agriculture stories in marathi, rice stem borar problem | Agrowon

भातावरील खोडकिडीचे एकात्मिक नियंत्रण 

आर. डी. चव्हाण, डॉ. एन. एस. देशमुख 
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रात कोकणासह पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांत प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. भाताच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणांपैकी या पिकावर येणाऱ्या किडी हे एक मुख्य कारण आहे. भात पिकावर रोपवाटिकेपासून भातकापणीपर्यंत विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पूर्व विदर्भात भात पिकाला दुसरा पर्याय नसल्यामुळे पीक फेरपालट होत नाही. अनेक वेळा पाण्याची सोय असल्यामुळे उन्हाळी भाताचेही उत्पादन घेतले जात असल्याने किडीसाठी पर्यायी खाद्य उपलब्ध होते. परिसरातील अन्य वनस्पतींवर किडींच्या असंख्य पिढ्या अखंड उपजीविका करत असतात.

महाराष्ट्रात कोकणासह पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांत प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. भाताच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणांपैकी या पिकावर येणाऱ्या किडी हे एक मुख्य कारण आहे. भात पिकावर रोपवाटिकेपासून भातकापणीपर्यंत विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पूर्व विदर्भात भात पिकाला दुसरा पर्याय नसल्यामुळे पीक फेरपालट होत नाही. अनेक वेळा पाण्याची सोय असल्यामुळे उन्हाळी भाताचेही उत्पादन घेतले जात असल्याने किडीसाठी पर्यायी खाद्य उपलब्ध होते. परिसरातील अन्य वनस्पतींवर किडींच्या असंख्य पिढ्या अखंड उपजीविका करत असतात. खोडकिडा ही यातील एक मुख्य कीड असून, तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे. 

खोड किडा : 
या किडीचा पतंग १ ते २ से.मी. लांब, समोरील पंख पिवळे व मागील पांढरे असे असतात. मादी पतंगाच्या पंखाच्या खालील भागावर काळसर ठिपका असतो; तर नर पतंगाच्या पंखावर काळसर ठिपका नसतो. 

नुकसानीचा प्रकार : 
सुरवातीच्या काळात अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करून नंतर खोडात प्रवेश करते. आतील भाग पोखरून खाते. परिणामी, फुटवा सुटण्यास सुरवात होतेवेळी रोपाचा गाभा मरतो. यालाच ‘डेट हर्ट’ किंवा ‘कीडग्रस्त फुटवा’ असे म्हणतात. या रोपाचा फुटवा ओढल्यास सहजासहजी निघून येतो. पीक तयार होण्याच्या वेळी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात. या लोंब्यांना कोकणात ‘पळिंज’ तर विदर्भामध्ये ‘पांढरी पिशी’ असे म्हणतात. 

आर्थिक नुकसानीची पातळी : 
१) पुनर्लागवड झाल्यानंतर त्वरित : ५ % कीडग्रस्त फुटवे किंवा एक अंडीपुज प्रति चौ.मी. दिसल्यास 
२) फुटवा मध्यावस्थेत : ५% सुकलेले फुटवे 
३) लोंब्याच्या तयार होण्याच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत : १ पतंग प्रति चौ.मी. 

एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन : 
१) खोडकिडा प्रतिकारक धानाच्या जाती उदा. साकोली-८, सिंदेवाही-५, रत्ना या जातीची लागवड करावी. 
२) रोवणीपूर्वी रोपांचे शेंडे तोडून बांबूच्या टोपलीत जमा करावीत. ती टोपली खांबावर टांगावी, त्यामुळे रोपाच्या शेंड्यावर असणारी खोडकिड्याची अंडी नष्ट होण्यास मदत होते. 
३) रोपांची मुळे रोवणीपूर्वी क्‍लोरपायरीफॉस (२०% प्रवाही) १ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत. नंतर रोवणी किंवा लागवड करावी. 
४) पिकाची वरचेवर पाहणी करून कीडग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत. हे काम हंगामातून तीन ते चार वेळा करावे. 
५) शेतात पक्षीथांबे लावावेत. 
६) जर शेतामध्ये ५% कीडग्रस्त फुटवे दिसल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी 
क्विनॉलफॉस ३.२ मिली 
७) शक्‍य असल्यास ट्रायकोग्रामा जपोनिकम या परोपजिवी किटकाची हेक्‍टरी अंडी ५० हजार या प्रमाणात दर ७ ते ८ दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा शेतात सोडावे. 
८) भातकापणी जमिनीलगत करावी. वापसा झाल्यावर नांगरणी करून धसकटे गोळा करून ती जाळून टाकावीत. 

संपर्क ः 
आर. डी. चव्हाण, ८४८४९८४१२० 
डॉ. एन. एस. देशमुख, ८२०८१६६७६६ 

(कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, गोदिंया.) 


इतर कृषी सल्ला
उसामध्ये शून्य मशागतीसह तण व्यवस्थापनया वर्षी महापुरांच्या स्थितीमध्ये प्रचंड नुकसान...
एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची...पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर...
शेतीतंत्रामध्ये योग्य बदल आवश्यककोणत्याही पिकाच्या उत्पादनासाठी आवश्यक...
सुधारित पद्धतीने करावी बटाटा लागवडउत्तम उत्पादनासाठी बटाटा लागवडीमध्ये ठिबक किंवा...
हवामानबदलाच्या स्थितीत शेतीमध्ये बदल...सन १९५५ सालानंतर पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या...
पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी...हानिकारक पतंगवर्गीय किडींच्या बंदोबस्तासाठी...
कृषी सल्ला कोकण विभागभुईमूग    पेरणी अवस्था    भुईमुगाची लागवड...
विना नांगरण, तण व्यवस्थापनातून शेतीचे...सध्या रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. चालू वर्षी...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
तंत्र कांदा बीजोत्पादनाचे...बीजोत्पादनासाठी निवडलेले कांदे गोल, मध्यम किंवा...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)हवामान अंदाज ः पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील....
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात - पक्व अवस्था  पुढील काही दिवस पावसाची...
फवारणीकर्त्यांची सुरक्षितता महत्त्वाचीअवजारांची निगा, फवारणी करीत असता घ्यावयाची काळजी...
रब्बी पिकांसाठी सुक्ष्मअन्नद्रव्ये...महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्याने जस्त (३९...
बागेत डाऊनी, भुरी नियंत्रणावर लक्ष द्या...पुढील ६ ते ७ दिवस सर्वच द्राक्ष विभागांमध्ये...
द्राक्ष : रोगाच्या प्रादुर्भावाची...गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...