agriculture stories in marathi, rice & fish culture | Agrowon

भातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र 

किरण वाघमारे, सचिन कुरकुटे 
रविवार, 25 ऑगस्ट 2019

भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन करण्याची पद्धत अनेक भात उत्पादक देशांमध्ये आहे. त्यासाठी लागवडीमध्ये किंचित बदल करण्याची आवश्यकता आहे. भातासोबत मत्स्यशेती केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवणे शक्य होणार आहे. 

भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन करण्याची पद्धत अनेक भात उत्पादक देशांमध्ये आहे. त्यासाठी लागवडीमध्ये किंचित बदल करण्याची आवश्यकता आहे. भातासोबत मत्स्यशेती केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवणे शक्य होणार आहे. 

खरिपामध्ये अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये भात हे मुख्य पीक ठरते. भातशेतीच्या बांधामध्ये अनेक वेळा ९ ते १२ इंचांपर्यंत पाणी भरलेले असते. या पाण्यामध्ये मासे पाळणे शक्य आहे. अतिपूर्वेकडील जपान, चीन, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांमध्ये शतकानुशतके भातशेतीमध्ये मत्स्यपालन केले जाते. आपल्या देशातही केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, ओडिशा, पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये भात व मत्स्यशेती एकत्रितपणे करण्याच्या काही पद्धती थोड्याफार प्रमाणात वापरात आहेत. या पूर्वापार चालणाऱ्या पद्धतींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला असता काही विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये भात खाचरांत मासे पाळणे किफायतशीर उपक्रम होऊ शकत असल्याचे समोर आले आहे. 

महाराष्ट्रातील कोकण व विदर्भातील गडचिरोली, भंडारा इ. जिल्हे भात पिकवणारे प्रदेश म्हणून ओळखले जातात. कोकण व विदर्भातील काही ठिकाणी दुबार भात पीकही घेतले जाते. या दोन्ही प्रदेशांतील सरासरी पावसाचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. भात व मासे एकमेकांना पूरक असून, भाताच्या खाचरांमध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासे जगू व वाढू शकतात. भात शेतीच्या बांधामध्ये साधारणपणे ९ ते १२ इंचांपर्यंत पाणी कायम ठेवण्याची पद्धत आहे. या पाण्याचा उपयोग मत्स्यशेतीसाठी केल्यास भातशेतीला मत्स्य उत्पन्नाची जोड मिळेल. 

भातामध्ये मत्स्यशेती करण्याची पद्धत ः 

भात शेतीच्या बांधाच्या उताराकडील भागात बांधाच्या रुंदीइतका लांब आणि कमीत कमी ६ ते ८ फूट रुंदीचा आणि १.५ ते २ फूट खोलीचा खड्डा खोदावा. त्यात पाणी मुबलक प्रमाणात राहू शकते. भाताची बांधी समतल आहे, अशा ठिकाणी खड्डा न खोदता भात शेतीच्या बांधाला लागून सर्व बाजूने कमीत कमी ३ फूट रुंद आणि १.५ ते २ फूट खोल चर (खड्डा) खोदावा. 
भाताचे दुसरे पीक घेताना जमिनीची नेहमीप्रमाणे, पण काळजीपूर्वक मशागत करावी. भात रोवणीनंतर पाणी घेतल्यावर खड्ड्यातील मासे परत सर्वत्र भात शेतीत मुक्तपणे फिरू शकतात. 
भात कापणीच्या वेळी पाणी कमी करावे लागते, अशावेळी मासे खड्ड्याचा आसरा घेतात. 
भाताची दोन्ही पिके साधारणपणे १२० ते १४० दिवसाची असावीत. माशांच्या वाढीकरिता हा काळ चांगला आहे. या कालावधी दरम्यान माशांची वाढ साधारणत: एक ते दीड किलोपर्यंत होते. 
भात शेतीकरिता सायप्रिनस या जातीचे मासे मुख्यतः वापरले जातात. या माशांना जमीन उकरण्याची सवय असल्याने भात किंवा धानाच्या मुळाशी सतत माती उकरली जते. परिणामी मुळांना भरपूर प्रमाणात खतासोबत प्राणवायू मिळून रोपांची वाढ झपाट्याने होते. 
आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील प्रयोगानुसार भात व मत्स्य एकत्रित शेतीमुळे भाताच्या उत्पादनात २ ते ३ पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 
पावसामुळे खाचरामध्ये जास्त पाणी भरल्यास बांधाला धोकादायक होऊ शकते. पाण्याच्या प्रवाहामुळे बांधाचे नुकसान होऊ नये, याकरिता पाणी बाहेर काढण्याच्या ठिकाणी जाळी लावून घ्यावी. त्याचप्रमाणे पाणी शेतात घेण्याच्या व बाहेर काढण्याच्या ठिकाणी जाळीची चौकट बसवावी. म्हणजे पाण्यासोबत मासे भात खाचराबाहेर जाणार नाहीत. 

