औद्योगिक टाकाऊ घटकांपासून मातीच्या निर्मितीसाठी प्रयत्न 

औद्योगिक टाकाऊ घटकांपासून मातीच्या निर्मितीसाठी प्रयत्न 
औद्योगिक टाकाऊ घटकांपासून मातीच्या निर्मितीसाठी प्रयत्न 

टाकाऊ पदार्थासोबत योग्य प्रमाणामध्ये बायोमास उत्पादनांचा वापर करून सुपीक मातीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा पद्धतीतून मातीची सुपीकता टिकवून ठेवणे शक्य होणार असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. गेल्या अठरा वर्षांपासून विविध नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धतीने पिकांची वाढ करताना माती किंवा माध्यमामध्ये टाकाऊ घटकांचे प्रयोग करण्यात आले आहेत. त्याचे निष्कर्ष ‘सायन्स ऑफ दी टोटल एन्व्हायर्न्मेंट’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.  भविष्यामध्ये जागतिक अन्न सुरक्षिततेच्या दृष्टीने पिकांच्या वाढीसाठी खास निर्मित मातीचा वापर करावा लागणार आहे. ही माती अधिक कार्यक्षम आणि शाश्वत करण्यासाठी त्यातील अन्नद्रव्यांचे पुनर्चक्रीकरण करणे आवश्यक आहे. विविध टाकाऊ सेंद्रिय पदार्थांसोबत पायरोलाईज्ड बायोमास म्हणजेच विशिष्ठ पद्धतीने तयार केलेला कोळसा वापरण्याची आवश्यकता डॉ. केट श्कोफिल्ड यांनी व्यक्त केली आहे. या नव्या पद्धतीमध्ये ऱ्हास होणारी विविध अन्नद्रव्ये रोखणे लक्षणीयरीत्या शक्य होणार आहे.  प्लायमाऊथ विद्यापीठातील संशोधकांनी टाकाऊ घटकांच्या साह्याने तयार केलेल्या मातीमध्ये बायोचार मिसळून प्रयोग केले आहे. बायोचार म्हणजे कार्बनने परिपूर्ण असलेले बायोमास होय. त्यामुळे मातीतील नायट्रोजन आणि कार्बनचा होणारा ऱ्हास रोखता येतो. त्यामुळे निचऱ्याद्वारे वाया जाणाऱ्या व प्रवाह, तलाव प्रदूषित करणाऱ्या नत्र पिकांना उपलब्ध होईल. परिणामी पीक उत्पादनामध्ये खतांच्या वापरात बचत साध्य होणार आहे.  प्रयोगामध्ये मातीत बायोचारच्या वापरामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या स्थिरतेबाबतही अभ्यास करण्यात आला आहे. विविध उद्योगांतून बाहेर टाकल्या जाणाऱ्या टाकाऊ घटकांतील खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ मिळून त्यांचा वापर पीक लागवडयोग्य माती तयार करण्यासाठी केला जात आहे. यातून शेती, फळबागा आणि कुरणांमध्ये वापरण्यायोग्य सुपीक माती मिळू शकेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com