agriculture stories in Marathi Safflower aphid management | Agrowon

करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापन

डॉ .पी .आर. झंवर, योगेश मात्रे
मंगळवार, 5 जानेवारी 2021

सध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीमुळे उत्पादनात ५५ ते ८० टक्के घट येऊ शकते. वेळीच नियंत्रणाचे उपाय योजावेत.

सध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीमुळे उत्पादनात ५५ ते ८० टक्के घट येऊ शकते. वेळीच नियंत्रणाचे उपाय योजावेत.

मावा हा अर्धगोलाकार, काळा आणि मृदू शरीराचा असून, शरीरावर पाठीमागच्या बाजूस दोन शिंगे असतात. पूर्ण वाढ झालेल्या माव्यास दोन पंख असतात. मावा किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या अवस्थेत अधिक असते. या किडीची सुरुवात शेतातील बाजूच्या झाडांपासून होते.

नुकसानीचा प्रकार

 •  मावा पिकाच्या शेंड्यावर, बोंडाच्या देठावर, कोवळ्या पानांच्या शिरांवर, पानाच्या मागील बाजूस खोडावर आणि फांद्यांवर आढळतो.
 •  मावा सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोषतो. झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. अधिक प्रादुर्भावामध्ये झाडे वाळतात आणि झाडाचा बराचसा भाग माव्यांनी व्यापून टाकल्याने ती काळसर दिसतात.
 • फुलोरावस्थेत असताना प्रादुर्भाव जास्त असतो. जास्त प्रादुर्भावामुळे कमी फुले व बोंडे लागतात.
 • तीव्र प्रादुर्भावाने झाडे फुले लागण्याआधीच वाळून जातात.
 • मावा किडीच्या स्त्रवलेल्या साखरेसारख्या चिकट पदार्थांवर काळ्या बुरशीची वाढ होते. झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. चिकट पदार्थ फुलांवर पडल्यामुळे परागीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो. परिणामी दाणे कमी प्रमाणात भरतात.

एकात्मिक व्यवस्थापन

 • लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
 •  पेरणीसाठी भौमा,कुसुम,शारदा, (बीएसएफ-१६८-४) किंवा पीबीएनएस-१२ या जातींचा वापर करावा.
 • शेताभोवती वाढलेल्या ग्लिरिसिडीया, गवते, तांदुळजा, दुधी, पाथरी व काचांडा, हॉलीओक, चंदन बटवा या पर्यायी वनस्पतींवर किडीचा प्रादुर्भाव होतो. पिकातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यायी यजमान तणांचा नाश करावा. पेरणीपासून पीक ४० दिवसांपर्यंत तण विरहित ठेवावे. एक कोळपणी आणि एक खुरपणी करावी.
 • पेरणीच्या वेळेनुसार प्रादुर्भावाचे प्रमाण ठरते. पेरणी लवकर केल्यास पिकावर माव्याचा प्रादुर्भाव कमी राहतो. पेरणीस उशीर होत जाईल, तसा प्रादुर्भाव वाढत जातो.
 • लेडीबर्ड भुंगेरे (ढालकिटक) आणि क्रायसोपा या मित्रकीटकांचे रक्षण करावे. हे दोन्ही कीटक माव्यावर उपजीविका करतात.
 •  मावा किडीचा प्रादुर्भाव शेताच्या बाजूच्या पट्ट्यात सुरू होतो. पेरणीनंतर ३० दिवसांनी शेताच्या बाजूच्या ४ ओळींवर (१८० सें.मी.) डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास पसरणारा प्रादुर्भाव रोखला जातो.

आर्थिक नुकसानीची पातळी ः प्रत्येक झाडावर १५ ते २० मावा कीटक.

व्यवस्थापन (फवारणी प्रति लिटर पाणी)
ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. किंवा
डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.लि.

डॉ .पी .आर. झंवर (सहयोगी प्राध्यापक), ७५८८१५१२४४
योगेश मात्रे (पी.एच.डी.विद्यार्थी ), ७३८७५२१९५७

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगाची शास्त्रीय लागवड पद्धतखरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात जास्त...
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड...भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
उन्हाळी भुईमूगाचे लागवड तंत्रउन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि...
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापनसध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा...
करडईची सुधारित लागवड करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
खत, पाणी व्यवस्थापनातून वाढवा करडई...योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन, विरळणी आणि...
सुधारित जवस वाणांची लागवड कराजवसाच्या सुधारित वाणाची निवड केल्यास...
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन...गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक...
सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रणसद्य परिस्थितीत सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असून...
सोयाबीन पिकांवरील किडींचे एकात्मिक...सोयाबीन पिकात ९० ते ११० दिवसात येणाऱ्या ...
सोयाबीन पाने पिवळी पडण्याचे कारण जाणून...यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस...
तीळ लागवड तंत्रतीळ हे भारतातील सर्वांत जुने तेलबिया पीक आहे....
सोयाबीन लागवडीतील समस्यावरील उपाययोजनासोयाबीनचे योग्य वाण निवडताना... सध्या बाजारात...
सूर्यफूल लागवड नियोजन जमीन : सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
रुंद वरंबा सरी पद्धती भुईमुगासाठी आहे...भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या...