मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
बातम्या
सियाम कडून पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचे बियाणे
औरंगाबाद : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पेरणीकरिता सियामच्या पुढाकारातून सुमारे १ कोटी ५८ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे बियाणे पोचविण्यात आले आहे. दहा कंपन्यांचे हे बियाणे असल्याची माहिती सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) च्या वतीने दिली आहे.
औरंगाबाद : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पेरणीकरिता सियामच्या पुढाकारातून सुमारे १ कोटी ५८ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे बियाणे पोचविण्यात आले आहे. दहा कंपन्यांचे हे बियाणे असल्याची माहिती सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) च्या वतीने दिली आहे.
सियामच्या पुढाकारातून सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकूण २ कोटी ३८ लाख रुपये किमतीचे बियाणे मदत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहेत. या सियामच्या उपक्रमामध्ये १५ सभासद कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. मंगळवारी (ता. १५) अजित सिड्स प्रा. लि. व ग्रीन गोल्ड सिड्स प्रा. लि., औरंगाबाद येथील कंपन्यामार्फत बियाण्यांचे तीन ट्रक रवाना केले. यामध्ये अजित सिड्स मार्फत मका ७६ क्विंटल व हरभरा ६७.२ क्विंटल (अंदाजे मूल्य एकूण ३६ लाख रुपये) व ग्रीन गोल्ड सिड्स प्रा. लि. मार्फत गहू ४ क्विंटल, हरभरा १० क्विंटल, चारा ज्वारी १० क्विंटल, मका १० क्विंटल व पालक ४.५ क्विंटल (अंदाजे मूल्य १० लाख रुपये) या बियाण्यांचा अंतर्भाव आहे. या मदतीच्या ट्रकना हिरवा झेंडा दाखविण्यासाठी सियामचे अध्यक्ष अजित मुळे, सचिन मुळे, वट्टमवार, सियामचे कार्यकारी संचालक डॉ. शालिग्राम वानखेडे, नाथ बायोजीनचे संतोष जोशी, कंबार, संतोष काळे, सचिन किटकरू व कल्याण शेजुळ आदिंची उपस्थिती होती.
अंकुर सिड्स प्रा. लि., एलोरा नॅचुरल सिड्स प्रा. लि., कलश सिड्स प्रा. लि., महिको (मका व गहू), नाथ बायोजिनस इंडिया ली., सफल सिड्स ॲण्ड एएमपी, बायोटेक प्रा. लि., निर्मल सिड्स प्रा. लि. आदी कंपन्यांचे बियाणे पोच झाले आहे. अजित सिड्स प्रा. लि., बसंत अग्रोटेक इंडिया ली. व ग्रीन गोल्ड सिड्स प्रा. लि. यांचे बियाणे मंगळवारी पाठविण्यात आले. उर्वरित नोन यु सिड्स,(इ) प्रा. लि., महिको ,नामदेव उमाजी अग्रोटेक इंडिया प्रा. ली., रासी सिड्स प्रा. लि., तुलसी सिड्स प्रा. लि. व नोव्हागोल्ड सिड्स प्रा. लि. कंपन्याच्या बियाण्यांचा पुरवठा येत्या काही दिवसांत होणार असल्याची माहिती सियामचे कार्यकारी संचालक डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी दिली.
पुरविलेल्या बियाण्याचे वाटप कृषी विभागामार्फत गरजू शेतकऱ्यांना करण्यात येत असल्याचेही डॉ. वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.
- 1 of 1494
- ››