर नोव्हेंबरमध्ये...
मराठवाड्याच्या मोसंबीची पुण्यात मोठी...मोसंबी हे पीक मराठवाडा, विदर्भ व नगर जिल्ह्यात...
सुशिक्षित तरुणाने शोधला मधमाशीपालनातून...बीएससी. मायक्रोबायोलॉजीपर्यंत शिक्षण झालेल्या...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडएखादा पूरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर...
मिरची पिकात प्रमोद पाटील यांनी तयार...सावळदा (ता. जि. नंदुरबार) येथील प्रमोद हिरालाल...
आंबा निर्यातीत नाव कमावलेले दामले कुटुंबतीनहजारांहून झाडांच्या चोख व्यवस्थापनातून...
गायकवाडवाडी झाली पेरू बागांसाठी प्रसिद्धपुणे शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवरील...
ज्ञानाचा व्यासंग केल्यानेच...मुर्शीदाबादवाडी (जि. औरंगाबाद) येथील संजय पवार...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
चार एकर शेततळ्यात आधुनिक पद्धतीने...नाशिक जिल्ह्यातील पुतळेवाडी येथील धारणकर...
निसर्ग अन् लोकसंस्कृतीतून ग्रामविकासाला...भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या...
शेतीला मिळतोय मधमाशीपालनाचा मोठा आधारकेवळ अडीच एकर शेतीला उदरनिर्वाहासाठी...
भाजीपाला, फुलशेतीतून गटाने दिली नवी दिशाटिके (जि. रत्नागिरी) गावातील नवलाई आणि पावणाई या...
अॅग्री बीटेक’ तरुणाचा धिंगरी मशरूम... ‘ॲग्रिकल्चर बीटेक’ची पदवी घेतलेल्या अनंत...