agriculture stories in Marathi Rice has many fathers but only two mothers | Agrowon

दोनच मातृकुळापासून सर्व भातजातींची उत्पत्ती

वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

सर्व भात जाती या मूळ दोन मातृजनुकीय संरचनेतून तयार झाल्या असल्याचे दिसून आले आहे.

क्विन्सलॅंड विद्यापीठातील संशोधकांनी ३ हजारापेक्षा अधिक भात जातींची अभ्यास केला असून, त्यातील जैवविविधतेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अभ्यासामध्ये सर्व भात जाती या मूळ दोन मातृजनुकीय संरचनेतून तयार झाल्या असल्याचे दिसून आले आहे.

जगातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येचे मुख्य अन्न हे भात आहे. लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी तिसऱ्या क्रमांकाचे पीक हे भात असून, दरवर्षी ६३० दशलक्ष टन उत्पादन घेतले जाते. लोकांच्या आहारातील या महत्त्वाच्या पिकाची जैवविविधताही मोठी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात भाताचे उत्पादन घेतले जात असल्याने हजारो भात जाती लागवडीखाली आहेत. या सर्व भातजातींचे मूळ शोधण्याचा प्रयत्न क्विन्सलॅंड विद्यापीठातील प्रो. रॉबर्ट हेन्री व सहकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी ३००० पेक्षा अधिक भातजातींचा अभ्यास केला आहे. ही सर्व जैवविविधता मुळांमध्ये दोन मातृकुळातून तयार झाली असल्याचे त्यांना आढळून आले. परिसरातील वातावरणानुसार भातजातींमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. हे बदल नेमके कसे झाले असावेत, याची माहिती मिळवण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.
हे संशोधन ‘बीएमसी प्लॅंट बायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

निष्कर्ष ः

प्रो. रॉबर्ट हेन्री यांनी दिलेल्या माहितीनुसार,

  • अस्पर्श अशा जंगली भात जातींच्या स्थानिकीकरणातून लक्षावधी वर्षापूर्वी दोन वेगळ्या भात वंशावळी (लाईन्स) तयार झाल्या असाव्यात. त्यानंतर गेल्या ७ हजार वर्षापासून माणसांने भाताची शेती सुरू केल्यानंतर त्यांचे अधिक स्थानिकीकरण होत अन्य जाती तयार होत गेल्या असाव्यात.
  • या मुख्य दोन भातजातींचा संकर आशियातील स्थानिक जंगली भात जातींशी होत गेला आहे. ही प्रक्रिया शेतीतील भात आणि परिसरातील अन्य जंगली भात जाती यांतील परागीकरणाद्वारे घडत गेली. त्यातून स्थानिक जंगली जातीही तयार होत गेल्या.
  • शेतीतील भाताची जपणूक बियांच्या स्वरूपामध्ये प्राधान्याने केली गेला. त्यातून दोन मूळ मातृ जनुकीय गुणधर्म पुढे येत गेले असावेत. अर्थात, या स्थानिक जंगली जाती लागवडीखालील स्थानिक भातजातीप्रमाणेच (गुणधर्मांच्या दृष्टीने) तयार होत गेल्या.
  • वातावरण बदल आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीने भातांची पैदास करताना भातांच्या जैवविविधता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जंगली जातीतील विविध गुणधर्म वातावणाशी मिळते, जुळते आणि अधिक काटकतेसाठी महत्त्वाचे आहेत. स्थानिक जाती आणि जंगली जाती यातील पूल या संशोधनामुळे स्पष्ट झाला आहे. सध्या आम्ही गणित तज्ज्ञांची मदत घेऊन भाताच्या माहिती साठ्याचे विश्लेषण करत आहोत. त्यातून भारतीय उपखंडातील बासमती आणि जॅपोनिका भात जाती यातील नेमका फरक लक्षात येईल.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...