agriculture stories in marathi project report, agri tourism project is more important business | Agrowon

कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसाय

अनिल महादार
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

वसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला आलेल्या पाहुण्यामुळे खरेतर आणखी चालना मिळाली. दुसऱ्याच दिवशी आपले वडील सुभानरावांसह पत्नी अलका यांनी एकत्र बसून विचारविनिमय केला.

वसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला आलेल्या पाहुण्यामुळे खरेतर आणखी चालना मिळाली. दुसऱ्याच दिवशी आपले वडील सुभानरावांसह पत्नी अलका यांनी एकत्र बसून विचारविनिमय केला.

वसंत म्हणाला,‘‘काल मुद्दामच या पाहुण्यांवर कृषी पर्यटनातील काही घटक वापरून पाहिले. हे पूर्ण शहरी पाहुणे खूश झाले म्हणजे येणारा सामान्य शहरी पर्यटकही नक्कीच खूश होईल.’’ सुभानरावांनी व्यावहारिक सल्ला दिला. ते म्हणाले, “वसंता, गडबड न करता नीट ठरवून आराखडा तयार करा. आपल्याला भांडवल किती लागेल याचा अंदाज घ्या.’’ वसंता तसा तयारीत बसला होता. त्याने एक मोठा कागद त्यांच्यासमोर पसरला. त्यावर विभागवार स्पष्टीकरण केले होते. त्यात कृषी पर्यटन प्रवेशद्वार, स्वागत कक्ष, भोजनगृह, स्वयंपाक गृह, पर्यटकांना राहण्याची व्यवस्था, प्रसाधन गृह, छोटा जलतरण तलाव यांचा समावेश होता. “सध्या आपल्याकडे एक हॉल तयार आहे. त्यात आपण ग्रामीण संस्कृती दर्शनाचे संग्रहालय केले आहे. या व्यतिरिक्त अन्य बाबींचे प्लॅन व एस्टिमेट काढून घेतो. त्याआधी आपण एका वेळी किती पर्यटक एक दिवसाच्या भेटीसाठी येतील व किती पर्यटक राहावयास येतील याचाही अंदाज घेऊ. किती पर्यटकांना उत्तम सेवा देण्याची आपली क्षमता आहे, याचा विचार प्रथम करावा लागेल. या सेवा देण्याच्या विभागामध्ये मला अलकाची मदत लागेल.’’

अलकालाही आनंद झाला. तिच्या शिक्षणाचे आता चीज होणार होते. ती म्हणाली, ‘‘एक दिवशी आपण किती पर्यटकांना सेवा देऊ शकतो, हे पाहू. सुरुवातीला एक दिवसाच्या सहलीसाठी येणारे ५० व एक दिवसासाठी राहण्यास येणारे १० ते १५ याप्रमाणे तयारी करू. त्याप्रमाणे छोटी सुटसुटीत निवास, बांधकाम व साहित्य लागेल. त्यांना सेवा देण्यासाठी आवश्यकता मनुष्यबळ याची आखणी करणे गरजेचे आहे. वर्षातील शनिवार व रविवार धरले तरी १०४ दिवस होतात. अन्य सुट्टीचे दिवस त्यात दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्टी असे एकूण १५० ते १८० दिवस आपल्या व्यवसायासाठी महत्त्वाचे आहेत. या दिवसात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात करावी लागेल. ’’

त्यानंतर वसंतने स्पष्ट केले. तो म्हणाला, “५० पर्यटकांना दिवसभर देण्यात येणाऱ्या सोईसुविधा, प्रति व्यक्ती एक दिवस आवश्यक चहा, न्याहरी, जेवण, शेतातील फळे फळावळ, दही, दूध, ताक यावरील खर्च काढू. हे अन्न तयार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, गॅस, चूल किंवा किराणा माल यावरील खर्च याचाही अंदाज काढू. त्यातून आपल्या प्रति महिन्यासाठी लागणारे खेळते भांडवल किती लागेल याचा अंदाज येईल.’’

नंतर दोघांनी स्थिर भांडवल, बांधकामास लागणारा खर्च, फर्निचर, स्वयंपाक घरातील भांडी व इतर साहित्य यावर लागणारा खर्च वेगळा मोजला. त्यात तीन महिन्यांसाठी आवश्यक खेळता भांडवली खर्चांचा अंदाज घेतला. या दोन्हीचा समावेश असलेल्या खर्च आणि त्यातून मिळू शकणाऱ्या उत्पन्नाचा ताळेबंद तयार केला. हे करताना वर्षातील किमान १५० दिवस पर्यटक येतील, हे गृहीत धरले होते. एकूण होणारा खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण गृहित धरून एक दिवसाच्या पर्यटकासाठी वेगळा दर आणि दिवस व एक रात्र रहिवासासाठी येणाऱ्या लोकांसाठी वेगळा दर ठरविला.
सर्व कागदपत्रांसह बँकेचा कर्ज मागणी अर्ज बॅंकेला सादर केला. बँकेचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर येऊन सर्व बाबींची माहिती घेतली. कसे बांधकाम करावयाचे, राहण्यासाठी कुटीर/खोल्या कोठे बांधवायचे वगैरे याचा सर्व आराखडा त्यांना दाखवला. शासनाच्या नियमाप्रमाणे आठ कुटीर किंवा खोल्या बांधण्यासाठी नगर रचनाकाराची परवानगी घ्यावी लागत नाही. बँकेच्या अधिकाऱ्यांनी वसंतचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘कृषी पर्यटन हा व्यवसाय तसा आव्हानात्मक आहे. यात खूप कष्ट आहेत. हे सर्व करताना सध्याचे शेतीच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष होता कामा नये. हे ठिकाण शहरापासून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे. शहरातील प्रत्येकाला ग्रामीण भागाचे आकर्षण आहे. त्यांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन आणि ग्रामीण खाद्य संस्कृतीची ओळख करून देऊ शकतो.’’ त्याच वेळी अलकाने त्यांना अधिक माहिती पुरवली. शासनाच्या पर्यटन धोरणाप्रमाणे पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कृषी पर्यटनाचा अनुभव सहलीद्वारे देण्याचे नमूद केले आहे. त्यानुसार आम्ही शाळांसाठी एक दिवसाचे पॅकेज तयार केले असून, परिसरातील शाळांशी संपर्क करणार आहोत.

