agriculture stories in marathi, Ring garden for desalination, biomass, vegetable production | Agrowon

तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!

वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता करण्यासोबत, वन्यजीवांचा रहिवास, हवेची शुद्धता, कर्बवायूंचे शोषण अशा अनेक अंगाने अत्यंत महत्त्वाची ठरते. येत्या भविष्यामध्ये लोकसंख्या वाढत जात असताना शेतीखालील क्षेत्र मर्यादित राहणार आहे. अशावेळी पर्माकल्चर सर्कल्स किंवा रिंग गार्डन ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते.

जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता करण्यासोबत, वन्यजीवांचा रहिवास, हवेची शुद्धता, कर्बवायूंचे शोषण अशा अनेक अंगाने अत्यंत महत्त्वाची ठरते. येत्या भविष्यामध्ये लोकसंख्या वाढत जात असताना शेतीखालील क्षेत्र मर्यादित राहणार आहे. अशावेळी पर्माकल्चर सर्कल्स किंवा रिंग गार्डन ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते.

सध्या केवळ संकल्पनात्मक पातळीवर असलेल्या या तंत्रामध्ये खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यामध्ये रूपांतर, सौर ऊर्जेचा पुरेपूर वापर, अन्न उत्पादन यांचा विचार करण्यात आला आहे. विशेषतः कॅलिफोर्नियासारख्या दुष्काळग्रस्त किनाऱ्यावरील भागांमध्ये त्याचा वापर अधिक फायदेशीर ठरू शकते.
या रिंग गार्डनमध्ये फिरती संरचना असणार आहे. पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर त्यातून प्रतिवर्ष १६ दशलक्ष गॅलन (६०.५ दशलक्ष लिटर) शुद्ध पाणी, ४० हजार पौंड (१८१४३ किलो ) पिकांचे उत्पादन, ११ हजार पौंड (४९८९ किलो ) चारा जनावरांसाठी उपलब्ध होईल.

सध्या दुष्काळी स्थितीमुळे कॅलिफोर्नियाच्या सुमारे ८० टक्के भागाला पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. या दोन्ही घटकांवर मात करण्यासाठी ॲलेक्झांन्ड्रू प्रेडोन्यू यांनी सौर ऊर्जेवर आधारित फिरता निक्षारीकरण प्रकल्प आरेखित केला आहे. यामध्ये सॅण्टा मोनिका या शहरासाठी केवळ पिण्यासाठीच नव्हे, तर शेतीसाठीही पाण्याची उपलब्धता होणार आहे. यामध्ये मातीरहित स्थितीमध्ये पिकांची विशेषतः शेवाळांची शेती करण्यात येईल.

असे आहे वैशिष्ट्यपूर्ण आरेखन

  • रिंग गार्डनमध्ये फिरता निक्षारीकरण प्रकल्प, एअरोपोनिक्स तंत्राने शेती आणि शेवाळ बायोरिॲक्टर यांचा समावेश असेल.
  • खालील समुद्रातून खारे पाणी उचलले जाईल. त्यावर सौर ऊर्जेच्या साह्याने चालवलेल्या दाब पंपाच्या साह्याने खारे पाणी ऑस्मॅटिक दाबापेक्षा अधिक दाबाने विशिष्ट आकाराच्या गाळणीमधून (सेमी पर्मेबल मेम्ब्रेन) पुढे पाठवले जाते. यामुळे पाण्यातील लहान मोठे प्राणी, मासे पुढील निक्षारीकरण प्रक्रियेमध्ये येत नाहीत.
  • सौर ऊर्जेवरील निक्षारीकरण प्रक्रियेतून उपलब्ध झालेले पाणी या रिंग गार्डनमधील सुमारे ६० टक्के रोपांना पुरू शकेल. ३० टक्के पाणी पिण्यासाठी शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला पुरवले जाईल. उर्वरित १० टक्के पाणी हे तुलनेने अधिक क्षारयुक्त असल्याने सागरी जिवांच्या वाढीसाठी धोकादायक ठरू शकते. याचा वापर बायोरिॲक्टरमध्ये स्परुलिना शेवाळाच्या वाढीसाठी करता येईल.

