agriculture stories in marathi rabbi jwar plantation | Agrowon

नियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे....

डॉ.आदिनाथ ताकटे
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्‍यक आहे. हस्ताच्या पावसानंतर केलेली पेरणी फायदेशीर ठरते.

रब्बी ज्वारीच्या दर्जेदार उत्पादनासाठी संकरित व सुधारित जातींची निवड करावी. जमिनीच्या खोलीनुसार जातींची निवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात करावी. पाऊस आणि जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेल्या सुधारित/संकरित जातींची जमिनीच्या प्रकारानुसार लागवड करावी.

कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्‍यक आहे. हस्ताच्या पावसानंतर केलेली पेरणी फायदेशीर ठरते.

रब्बी ज्वारीच्या दर्जेदार उत्पादनासाठी संकरित व सुधारित जातींची निवड करावी. जमिनीच्या खोलीनुसार जातींची निवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात करावी. पाऊस आणि जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेल्या सुधारित/संकरित जातींची जमिनीच्या प्रकारानुसार लागवड करावी.

जमिनीच्या प्रकारानुसार जातीची निवड ः

१. हलकी जमीन ( खोली ३० सें.मी) ः फुले अनुराधा, फुले माऊली
२. मध्यम जमीन (खोली ६० सें.मी) ः फुले सुचित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी ३५-१,
३. भारी जमीन (६० सें.मी. पेक्षा जास्त) ः सुधारित वाण : फुले वसुधा, फुले यशोदा, सी. एस. व्ही. २२,
पी. कें. व्ही. क्रांती, परभणी मोती,
संकरित वाण : सी. एस. एच. १५ आणि सी.एस.एच. १९
४. बागायती ः फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही. १८,सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९
५. हुरड्यासाठी ः फुले उत्तरा, फुले मधुर
६. लाह्यांसाठी ः फुले पंचमी
७. पापडासाठी ः फुले रोहिणी

जातींची वैशिष्ट्ये ः

फुले अनुराधा ः
१) कोरडवाहू आणि हलक्या जमिनीत लागवडीस योग्य.
२) पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस.
३) अवर्षणास प्रतिकारक्षम
४) भाकरी उत्कृष्ट, चवदार
५) कडबा अधिक पौष्टीक व पाचक
६) खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
७) कोरडवाहू जमिनीत धान्य उत्पादन हेक्टरी ८-१० क्विं. व कडबा ३० -३५ क्विं.

फुले माउली ः

१) हलक्या व मध्यम जमिनीत लागवडीस योग्य
२) पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस
३) भाकरीची चव उत्तम
४) कडबा पौष्टीक व चवदार
५) धान्याचे उत्पादन ः हलक्या जमिनीत हेक्टरी ७-८ क्विं. व कडबा २०-३० क्विं.
६) धान्याचे उत्पादन ः मध्यम जमिनीत हेक्टरी १५-२० क्विं. व कडबा ४०-५० क्विं.

फुले सुचित्रा ः

१) मध्यम जमिनीसाठी शिफारस
२) पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस
३) उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत
४) धान्य उत्पादन २४-२८ क्विंटल व कडबा ६०-६५ क्विंटल

फुले वसुधा ः

१) भारी, कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी शिफारस
२) पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस
३) मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार दाणे
४) भाकरीची चव उत्तम
५) ताटे भरीव, रसदार व गोड
६) खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
७) कोरडवाहू धान्य उत्पादन ः हेक्टरी २४-२८ क्विं. व कडबा ६५-७० क्विं.
८) बागायती धान्य उत्पादन ः हेक्टरी ३०-३५ क्विं. व कडबा ७०-७५ क्विं.

फुले यशोदा ः

१) भारी जमिनीत लागवडीस योग्य
२) पक्व होण्याचा कालावधी १२० ते १२५ दिवस
३) पांढरेशुभ्र मोत्यासारखे चमकदार दाणे
४) भाकरीची चव चांगली
५) कोरडवाहू धान्य उत्पादन ः हेक्टरी २५-२८ क्विं. व कडबा ६०-६५ क्विं.
६) बागायती धान्य उत्पादन ः हेक्टरी ३०-३५ क्विं. व कडबा ७०-८० क्विं.

