क्यूआर कोडसाठी अधिक जागरूकता हवी 

क्यूआर कोडसाठी अधिक जागरूकता हवी 
क्यूआर कोडसाठी अधिक जागरूकता हवी 

व्हिएतनाम येथील सुपर मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या शेतापासून विक्रीला आलेल्या मालाचे ट्रॅकिंग करण्यासाठी क्यूआर कोड पद्धतींचा अवलंब २०१८ च्या पूर्वार्धापासून सुरू झाला. नवीन पद्धती आणि बदल स्वीकारण्यामधील शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही पातळ्यांवर अनेक मर्यादा येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी चांगल्या तंत्रज्ञानावरील लोकांचा विश्वास उडून जाण्याची स्थिती उद्भवत असल्याचे अभ्यासामध्ये दिसून आले.  कोणत्याही सुपर मार्केट किंवा मॉलमध्ये उपलब्ध असलेल्या शेतीमालाचे मूळ, त्या शेतकऱ्याने वापरलेल्या पद्धती आणि घेतलेली काळजी याची उपलब्धता अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये क्यूआर कोड स्कॅनिंग केल्यानंतर ही माहिती ग्राहकांना पाहता येते. हा डोंग जिल्ह्यातील होआ बिन्ह सहकारी संस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फळे आणि भाज्यांच्या उत्पादनासोबतच विक्रीसाठी केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणारी ती देशातील पहिली सहकारी संस्था ठरली. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यानंतर केवळ तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या एका गटाने क्यूआर कोड तंत्राचा वापर करणे सोडून दिल्याचे संस्थेचे संचालक त्रिन्ह वान विन्ह यांनी सांगितले. या तंत्रामध्ये शेतकऱ्यांना पिकांच्या विविध टप्प्यांवर केलेल्या उपाययोजना आणि व्यवस्थापनाचा तपशील एक संगणकीय प्रणालीमध्ये भरायचा असतो. माहितीची अचूकता अत्यंत महत्त्वाची असून, त्याद्वारे ग्राहकांना त्या उत्पादनाचा विश्वास निर्माण होऊ शकतो. मात्र, साध्या ठशाच्या तुलनेमध्ये क्यूआर कोडसाठी तीन ते चार वेळा माहिती भरावी लागते. हे अधिकचे श्रम शेतकऱ्यांना घ्यावे लागतात.  चाचणीच्या काही काळानंतर व्हिएतनाममधील ग्राहकांनीही या तंत्रज्ञानामध्ये फारसा रस घेतला नसल्याचे समोर आले. सुपर मार्केटला भेट दिलेल्या १० पैकी केवळ एक-दोन लोकांना कोड स्कॅन करून माहिती पाहिली. या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही अधिक जागरूक करण्याची आवश्यकता आहे.  ग्राहकांचे मत...  प्रत्येक उत्पादनावर वेगवेगळ्या आकाराचे शिक्के आणि क्यूआर कोड दिसून येतात. अनेक ग्राहकांकडे कोड स्कॅन करण्यासाठी स्मार्टफोन असेलच असेही नाही. प्रत्येक उत्पादनाचे स्कॅनिंग करणे आणि माहिती पाहणे एवढा वेळही ग्राहकांपाशी असत नाही. तसेच या क्यूआर कोडच्या अचूकतेविषयीचा नेमका फरक आम्ही करू शकत नाही.  - न्गुयेन तू लिन्ह, ग्राहक, पीटी मार्ट, हा डोंग.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com