agriculture stories in marathi Scientists track wheat aphids and their natural enemies for better pest management in Pakistan | Agrowon

गहू पिकावरील मावा किडीचा घेतला जातोय मागोवा

वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

आंतरराष्ट्रीय कृषी आणि जैवशास्त्र केंद्र येथील संशोधकांनी पाकिस्तानमधील गहू पिकावरील मावा या किडीचे वितरण, संख्यात्मक गतिशीलता या बरोबरच त्यांच्या नैसर्गिक शत्रूंविषयी अभ्यास केला आहे. या सातत्यपूर्ण मागोव्यामुळे किडीच्या वर्तनासोबत त्यांच्यावरील जैविक नियंत्रकांविषयी माहिती उपलब्ध होत आहे. या अभ्यासातून नव्या व्यवस्थापन पद्धती विकसित करणे शक्य होणार आहे.

आंतरराष्ट्रीय कृषी आणि जैवशास्त्र केंद्र येथील संशोधकांनी पाकिस्तानमधील गहू पिकावरील मावा या किडीचे वितरण, संख्यात्मक गतिशीलता या बरोबरच त्यांच्या नैसर्गिक शत्रूंविषयी अभ्यास केला आहे. या सातत्यपूर्ण मागोव्यामुळे किडीच्या वर्तनासोबत त्यांच्यावरील जैविक नियंत्रकांविषयी माहिती उपलब्ध होत आहे. या अभ्यासातून नव्या व्यवस्थापन पद्धती विकसित करणे शक्य होणार आहे.

गहू पिकावरील मावा कीड ही तृणधान्य पिकांवरील सर्वज्ञात कीड आहे. या किडीमुळे गहू पिकाचे सुमारे २० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. पाकिस्तानमधील गहू उत्पादन हे २०१७-१८ मध्ये २६.३ दशलक्ष टन होते. या परिसरातील भारत आणि बांगलादेशामध्येही या किडीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. पाकिस्तान येथील पंजाबमधील पाचही जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा प्रक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी आणि जैवशास्त्र केंद्र (CABI) येथील संशोधक डॉ. मुहम्मद फाहिम यांनी गहू पिकावरील मावा किड्याच्या संदर्भामध्ये दोन वर्षे अभ्यास केला आहे. त्यातून वेगवेगळ्या हंगाम, वेळा, कालावधी आणि मावा आणि त्यांना खाणाऱ्या अन्य कीटकांचा (विशेषतः सिरफीड माशी) अभ्यास केला आहे. त्यात भात व कपाशी पिकांसह एकत्रित शेती, कोरडवाहू क्षेत्राचा समावेश आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष प्लॉसवनमध्ये प्रकाशित केले आहेत.

निष्कर्ष

मावा किड्याच्या कार्यान्वयावर थंड आणि उष्ण अशा दोन्ही पंजाब प्रांतांमध्ये कोणताही परिणाम आढळला नाही.
सोबतच मावा किडीच्या नियंत्रणासाठी सिरफीड माशी हा उत्तम भक्षक आहे. मात्र, अभ्यासाच्या दोन्ही वर्षांमध्ये मित्रकिटक आणि मावा किडींच्या संख्येमध्ये कोणताही संबंध नसल्याचे दिसून आले आहे.
किडीच्या नियंत्रणासाठी दोन पद्धती किंवा दृष्टिकोन महत्त्वाचे ठरू शकतात.
१. मित्रकीटकांचा नियंत्रणासाठी वापर. (वरून खाली)
२. अन्नद्रव्ये आणि सिंचनाचा वापर. (खालून वर)

अभ्यासाचा मुख्य उद्देश मावा किडीचा प्रादुर्भाव नेमका कोणत्या ठिकाणी होतो. आणि या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी योग्य त्या घटकांचे व्यवस्थापन कसे करता येईल, हे जाणून घेणे हा होता. या अभ्यासातून मावा किडीविषयी अत्यंत मुलभूत बाबी जाणून घेणे शक्य झाले आहे. त्याची सांगड एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी घालणे शक्य होणार आहे.
- डॉ. मुहम्मद फाहिम, आंतरराष्ट्रीय कृषी आणि जैवशास्त्र केंद्र (CABI).


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...