स्वयंपाकघर बागेतून होतील कुटुंबासाठी ताज्या भाज्या 
स्वयंपाकघर बागेतून होतील कुटुंबासाठी ताज्या भाज्या 

स्वयंपाकघर बागेतून होतील कुटुंबासाठी ताज्या भाज्या 

पंजाब कृषी विद्यापीठाने स्वयंपाकघरासाठी मातीशिवाय भाज्या वाढवण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यामधून कुटुंबाला वर्षभर ताज्या भाज्या उपलब्ध होऊ शकतील.  अलकडे कीडनाशकमुक्त आरोग्यदायी भाज्या शहरामध्ये उपलब्ध होण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. ज्यांच्याकडे काही प्रमाणात जागा आहे, त्यांच्यासाठी खास मातीविरहीत स्वयंपाकघर बागेचे एक प्रारूप विकसित केले आहे. कुटुंबाच्या पोषकतेच्या दृष्टीने या ताज्या भाज्या अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. त्याविषयी माहिती देताना पंजाब कृषी विद्यापीठातील मृदाविभागाचे प्रमुख डॉ. के. जे. सिंग यांनी सांगितले, की ज्या लोकांकडे घराभोवती थोडी जागा असेल, त्यांना सहजतेने राबवता येईल, असे प्रारूप विकसित केले आहे. यातून हंगामाव्यतिरीक्तही अनेक भाज्यांचे उत्पादन घेता येईल. घरगुती वापरासाठी असल्याने त्यावर कीडनाशकांच्या फवारणीची गरज नाही, परिणामी यातून उत्पादित झालेल्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतील. या बागेतून त्यांनी केवळ तीन महिन्यामध्ये सुमारे १५ किलो भाज्यांचे उत्पादन घेतल्याचा दावा त्यांनी केला.  प्रारूपची वैशिष्ट्ये ः 

  • भाज्यांच्या योग्य वाढीसाठी कोकोपीटचा वापर केला आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी १६ प्रकारचे पोषक घटक लागतात. काही वेळा त्यातील अनेक घटकांची कमतरता मातीमध्येही असते. मातीशिवाय लागवडीमध्ये भाजी पिकाला सर्व घटक पुरवले जात असल्यामुळे भाजी अधिक चांगली वाढते. 
  • हे प्रारूप वजनाने हलके असून, ते सहजतेने कोठेही नेता येते. 
  • यामध्ये वापरले गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर करता येतो. परिणामी, पाण्याची बचत होते. 
  • हे प्रारूप सर्व देशामध्ये प्रसारित करण्याचा डॉ. सिंग यांचा विचार आहे. सध्या हे तंत्र खासगी कंपनीला देण्यात आले असून, त्यांच्याद्वारे याची विक्री सुमारे ३५ हजार रुपये याप्रमाणे केली जात आहे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com