agriculture stories in Marathi, seeds of cost 1.5 crore given to flooded farmers from SIYAM | Page 2 ||| Agrowon

सियाम कडून पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचे बियाणे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद  : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पेरणीकरिता सियामच्या पुढाकारातून सुमारे १ कोटी ५८ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे बियाणे पोचविण्यात आले आहे. दहा कंपन्यांचे हे बियाणे असल्याची माहिती सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) च्या वतीने दिली आहे.

औरंगाबाद  : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पेरणीकरिता सियामच्या पुढाकारातून सुमारे १ कोटी ५८ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे बियाणे पोचविण्यात आले आहे. दहा कंपन्यांचे हे बियाणे असल्याची माहिती सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) च्या वतीने दिली आहे.

सियामच्या पुढाकारातून सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकूण २ कोटी ३८ लाख रुपये किमतीचे बियाणे मदत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहेत. या सियामच्या उपक्रमामध्ये १५ सभासद कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. मंगळवारी (ता. १५) अजित सिड्‌स प्रा. लि. व ग्रीन गोल्ड सिड्‌स प्रा. लि., औरंगाबाद येथील कंपन्यामार्फत बियाण्यांचे तीन ट्रक रवाना केले. यामध्ये अजित सिड्‌स मार्फत मका ७६ क्‍विंटल व हरभरा ६७.२ क्विंटल (अंदाजे मूल्य एकूण ३६ लाख रुपये) व ग्रीन गोल्ड सिड्‌स प्रा. लि. मार्फत गहू ४ क्‍विंटल, हरभरा १० क्‍विंटल, चारा ज्वारी १० क्‍विंटल, मका १० क्‍विंटल व पालक ४.५ क्‍विंटल (अंदाजे मूल्य १० लाख रुपये) या बियाण्यांचा अंतर्भाव आहे. या मदतीच्या ट्रकना हिरवा झेंडा दाखविण्यासाठी सियामचे अध्यक्ष अजित मुळे, सचिन मुळे, वट्टमवार, सियामचे कार्यकारी संचालक डॉ. शालिग्राम वानखेडे, नाथ बायोजीनचे संतोष जोशी, कंबार, संतोष काळे, सचिन किटकरू व कल्याण शेजुळ आदिंची उपस्थिती होती.

अंकुर सिड्‌स प्रा. लि., एलोरा नॅचुरल सिड्‌स प्रा. लि., कलश सिड्‌स प्रा. लि., महिको (मका व गहू), नाथ बायोजिनस इंडिया ली., सफल सिड्‌स ॲण्ड एएमपी, बायोटेक प्रा. लि., निर्मल सिड्‌स प्रा. लि. आदी कंपन्यांचे बियाणे पोच झाले आहे. अजित सिड्‌स प्रा. लि., बसंत अग्रोटेक इंडिया ली. व ग्रीन गोल्ड सिड्‌स प्रा. लि. यांचे बियाणे मंगळवारी पाठविण्यात आले. उर्वरित नोन यु सिड्‌स,(इ) प्रा. लि., महिको ,नामदेव उमाजी अग्रोटेक इंडिया प्रा. ली., रासी सिड्‌स प्रा. लि., तुलसी सिड्‌स प्रा. लि. व नोव्हागोल्ड सिड्‌स प्रा. लि. कंपन्याच्या बियाण्यांचा पुरवठा येत्या काही दिवसांत होणार असल्याची माहिती सियामचे कार्यकारी संचालक डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी दिली.

पुरविलेल्या बियाण्याचे वाटप कृषी विभागामार्फत गरजू शेतकऱ्यांना करण्यात येत असल्याचेही डॉ. वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...