भात-मत्स्यशेतीसाठी उपयुक्त मासे - 
१. सायप्रिनस, तिलापिया, मरळ किवा भारतीय प्रमुख कार्प (कटला, रोहू व मृगल) मासे उपयुक्त ठरतात. 
२. या जातींच्या ५० ते १०० मि.मी. बीजांची साठवणूक योग्य ठरते. 
३. प्रतिहेक्टरी ५००० नग बीज आपण वाढवू शकतो. 

भात-मत्स्यशेतीचे फायदे - 
१. मत्स्यशेतीमुळे भाताच्या उत्पादनात २-३ पटीने वाढ होते. 
२. भाताच्या उत्पन्नाबरोबरच मत्स्योत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. 
३. माशांद्वारे अत्यंत कमी खर्चात पौष्टिक आणि प्रथिनयुक्त खाद्य उपलब्ध होऊ शकते. 
४. मासे वाढीकरिता वेगळे खत टाकावे लागत नाही. भातासाठी माशांच्या विष्ठेद्वारे अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. मासे पाण्यातील किडीच्या अवस्था, अळ्यांना खातात. परिणामी किडीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. 

भात मत्स्यशेतीत काय करावे- 
१. भाताच्या रोपांची लागवड पूर्ण झाल्यानंतर ४-५ दिवसांनी भात खाचरांत बोटुकली सोडावी. 
२. शक्य असल्यास माशांना पूरक खाद्य वजनाच्या २% या प्रमाणत दररोज २ वेळा देण्यात यावे. 

भात-मत्स्यशेतीत हे करू नये 
१. कीटकनाशकाचा वापर करू नये. 
२. निंदणासाठी तणनाशकांचा वापर करू नये. 
३. भात काढून घेतल्यानंतर दुबार पिकाच्या मशागतीसाठी जास्त वेळ लावू नये. 
४. भाताचे उत्पादन घेतल्यानंतर त्वरित मासेमारी करू नये. योग्य वाढ होईपर्यंत थांबून त्यांची विक्री केल्यास उत्पन्नामध्ये वाढ होते. 

किरण वाघमारे, ९८८१६००९५१ 
सचिन कुरकुटे, ९२२६३९३०३२ 

(साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, अहेरी, गडचिरोली) 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
मातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्रमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत...
बैलचलित अवजारे ठरताहेत फायदेशीरशेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना महाराष्ट्रामध्ये शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक...
गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रेग्रामीण पातळीवर दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय...
भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेतीबहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
बहुपयोगी पॉवर टिलरपॉवर टिलरमधील रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे...
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक...काढणीपश्चात अन्नधान्यांच्या साठवणीमध्ये अधिक...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठीची यंत्रेटोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे...
छतावरील पर्जन्यजल संचय तंत्रातून १४ लाख...जालना कृषी विज्ञान केंद्राने ‘रुफ टॉप वॉटर...
धान्य, हळद साठवणुकीसाठी हर्मेटिक...हर्मेटिक तंत्रज्ञान हे धान्य, मसाले आणि हळद...
काजूच्या टरफलापासून औद्योगिक तेलनिर्मितीजिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा...
भारतीय शेतकऱ्यांपर्यंत नेणार जागतिक...देशात आधुनिक शेती व फळबागांचा विस्तार होत...
उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा ‘शिवार सोप' आपल्याकडे शेळीपालन हे प्रामुख्याने मांसासाठी केले...