agriculture stories in marathi root development for grape vines | Agrowon

द्राक्षबागेत मुळांच्या विकासावर भर द्यावा

डॉ. आर. जी. सोमकुंवर
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

द्राक्ष विभागामध्ये सध्या पाऊस संपल्याची स्थिती असून, त्यानंतरही काही ठिकाणी नवीन वाढ जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी वाढ थांबवलेली दिसून येते. जमिनीचा प्रकार व पावसाचे प्रमाण यानुसार द्राक्ष वेलीमध्ये पिवळी पडलेली निस्तेज कॅनोपीबरोबरच वेलीचा वाढलेला जोम दिसून येईल. या स्थितीमध्ये मुळांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असून, पुढीलप्रमाणे उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.

द्राक्ष विभागामध्ये सध्या पाऊस संपल्याची स्थिती असून, त्यानंतरही काही ठिकाणी नवीन वाढ जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी वाढ थांबवलेली दिसून येते. जमिनीचा प्रकार व पावसाचे प्रमाण यानुसार द्राक्ष वेलीमध्ये पिवळी पडलेली निस्तेज कॅनोपीबरोबरच वेलीचा वाढलेला जोम दिसून येईल. या स्थितीमध्ये मुळांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असून, पुढीलप्रमाणे उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.

पिवळी व निस्तेज कॅनॉपी ः
ज्या बागेत बोदामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये जास्त काळासाठी साठून राहिले असेल, अशा बागांमध्ये मुळांनी काम करणे बंद केले आहे. परिणामी, जमिनीमध्ये उपलब्ध असलेली अन्नद्रव्येही वेलीस घेता आली नाहीत. विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता वेलीमध्ये दिसून येत आहेत. अन्नद्रव्यांचा पुरवठा पूर्णपणे झाला नसल्याच्या स्थितीमध्ये पाने अशक्त, पातळ व कमकुवत राहतील. दुसऱ्या परिस्थितीतील बागेमधील पाण्यासोबत मुळांच्या कक्षेतून अन्नद्रव्यांचा निचरा झाला आहे. त्याचाही एकंदरीत विपरीत परिणाम वेलीच्या अन्नद्रव्य पुरवठ्यावर झाल्याचे दिसत आहे.
आता पाऊस संपल्यावर बोद वाफसा स्थितीत आल्यानंतर जमिनीतून अन्नद्रव्ये देणे गरजेचे आहे. ज्या बागेत काळी भारी जमीन आहे, अशा ठिकाणी वाफसा येण्यास उशीर लागू शकतो. मात्र, हलक्‍या जमिनीत बोद खोदता येईल. पाण्याचा निचरा बोदामधून पूर्ण झालेल्या परिस्थितीत ठिबकद्वारे जमिनीतून अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी पाने पिवळी पडली असली तरी ती नेमकी कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिवळी पडली आहेत हे समजणे कठीण होते. सामान्यपणे प्रीब्लूम ते मनी सेटिंगच्या अवस्थेतील बागेत फेरस, मॅग्नेशिअम झिंक इ. महत्त्वाच्या अन्नद्रव्याची कमतरता पानांमध्ये दिसून येईल. नत्र, फेरस, मॅग्नेशिअम व झिंक इ. अन्नद्रव्याची पूर्तता करावी.

मुळीचा विकास महत्त्वाचा ः
द्राक्षबागेत सततच्या व अधिक पावसामुळे मुळांचे कार्य करण्याची क्षमता कमी झाली आहे. काही बागेमध्ये कार्य करणारी मुळे काळी पडल्याचे दिसून येते. म्हणजेच या वेळी घडाच्या विकासात आवश्‍यक असलेली पांढरी मुळे तयार झालेली नाहीच. यामुळे पुढील काळात घडाच्या विकासात अडचणी येतील. तेव्हा वाफसा आलेल्या परिस्थितीत बागेत गरजेनुसार ठिबकच्या खालील जागा मोकळी करावी किंवा शक्य झाल्यास बोदाच्या बाजूने अवजारांच्या साह्याने माती मोकळी करावी. यामुळे काही प्रमाणात मुळे तुटून, नवीन पांढऱ्या मुळ्या येण्याची प्रक्रिया सुरू होईल. या नव्या मुळ्या तयार झाल्यानंतरच घडाच्या विकासात मदत होऊ शकेल.
या वर्षी अधिक काळ व अधिक पावसाच्या स्थितीमुळे थंडीसुद्धा जास्त पडण्याची शक्यता आहे. या थंडीचा कालावधीसुद्धा पुढे वाढू शकेल. थंडीच्या परिस्थितीत बागेत घडाचा विकास कमी प्रमाणात होतो. या वेळी बागायतदारांसमोर संजीवकाचा वापर करून मण्याचा साइज वाढवण्याचाच पर्याय शिल्लक राहतो. तरीही वाढलेल्या थंडीमुळे बागेतील किमान तापमान फारच कमी राहिल्यास मण्याच्या विकासात अडचणी येतात. अशावेळी बागेत बोदामधील मुळी जास्तीत जास्त चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. मुळांच्या कक्षेतील तापमान वाढवण्याच्या दृष्टीने बोदावर आच्छादन (मल्चिंग) हा एक महत्त्वाचा पर्याय असू शकतो.

वेलीचा वाढीचा जोम ः
बऱ्याच बागेमध्ये वाफसा परिस्थितीनंतर नवीन फुटींचा जोम जास्त प्रमाणात दिसून येईल. यामुळे बागेत बगलफुटीसुद्धा जास्त प्रमाणात निघतील. वाढीचा हा जोम कमी करणे गरजेचे आहे. खरे तर, वातावरणात या वेळी आर्द्रता जास्त प्रमाणात असल्यामुळे वाढीकरिता पोषक असे वातावरण तयार झालेले आहे. वेलीचा हा जोम कमी करण्याकरिता सध्या पालाशची फवारणी व जमिनीतून उपलब्धता हा एक महत्त्वाचा पर्याय या वेळी आहे. पाण्यावर नियंत्रण ठेवणे, शेंडापिंचिंग करणे व बगलफुटी काढून टाकणे अशा गोष्टी या वेळी वाढनियंत्रणास मदत करतील.
सध्या बागेमध्ये दव व धुके या दोन्ही गोष्टींचा त्रास होताना दिसत आहे. पानांवर जितका जास्त वेळ दवबिंदू राहील तितके वेलीवर उपलब्ध रोगाच्या जिवाणूच्या प्रसारास पोषक वातावरण असेल. याकरिताच मोकळी कॅनॉपी असल्यास फवारणीसुद्धा सहजरित्या करता येईल. तसेच कव्हरेजही चांगले मिळेल. पाण्यावर जास्त काळ पाणी असलेल्या परिस्थितीत शिफारशीत बुरशीनाशकांची धुरळणी जास्त फायद्याची ठरू शकेल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०- २६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...