agriculture stories in marathi, Rice irrigation worsened landslides in deadliest earthquake of २०१८ | Agrowon

भातपिकातील सिंचन भूस्लखनासाठी ठरू शकते कारणीभूत
वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

भात पिकामध्ये दिलेल्या सिंचनामुळे इंडोनेशियन बेट सुलावेसी येथील २०१८ मध्ये झालेल्या भूकंपाला लक्षणीयरीत्या गती दिल्याचे नाययांग तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या सहकार्याने केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. या बेटावरील पालू येथे दरड कोसळण्याच्या प्रमाणामध्येही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भात पिकामध्ये दिलेल्या सिंचनामुळे इंडोनेशियन बेट सुलावेसी येथील २०१८ मध्ये झालेल्या भूकंपाला लक्षणीयरीत्या गती दिल्याचे नाययांग तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या सहकार्याने केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. या बेटावरील पालू येथे दरड कोसळण्याच्या प्रमाणामध्येही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

इंडोनेशिया देशातील शहरांमध्ये २८ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या ७.५ रिश्च्टर स्केल इतक्या क्षमतेच्या भूकंपामुळे सुमारे ४३०० लोक मृत्युमुखी पडले होते. या भूकंपामुळे पुढे अनेक दिवस पालू खोऱ्यांमध्ये दरडी कोसळण्याचे अनेक प्रकार सातत्याने होत राहिले. अशा भूस्लखनाच्या घटना आणि हानिकारक भूकंपाचा अभ्यास सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील अर्थ ऑब्जर्वेटरी ऑफ सिंगापूर आणि एशियन स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंट यांनी इंडोनेशिया, अमेरिका, ब्रिटन, चीन आणि ऑस्ट्रेलिया येथील संस्थांच्या सहकार्याने केला आहे.

पालू या परिसरामध्ये भात हे पीक प्राधान्याने घेतले जाते. यासाठी गेल्या काही शतकांपासून जुन्या अशा पारंपरिक पाण्याच्या कालव्यांनी पाणी पोचवले जाते. या सिंचनामुळे भात पिकापासून शाश्वत उत्पादन मिळत असले तरी भूकंपाला चालना देणारे ठरत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

या पाण्यांमध्ये येणारे चिखल, गाळ, छोटे दगड यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. हे सातत्याने वाहत असलेले पाणी इंडोनेशिया येथील योग्यकार्ता (२००६) सारख्या भूकंपासाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले होते.

त्याविषयी माहिती देताना डॉ. कायेल ब्रॅडले यांनी सांगितले, की ज्या भागामध्ये भूपोकळ्या आणि कार्यरत असे भूस्तर आहेत, त्याची सांगड सिंचनाशी होत असल्यास त्याचा पर्यवसन भूकंपामध्ये होऊ शकते. हे इंडोनेशिया भूकंपाचा जागतिक पातळीवर अशा ठिकाणांसाठी धोक्याचा इशारा आहे. पाण्याचे प्रवाह आणि त्याच्याशी संबंधित दरडी कोसळणे याबाबत लोकांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. विशेषतः ज्या भागामध्ये सिंचनामुळे कृत्रिमरीत्या भूजल स्तर वाढतो, अशा ठिकाणी धोक्याचे प्रमाण वाढू शकते. आग्नेय आशियातील भात उत्पादक देशांमध्ये अशी स्थिती असल्याने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या भागामध्ये अधिक वेगवान आणि कमी कालावधीमध्ये येणाऱ्या मोठ्या भूकंपामागे हेच कारण असू शकते. अर्थात, या ठिकाणी अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

या अभ्यासासाठी प्राचीन नोंदी आणि सध्याच्या उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग केला आहे. उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीची प्रत्यक्ष भूस्लखनाच्या प्रक्षेत्रामध्ये निरीक्षणे, नोंदी यांच्या साह्याने खातरजमा करण्यात आली. येथील स्थानिक सिंचनाच्या पद्धतींची माहिती त्सुनामी आणि आपत्ती निवारण संशोधन केंद्र (सियाह कौला युनिव्हर्सिटी) येथील शास्त्रज्ञ डॉ. इला मेईलियांडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली. उपग्रहाकडून मिळालेल्या भूकंपपूर्व आणि पश्चात प्रतिमांचे विश्लेषण करून सातत्याने दरडी कोसळणाऱ्या प्रदेशांची ओळख पटवण्यात आली. पुढे त्याची सांगड ही तेथील स्थिर अशा झाडांबरोबरच भात पीक, सिंचन क्षेत्र आणि त्यामुळे वाढलेला भूजल स्रोत यांच्याशी घालण्यात आली. या संशोधनाचे निष्कर्ष नेचर जिओसायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

सामान्यतः मानवी हस्तक्षेपामुळे घडणाऱ्या भूकंपासारख्या विविध घटना या नैसर्गिक सदरामध्ये टाकल्या जातात. मात्र, भविष्यामध्ये केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून त्याकडे अपेक्षीत लक्ष न देणे मानवजात म्हणून आपल्याला परवडणारे नाही. इंडोनेशियातील भूकंपामागील कारणांची आणखी खातरजमा करून योग्य त्या उपाययोजना राबवल्यास त्यातून भविष्यातील मोठ्या भूस्लखनाच्या घटना टाळणे शक्य होईल.
- डॉ. कायेल ब्रॅडले

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे...नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत...
किमान तापमानात घट; विदर्भात थंडीत वाढमहाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढत आहे. या आठवडाच्या...
परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...