मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
तेलबिया पिके
तीळ लागवड तंत्र
तीळ पिकाचा तयार होण्याचा कालावधी ७० ते ८० दिवस आहे. तिळांच्या बियांत तेलाचे प्रमाण (४० ते ४५ टक्के) आहे. हे पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून घेता येते.
तीळ हे भारतातील सर्वांत जुने तेलबिया पीक आहे. तिळाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर आहे. तिळाच्या तेलास जागतिक बाजारपेठेत खाद्य तेल व औषधी तेल म्हणून मोठी मागणी आहे.
तीळ या पिकाचा तयार होण्याचा कालावधी ७० ते ८० दिवस आहे. तिळांच्या बियांत तेलाचे प्रमाण (४० ते ४५ टक्के) आहे. हे पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून घेता येते.
हवामान व जमीन :
हे पीक खरीप, अर्ध -रब्बी, उन्हाळी या सर्व हंगामात घेता येते. या पिकास २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान पोषक असून सतत येणारा पाऊस उत्पादनावर विपरीत परिणाम करतो. तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.
पूर्व मशागत व भरखते :
जमीन चांगली भुसभुशीत तयार करावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली जमिनीची मशागत करून हेक्टरी १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
बियाण्याचे हेक्टरी प्रमाण :
खरीप हंगामाकरिता प्रति हेक्टरी १.५ ते २.० किलो बियाणे वापरावे.
बीज प्रक्रिया :
पेरणीपूर्वी कार्बेन्डाझीम तीन ग्रॅम प्रती किलो आणि ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रती किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
पेरणीची वेळ :
खरीप-जूनचा शेवटचा किंवा जुलैचा पहिला आठवड्यात पेरणी करावी. तिळाचे बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू, गाळलेले शेणखत, राख किंवा माती मिसळावी.
तिळाचे सुधारित वाण व त्यांचे गुणधर्म | |||||
---|---|---|---|---|---|
अ.क्रं | हंगाम व वाण | परिपक्व होण्याचा कालावधी (दिवस) | दाण्याचा रंग | हेक्टरी उत्पादन (क्विंटल) | तेलाचे प्रमाण (टक्के) |
१ | खरीप एकेटी -६४ | ८५-९० | पांढरा मळकट | ५ ते ९ | ४७-४८ |
२ | खरीप आरटी-३४६ | ८२-८६ | पांढरा | ७.५ ते ८.५ | ४९-५१ |
३ | अर्ध-रबी एन-८ | १२० | करडा व पांढरी छटा | ४ ते ७ | ५०-५१ |
४ | उन्हाळी एकेटी-१०१ | ९०-९५ | पांढरा | ८ ते १० | ४८-४९ |
५ | उन्हाळी एकेटी-१०३ | ९८-१०५ | पांढरा | ७ ते ८ | ४८.३ |
६ | जे एल्टी-४०७ | ९५-१०० | पांढरा | ७ ते ९ | ५१-५३ |
७ | उन्हाळी पकविनटी-११ | ८८-९२ | पांढरा | ८ ते ८.५ | ५०-५३ |
पेरणी पद्धत / अंतर : पाभरीने किंवा तिफणीने दोन ओळीत ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
आंतरपीक :
आंतरपीक पद्धतीमध्ये तीळ-मूग (३:३), तीळ-सोयाबीन (२:१), तीळ – कपाशी (३:१) याप्रमाणात ओळीमध्ये पेरणी फायदेशीर आढळलेली आहे.
रासायनिक खताची मात्रा, वेळ :
पेरणी वेळी अर्धे नत्र (१२.५ किलो/हे.) व संपूर्ण स्फुरद (२५ किलो/ हे.) देऊन नत्राचा उरलेला दुसरा हप्ता (१२.५ किलो/हे) पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावा.
विरळणी / नांगे भरणे :
पेरणीनंतर सात - आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली व त्यानंतर आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपांत १० ते १५ सें.मी. अंतर ठेवावे.
आंतरमशागत :
आवश्यकतेनुसार २-३ कोळपण्या/खुरपण्या देऊन शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
डॉ. शा. भि. घुगे, ९४२१४६०१४३
प्रितम ओ. भुतडा, ८१६९३२७३२२
(करडई संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
- 1 of 4
- ››