हागणदारीमुक्तीबाबत महाराष्ट्राचा आदर्श !

ग्रामविकास
ग्रामविकास

 ग्रामीण महाराष्ट्रात ‘हागणदारीमुक्ती’साठी रेडिओचा वापर करण्याच्या संकल्पनेला देश पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्राचे हे ‘रेडिओ मॉडेल’ आता देशपातळीवर राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात शौचालय बांधण्याच्या निमित्ताने होणारे प्रयोग, समाजातून घेतला जाणारा पुढाकार याबाबतची माहिती रेडिओद्वारे पोहोचवली जाते. महाराष्ट्राचे मॉडेल पाहून आता तमिळनाडू आणि गुजरातनेही ही पद्धत अवलंबण्याचे ठरवले आहे. या राज्यांना राज्य सरकारचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग प्रशिक्षणासाठी मदत करणार आहे.  देश पातळीवर ‘स्वच्छथॉन’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. नांदेडमध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र रेडिओ’ चालवणाऱ्या मिलिंद व्यवहारे यांचा यात मोठा वाटा आहे. नांदेड जिल्ह्यात व्यवहारे हे संवादक म्हणून काम करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आजवर एक हजारहून अधिक व्हॉट्‌सॲप बुलेटिन तयार केली आहेत. ८०० हून अधिक व्हॉट्‌सॲप ग्रुपवर हे बुलेटिन शेअर केले जाते. एकाच वेळी राज्यातील हजारो लोकांपर्यंत हे बुलेटिन पोहोचण्यास मदत होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com