याशिवाय लोकांना बुकिंग करणे सोयीचे व्हावे, यासाठी शहरामध्ये एक ऑफिस उघडण्याचाही विचार आहे. मागणीनुसार पर्यटकांना येथपर्यंत आणण्याची व पुन्हा परत घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. या शिवाय शक्यतो गावातील मनुष्यबळ वापरण्याचा विचार आहे. गावातील बचतगटालाही सोबत घेतले आहे. या कामातून त्यांच्यातील काही महिलांना कायमस्वरूपी तर काहींना हंगामी काम मिळेल. त्यांच्या गटातील खाद्यपदार्थांना विक्रीची संधी देण्याचा विचार आहे.’’

दोघा पतीपत्नींच्या बोलण्यामुळे बँक अधिकाऱ्यांचे पूर्ण समाधान झाले. वास्तविक या बॅंक शाखेसाठी असा कृषी पर्यटनाचा प्रकल्प नवीनच होता. मात्र, त्यांनीही आपल्या मुख्य शाखेतील कृषी अधिकाऱ्यांशी बोलून एकूण प्रकल्पाच्या गुणवत्तेविषयी खात्री करून घेतली. आपला प्रस्ताव स्वीकारार्ह असल्याचे संकेत वसंत आणि अलका यांना दिले. कर्ज मागणी अर्जासह सर्व बाजूने विचार केलेला प्रकल्प अहवाल जमा केला. काही दिवसांत बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र मिळाले. वसंताचे कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीचे स्वप्न सत्‍यात उतरणार होते. दोघांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. त्यांच्या पाठीवर सुभानरावांनी हात ठेवून शाबासकी दिली.

यशस्वी कृषी पर्यटन व्यवसायाची १० सूत्रे

 1. आपण आपला वेळ, शक्ती क्षमता व बुद्धिमत्ता याबरोबरच आपल्या कुटुंबीयांचे संपूर्ण सहकार्य या प्रकल्पासाठी आवश्यक.
 2. कृषी पर्यटन म्हणजे केवळ हॉटेल व्यवसाय नाही, हे लक्षात घेऊन पर्यटकांना संपूर्ण कृषी अनुभव देण्याचा योजनापूर्वक व नियोजनबद्ध आराखडा तयार करावा.
 3. शेतीशी संपूर्णपणे जोडलेला कृषी पर्यटन हा व्यवसाय लोकांच्या भावनांशी जोडलेला आहे. त्यामुळे आलेल्या पर्यटकांशी मोकळ्या गप्पा मारणे यासोबतच योग्य तितका एकांत देणे आवश्यक आहे.
 4. कृषी पर्यटनामध्ये द्यावयाच्या सोयी विचारपूर्वक ठरवाव्यात. त्यावर ठाम राहावे. प्रत्येक पर्यटकासोबत त्या बदल करू नये.
 5. प्रत्येक सोय, सुविधा आणि अनुभव आनंददायी असेल, याची आखणी करावी. यात शिवारफेरी, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, ग्रामीण वस्तू- खाद्य पदार्थाची विक्री यांचा समावेश करावा.
 6. छोट्या प्रमाणातील सुरुवातीनंतर येणाऱ्या पर्यटकांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करावा. दर टप्प्यानंतर मागणीनुसार योग्य ते बदल करावेत.
 7. या कृषी पर्यटनासाठी ज्यांना आकर्षित करावयाचे आहे, त्यांचा आर्थिक गट व अपेक्षा यांचा विचार करावा.
 8. मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज बांधून भविष्यातील वाटचाल करावी.
 9. पर्यटकांसाठी जाहिरातीमध्ये आपल्याकडील सर्व वैशिष्ट्यांचा उल्लेख असावा.
 10. संभावित जोखमीचा अंदाज घ्यावा. कमीत कमी जोखीम असावी असे नियोजन करावे.
   

इतर कृषिपूरक
जनावरांतील मायांग बाहेर येण्याची समस्याम्हशीमधील मायांग बाहेर येण्याचे प्रमाण इतर बाकी...
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...