उत्तम, पर्यावरणपूरक आरेखन

२०१६ मध्ये रिंग गार्डन या आरेखनाला उत्तम आरेखनाचा पुरस्कार मिळाला होता. या आरेखनामध्ये कॅलिफोर्नियाच्या क्षितिजावर चक्राच्या मध्यातून सूर्य प्रकाशित होईल. या क्षेत्राला भेट देण्याची एक योजना राबवण्याचा विचार असून, त्यातून लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जागरूकता निर्माण करता येईल. यातून पर्यटनाचाही विकास होईल. येथे उत्पादित होणाऱ्या भाज्यांची विक्री नावीन्यपूर्ण पद्धतीने करणे शक्य होईल.

 

पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये एअरोपोनिक्स किंवा आर्द्रतायुक्त वातावरणामुळे पिकांची वाढ करणे या तंत्रासाठी ९८ टक्के कमी पाणी लागते. या तंत्रामध्ये ३० टक्के अधिक उत्पादन मिळते. या रिंगगार्डनमध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाणी, सूर्यप्रकाश, पोषक घटक आणि कार्बनडाय ऑक्साइड आपल्या जागेवरच उपलब्ध होणार आहे. कोणतीही वाहतूक करावी लागणार नाही. १००० वर्गमीटर अशा शेतीतून साध्या सुमारे २६ हजार वर्गमीटर जमिनीइतके भाज्यांचे उत्पादन मिळू शकते. प्रतिवर्ष सुमारे ३४० दशलक्ष गॅलन गोडे पाणी उपलब्ध होऊ शकेल. रिंग गार्डनची उभारणी केल्यानंतर ९ दशलक्ष गॅलन पाणी प्रतिवर्ष आवश्यक असेल. मात्र, त्यातून उपलब्ध होणारे उर्वरित ३३१ दशलक्ष गॅलन पाणी कॅलिफोर्निया येथील २३०० घरांना पुरवता येईल.
- ॲलेक्झांन्ड्रू प्रेडोन्यू


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
दर्जेदार पशू खाद्य निर्मितीचे तंत्रजनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक...
सोपी, सहज सौर वाळवण यंत्रेसध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये विक्रीअभावी शेतीमाल...
सौर ऊर्जेद्वारे काजू टरफल तेल निर्मितीसौर ऊर्जेच्या सहायाने काजू बी टरफलापासून तेल...
सिंचनाकरिता चुंबकीय पाणी तंत्राचा वापरक्षारयुक्त पाण्याचा पीक उत्पादन, गुणवत्ता यावर...
पीक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता,...शेती व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर...
ठिबक सिंचनाचा योग्य वापर महत्त्वाचा...ठिबक सिंचन तंत्रामुळे जमिनीत कायम वाफसा ठेवता...
तयार करा कांडी पशुखाद्य खाद्य घटकांची भुकटी करून गोळ्या किंवा कांड्या...
रोवा काठ्या कमी खर्चात अन श्रमात...भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी...
तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता...
पदार्थाची प्रत, रंग टिकविण्यासाठी...सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर...
सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल !सध्या दुचाकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासाठी...
अन्न शिजवण्यासाठी नावीन्यपूर्ण ‘...सरळ ज्वालेवर अन्नपदार्थ भाजण्यापासून माणसांच्या...
जमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार...वडिलोपार्जित बागायती शेती असल्याने नोकरीच्या मागे...
कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ‘ब्लॉक चेन’...कृषिक्षेत्र हे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सर्वात...
प्रक्रिया उद्योगासाठी सोलर ड्रायरसौरऊर्जेचा वापर करून पदार्थ वाळवणे हा...
अचूक सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणास्वयंचलित सूक्ष्म सिंचन यंत्रणेद्वारे (ऑटोमेशन)...
इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूलसौरऊर्जेच्या साह्याने रोजच्या जेवणातील सर्व...
तयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे...सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार...
ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रेऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ३५ ते ४० टक्के खर्च...
जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्रदुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य...