सी एस व्ही. २२ ः

१) भारी, कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी शिफारस
२) पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस
३) मोत्यासारखे चमकदार दाणे
४) भाकरीची चव चांगली
५) खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
६) कोरडवाहू उत्पादन ः हेक्टरी २४-२८ क्विं. व कडबा ६५-७० क्विं.
७) बागायती उत्पादन ः हेक्टरी ३०-३५ क्विं. व कडबा ७०-८० क्विं.

परभणी मोती ः

१) भारी, कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी योग्य
२) पक्व होण्याचा कालावधी १२५ ते १३० दिवस
३) मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार दाणे
४) खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
५) कोरडवाहू उत्पादन ः सरासरी प्रती हेक्टरी १७ क्विं. व कडबा ५०-६० क्विं.
६) बागायती उत्पादन ः सरासरी प्रती हेक्टरी ३२ क्विं. व कडबा ६०-७० क्विं.

फुले रेवती ः

१) भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस
२) पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस
३) मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार दाणे
४) भाकरीची चव उत्कृष्ट
५) कडबा पौष्टीक व अधिक पाचक
६) धान्य उत्पादन ः हेक्टरी ४०-४५ क्विं. व कडबा ९०-१०० क्विं.

मालदांडी ३५-१ ः

१) मध्यम खोल जमिनीत कोरडवाहू साठी योग्य
२) पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस
३) पांढरे चमकदार दाणे
४) भाकरीची चव चांगली
५) खोडमाशी प्रतिकारक्षम
६) धान्य उत्पादन ः हेक्टरी १५-१८ क्विं. व कडबा ६० क्विं.

फुले उत्तरा ः

१) हुरड्यासाठी शिफारस
२) हुरड्याची अवस्था येण्यास ९०-१०० दिवस
३) भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात
४) हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.

फुले पंचमी ः

१) लाह्याचे प्रमाण ( वजनानुसार ) ८७.४ टक्के
२) लाह्या मोठ्या प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात
३) खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
४) महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रामध्ये लाह्यांसाठी प्रसारित

पेरणीचे नियोजन ः

१) कोरडवाहू पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्‍यक आहे.
२) योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
३) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. बीज प्रकिया केल्यामुळे काणी रोग येत नाही. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व पीएसबी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
४) पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. ज्वारीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ सें.मी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र दोन चाड्यातून पेरावे.
५) अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ बाय १२ सें.मी.अंतरावर करावी. कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपातील अंतर २० सें.मी ठेवावे. पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.

संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
 


इतर कृषी सल्ला
उसामध्ये शून्य मशागतीसह तण व्यवस्थापनया वर्षी महापुरांच्या स्थितीमध्ये प्रचंड नुकसान...
एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची...पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर...
शेतीतंत्रामध्ये योग्य बदल आवश्यककोणत्याही पिकाच्या उत्पादनासाठी आवश्यक...
सुधारित पद्धतीने करावी बटाटा लागवडउत्तम उत्पादनासाठी बटाटा लागवडीमध्ये ठिबक किंवा...
हवामानबदलाच्या स्थितीत शेतीमध्ये बदल...सन १९५५ सालानंतर पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या...
पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी...हानिकारक पतंगवर्गीय किडींच्या बंदोबस्तासाठी...
कृषी सल्ला कोकण विभागभुईमूग    पेरणी अवस्था    भुईमुगाची लागवड...
विना नांगरण, तण व्यवस्थापनातून शेतीचे...सध्या रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. चालू वर्षी...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
तंत्र कांदा बीजोत्पादनाचे...बीजोत्पादनासाठी निवडलेले कांदे गोल, मध्यम किंवा...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)हवामान अंदाज ः पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील....
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात - पक्व अवस्था  पुढील काही दिवस पावसाची...
फवारणीकर्त्यांची सुरक्षितता महत्त्वाचीअवजारांची निगा, फवारणी करीत असता घ्यावयाची काळजी...
रब्बी पिकांसाठी सुक्ष्मअन्नद्रव्ये...महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्याने जस्त (३९...
बागेत डाऊनी, भुरी नियंत्रणावर लक्ष द्या...पुढील ६ ते ७ दिवस सर्वच द्राक्ष विभागांमध्ये...
द्राक्ष : रोगाच्या प्रादुर्भावाची...गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...