'क्यूआर कोड' देतो नारळ रोपांची खात्री !

क्यूआर कोड सांगते नारळ रोपांची अधिकृतता
क्यूआर कोड सांगते नारळ रोपांची अधिकृतता

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या कासारगोड (केरळ) येथील केंद्रीय वृक्षारोपण पीक संशोधन संस्थेतील संशोधकांनी नारळांच्या रोपांसाठी प्रथमच क्यूआर कोडचा वापर केला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर शेतकऱ्यांना रोपाची जात, दर्जा आणि लागवडीची पद्धत याविषयीची माहिती उपलब्ध होते. विविध पिकांचे नवीन किंवा सुधारित वाण विकसित झाल्यानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध होईपर्यंत दीर्घ काळ जातो. शासकीय किंवा विद्यापीठाच्या रोपांची उपलब्धता हंगामापूर्वी वेळेवर होत नाही. याचा फायदा उचलत खासगी रोपवाटिकाचालक दर्जाहीन रोपांची सर्रास विक्री करतात. बारमाही पिकांसाठी लागवडीच्या साहित्याची गरज पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत रोपवाटिका मान्यता कार्यक्रम राबवला असला, तरी या रोपांची सत्यता व गुणवत्ता याची खात्री करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. या रोपांवर क्यूआर कोडचा वापर करण्याचे तंत्र कासारगोड (केरळ) येथील केंद्रीय वृक्षारोपण पीक संशोधन संस्थेतील संशोधकांनी वापरले आहे. या क्यूआर कोडमुळे रोपाची योग्य ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवता येते. ठरावीक संकेत शब्दाच्या वापरातून तयार केलेले हे कोड ऑप्टिकल रीडरद्वारे स्कॅन केल्यास, शेतकऱ्यांना रोपांबद्दलची संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होते. दर्जाहीन रोपांमुळे होणारी फसवणूक टाळता येते. फक्त अधिकृत व्यक्तीच कोडमधील माहिती संपादित करू शकतात. केंद्रीय वृक्षारोपण पीक संशोधन संस्थेद्वारे मागील तीन वर्षांपासून क्यूआर कोड लेबलयुक्त नारळ रोपे वितरित केली जातात. हे लेबल ४ बाय २.५ सेंमी आकाराचे असून जलरोधक आहे. त्यावर केंद्रीय वृक्षारोपण पीक संशोधन संस्थेचे चिन्ह, रोपाच्या जातीचे नाव आणि दुसऱ्या बाजूला क्यूआर कोड असतो. प्रत्येक लेबलला एक विशिष्ट सांकेतिक क्रमांक (यूआयडी) देण्यात येतो. क्यूआर कोड वापरण्याची पद्धत ः

  • प्रथम फोनमध्ये क्यूआर कोड स्कॅनर ॲप उघडून क्यूआर कोड स्कॅन करावा.
  • कोड स्कॅन झाल्यानंतर एक लिंक मिळेल, जी आयसीएआर- सीपीसीआरआयच्या वेबसाइटपर्यंत घेऊन जाईल.
  • त्या वेबसाइटमध्ये पासवर्ड (विशिष्ट सांकेतिक क्रमांक) टाकल्यानंतर त्या रोपाबाबतची सर्व माहिती उपलब्ध होते. या माहितीमध्ये त्या रोपाचा दर्जा, जात आणि कोणत्या लागवडीसाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा, यांचा समावेश असतो.
  • क्यूआर कोडसाठी खर्च : नारळ रोपांसाठी क्यूआर कोड लेबलिंग तंत्र यशस्वी झाले आहे. अशा प्रकारे क्यूआर कोड लेबलचा वापर बारमाही पिके, फळझाडे आणि नगदी पिकांच्या लागवड साहित्यावर करणे शक्य आहे. मोठ्या प्रमाणात क्यूआर कोड लेबल तयार केल्यास त्याची किंमत ४ ते ४.५० रुपये इतकी कमी होऊ शकेल. नारळाच्या रोपांची किंमत २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान असल्यामुळे हा खर्च उत्पादक आणि शेतकरी दोघांनाही परवडू शकतो.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com