agriculture stories in Marathi Rabbi season, Safflower production technique | Agrowon

खत, पाणी व्यवस्थापनातून वाढवा करडई उत्पादन

डॉ. हनुमान गरुड डॉ. अजय किनखेडकर डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. शरद जाधव, डॉ. तानाजी वळकुंडे
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन, विरळणी आणि पाणी व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास करडईचे कोरडवाहूमध्ये १०-१२ क्विंटल प्रति हेक्टरी आणि बागायती परिस्थितीत १८-२० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन, विरळणी आणि पाणी व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास करडईचे कोरडवाहूमध्ये १०-१२ क्विंटल प्रति हेक्टरी आणि बागायती परिस्थितीत १८-२० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकामध्ये उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा वापर करणे फायदेशीर ठरते. करडईची लागवड नारंगी रंग व तेलासाठी केली जाते. करडई तेलातील लिनोलिक आम्ल रक्तातील कोलेस्टेरोलचे प्रमाण कमी करते.

कमी उत्पादकतेची कारणे :
प्रामुख्याने कोरडवाहू भागात लागवड, एकाच जमिनीत वारंवार एकच पीक घेणे, सुधारित वाणांचा कमी वापर, शिफारशीत खतमात्रेचा वापर न करणे, यांत्रिकीकरणाचा अभाव व पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष.

हवामान :
कोरडे हवामान करडई पिकास अनुकूल असते.
अतिउष्ण किंवा अतिथंड हवामान अयोग्य आहे.
शेतात पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही.

जमीन :
मध्यम ते भारी उत्तम निचरा होणारी निवडावी. क्षारयुक्त जमिनीतही हे पीक घेता येते.

पूर्वमशागत : खरीप पिकाच्या काढणीनंतर २-३ पाळ्या द्याव्यात.

बियाणे : प्रति हेक्टरी १०-१२ किलो

पेरणी :
सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी करावी. बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. वेळेवर पेरणी केल्यास कीड व रोग यांचा प्रादुर्भाव कमी होतो. दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी आणि दोन रोपातील अंतर २० सेंमी ठेवावे. ३ ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाणास चोळावे. (बीजप्रक्रिया)

खत व्यवस्थापन ः
कोरडवाहूसाठी प्रती हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद द्यावे. बागायतीसाठी प्रति हेक्टरी ६० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद द्यावे. खताच्या मात्रांपैकी निम्मे नत्र व पूर्ण स्फुरद पेरणीवेळी द्यावे. उर्वरित निम्मे नत्र ३० ते ३५ दिवसांनी पहिली पाण्याची पाळी देताना द्यावे.

विरळणी :
उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करणे आवश्यक आहे. अन्यथा झाडे लहान राहून उत्पादन घटते. विरळणी करताना चांगली जोमदार रोपे ठेवावीत. दोन रोपात २० सें. मी. अंतर ठेवावे.

आंतरमशागत :
पेरणीनंतर ३० दिवसांनी एक खुरपणी व एक कोळपणी करावी.
करडई पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी पेंडीमिथॅलीन ३० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. हेक्टरी ५०० लिटर पाणी वापरावे.

पाणी व्यवस्थापन :
हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे वाढीस कमी पाणी लागते. सुरवातीच्या काळात म्हणजेच ३० दिवसांनी व नंतर ६० दिवसांनी फुलोरा अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत वाढ होते.

(टीप- कीडनाशकांच्या शिफारसी लेबल क्लेम अथवा संयुक्त ॲग्रेस्को अंतर्गत आहेत.)

डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३
(विषय विशेषज्ञ- कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव.

करडईच्या सुधारित जाती

करडईची सोटमुळे जमिनीत खोलवर जातात. मातीतील खोलीवरील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतात. परिणामी अवर्षणप्रवण भागात कमी पावसाच्या स्थितीतही या पिकापासून हमखास उत्पादन मिळू शकते. आपला विभाग, कोरडवाहू, बागायती यानुसार योग्य अशा सरळ किंवा संकरित वाणाची निवड करावी.

सुधारित वाण

अ.क्र सरळ वाण / संकरित वाण कालावधी (दिवस) उत्पादन (क्विं./हे.) विशेष गुणधर्म
  सरळ वाण      
1 भीमा १३० - १३५ १३ - १५ कोरडवाहू क्षेत्रास योग्य
2 फुले – कुसुमा १३५ – १४० १४ - १६ कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली योग्य
3 एस.एस.एफ.६५८ ११५ – १२० १२ - १३ बिगर काटेरी, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी योग्य.
4 एस.एस.एफ.७०८ ११५ – १२० कोरडवाहू १३-१५ बागायती २०-२२ पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य कोरडवाहू तसेच बागायती
5 फुले करडई- ७३३ १२० - १२५ १३ – १५ कोरडवाहू लागवडीसाठी
6 फुले चंद्रभागा (एस.एस.एफ.७४८) १३०-१४० कोरडवाहू १३-१५ बागायती २०-२२ कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
7 एस.एस.एफ.१२-४० १२० - १२५ कोरडवाहू १३-१५ बागायती २०-२२ तेलाचे प्रमाण अधिक , अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
8 पी.बी.एन.एस. १२ १३५ – १३७ १२ - १५ मराठवाडा विभागास योग्य
9 नारी-६ १३० – १३५ १० – १२ बिन काट्याची, पाकळ्या गोळा करण्यास योग्य
10 अकोला पिंक १३० – १३५ १२ – १५ विदर्भात लागवडीसाठी प्रसारित
संकरित वाण      
11 नारी एन.एच.-१ १३० – १३५ १२ – १४ संकरित वाण

डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९०
( विषय विशेषज्ञ - कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर.)


इतर तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगाची शास्त्रीय लागवड पद्धतखरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात जास्त...
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड...भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
उन्हाळी भुईमूगाचे लागवड तंत्रउन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि...
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापनसध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा...
करडईची सुधारित लागवड करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
खत, पाणी व्यवस्थापनातून वाढवा करडई...योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन, विरळणी आणि...
सुधारित जवस वाणांची लागवड कराजवसाच्या सुधारित वाणाची निवड केल्यास...
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन...गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक...
सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रणसद्य परिस्थितीत सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असून...
सोयाबीन पिकांवरील किडींचे एकात्मिक...सोयाबीन पिकात ९० ते ११० दिवसात येणाऱ्या ...
सोयाबीन पाने पिवळी पडण्याचे कारण जाणून...यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस...
तीळ लागवड तंत्रतीळ हे भारतातील सर्वांत जुने तेलबिया पीक आहे....
सोयाबीन लागवडीतील समस्यावरील उपाययोजनासोयाबीनचे योग्य वाण निवडताना... सध्या बाजारात...
सूर्यफूल लागवड नियोजन जमीन : सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
रुंद वरंबा सरी पद्धती भुईमुगासाठी आहे...भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या...