सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी बनवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील

पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर सर्वमान्य अशी यादी बनवण्याचे नियोजन शास्त्रज्ञ करत आहे. या यादीमध्ये सस्तन प्राणी, पक्षी या पासून वनस्पती, बुरशी आणि सूक्ष्मजीवांचाही समावेश करण्यात येणार आहे.
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी बनवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी बनवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील

पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर सर्वमान्य अशी यादी बनवण्याचे नियोजन शास्त्रज्ञ करत आहे. या यादीमध्ये सस्तन प्राणी, पक्षी या पासून वनस्पती, बुरशी आणि सूक्ष्मजीवांचाही समावेश करण्यात येणार आहे. या सर्व घटकांचे वर्गीकरण नेमके कशा प्रकारे करावे, याबाबत गेल्या शतकापेक्षाही अधिक काळापासून शास्त्रज्ञांमध्ये वाद आहेत. त्याच प्रमाणे जैवविविधतेच्या दृष्टीने निर्माण होत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी अशा सर्वमान्य यादीची आवश्यकता भासत आहे. जीवशास्त्रज्ञांमध्ये सर्व सजिवांच्या वर्गीकरणाबाबत फारसे एकमत झालेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर, संशोधक आणि संवर्धक यांच्या प्रत्येकाच्या वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत. त्यात वेगळे निकष (taxonomic descriptions) वापरण्यात आले आहेत. उदा. आफ्रिकन हत्तीच्या जंगलातील हत्ती आणि सवाना हत्ती अशा दोन वेगळ्या प्रजाती दाखवल्या जातात. मात्र, बहुतांश आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाप्रमाणे संवर्धक संस्था केवळ एक प्रजाती असल्याचे मांडते. ऑस्ट्रेलियातील चार्ल्स डार्विन विद्यापीठ येथील संवर्धन आणि शाश्वत सजीव या विषयाचे प्रो. स्टिफन गार्नेट यांनी सांगितले, की सर्वसामान्यपणे वेगळ्या दिसणाऱ्या सजिवांना वेगळी प्रजाती मानतात. मात्र, अनेक जातींमध्ये काही काळाच्या अंतरामध्ये आलेले किरकोळ बदल असतात. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या प्रजातींच्या व्याख्येनुसार ज्या जिवंत प्रजाती आपली गुणसूत्रे पुनरुत्पादनातून आपल्या पुढील पिढीमध्ये पाठवत असतात. मात्र, अनेक घटनांमध्ये प्रजातींच्या पूर्वसुरींची साखळी ज्ञात असत नाही. परिणामी शोध घेणाऱ्या संशोधकांमध्ये त्यांचे नाव आणि वर्गीकरण या संदर्भात मतभेद होतात. नव्या जनुकीय विश्लेषण पद्धतीतून ज्या प्रजाती एक मानल्या जात होत्या, त्या प्रत्यक्षात वेगळ्या असल्याचे आढळले आहे. सुमारे ९० टक्के प्रजाती या नैसर्गिक असून, त्या एकमेकांमध्ये आंतरप्रजनन करत नाहीत. मात्र, १० टक्के प्रजाती या बदलत्या आहेत. अशा वेळी नेमक्या प्रजाती ठरवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. यादीबाबत १० तत्त्वे संशोधकांच्या गटाने जागतिक पातळीवरील प्रजातींची यादी करण्यासाठी सर्वमान्य होतील अशी दहा तत्त्वे तयार केली आहेत. ती जर्नल प्लॉस बायोलॉजी मध्ये प्रकाशित केली आहेत.

  • १) प्रजाती यादी ही शास्त्रीय घटकांवर आधारीत असावी. त्यात टॅक्सानॉमिक नसलेल्या मान्यता व हस्तक्षेप नसावा.
  • २) प्रजातींची यादी नियमित करण्याचा उद्देश हा समुदायांच्या साहाय्य आणि वापर हाच असावा.
  • ३) यादीसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय हे पूर्णपणे पारदर्शक असावेत.
  • ४) प्रजातींची मान्यताप्राप्त आणि नव्या प्रजातींना नाव देण्याची यादी हे वेगळी असावी आणि ती वेगळी नियमित करावी.
  • ५) मान्य केलेल्या प्रजातींची यादी नियमित करण्याच्या प्रक्रियेचा संस्थात्मक स्वतंत्रतेवर ताण येऊ नये.
  • ६) ठरवलेल्या निकषांची यादी हे प्रजातींची सीमारेषा स्पष्ट करण्यास पुरेशी असावी. ती बदलत्या गटानुसार बदलणारी नसावी. उलट शक्य तितकी शाश्वत असावी.
  • ७) जागतिक यादीमध्ये मतभेद असलेल्या गरजांचे संतुलन असावे. (उदा.संवर्धित केल्यानंतर होणाऱ्या आर्थिक आणि स्थिरता बाबत गरजा)
  • ८) सहभागी लोकांना आवश्यक ती ओळख असावी.
  • ९) यादीतील माहितीचा मागोवा घेणे शक्य असावे.
  • १०) जागतिक यादी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जागतिक पातळीवर सर्व जैवविविधता आणि त्याच वेळी स्थानिक पातळीवरील विविधतेबाबतची माहिती यांचा समन्वय असावा.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com