agriculture stories in marathi Sheep farming annual timetable | Agrowon

मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रक

डॉ. सचिन टेकाडे
बुधवार, 29 जानेवारी 2020

गाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात कोकरांमध्ये जुलाब व ताप अशी लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार तातडीने उपचार करावे. पैदासीकरिता वापरण्यात येणाऱ्या मेंढेनरांच्या खाद्यावर विशेष लक्ष द्यावे.
 

जानेवारी ः

गाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात कोकरांमध्ये जुलाब व ताप अशी लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार तातडीने उपचार करावे. पैदासीकरिता वापरण्यात येणाऱ्या मेंढेनरांच्या खाद्यावर विशेष लक्ष द्यावे.
 

जानेवारी ः

 • वातावरणामध्ये गारवा असतो, त्यामुळे मेंढ्या, कोकरांचे थंडीपासून संरक्षण करावे. 
 • काही मेंढ्या माज दाखवतात, त्यामुळे मेंढ्यांच्या पायावर, शेपटी खाली तसेच जननेंद्रियांच्या आजूबाजूची वाढलेली लोकर कातरणी करावी.
 • गाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषत: गाभण मेंढ्यांना प्रति मेंढी १० ग्रॅम खनिज मिश्रण व १० ग्रॅम मीठ खाद्यामध्ये द्यावे.
 • गाभण तसेच दूध देणाऱ्या मेंढ्यांना प्रति मेंढी ३०० ते ४०० ग्रॅम पशुखाद्य किंवा पौष्टिक आहार द्यावा.
 • शिफारशीनुसार जंतनाशक पाजावे, औषधोपचार करावेत. देवीचे लसीकरण करून घ्यावे.

फेब्रुवारी

 • नवजात कोकरांमध्ये जुलाब व ताप अशी लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार तातडीने उपचार करावे. 
 • पैदासीच्या मेंढ्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे.
 • माजावर आलेल्या मेंढ्यांना नराद्वारे रेतन करावे.
 • पैदासीकरिता वापरण्यात येणाऱ्या मेंढेनरांच्या खाद्यावर विशेष लक्ष द्यावे.
 • कोकरांना प्रती कोकरू १०० ग्रॅम चारा द्यावा.
 • सकाळच्या वेळी कोकरांना हिरवा झाडपाला खाद्यामध्ये द्यावा.
 • मेंढ्यांना लाळ्या खुरकुत रोग नियंत्रणासाठी लसीकरण करावे.
 • लोकर कातरणीच्या आधी मेंढ्यांना धुवावे.

मार्च 

 • मेंढ्यांना आंत्रविषार रोग नियंत्रणासाठी लसीकरण करावे.
 • लोकर कातरणीच्या आधी मेंढ्यांना धुवावे.
 • लोकर कातरणीनंतर दोन आठवड्यांनी मेंढ्यांना गोचिड नाशकाच्या द्रावणाने धुवावे.

एप्रिल 

 • पशुवैद्यकाच्या सहाय्याने कळपाची तपासणी करावी.
 • प्रती मेंढी १० ग्रॅम खनिज मिश्रण व १० ग्रॅम मीठ या प्रमाणात द्यावे.
 • घटसर्प रोग नियंत्रणासाठी लसीकरण करावे.
 • मेंढ्यांच्या लेंड्यांची तपासणी करून त्याच्या निष्कर्षानुसार जंतनाशक वापरावे.   

मे

 • मेंढ्यांच्या वाड्यामधील मातीचा थर बदलून घ्यावा.
 • मेंढ्यांना जुलाब व उष्माघातापासून संरक्षण करण्याकरिता उपाय योजना कराव्यात.
 • मेंढ्या माजावर येण्याकरिता मेंढ्यांना पौष्टिक आहार द्यावा.
 • प्रती मेंढी १० ग्रॅम खनिज मिश्रण आणि १० ग्रॅम मीठ खाद्यातून द्यावे.
 • सर्व मेंढ्यांना पीपीआर रोग नियंत्रणासाठी लसीकरण करून घ्यावे. (सदर लस ही तीन वर्षांतून एकदाच द्यायची असते.)

जून 

 • कोकरे व मेंढ्यांना जुलाब झाल्यास तात्काळ औषध उपचार करावा.
 • सहा महिन्यांचे कोकरांचे वजन घ्यावे. लोकर कातरणी करावी.
 • प्रती मेंढी ४०० ग्रॅम या प्रमाणात पौष्टिक आहार (पेंड) खाऊ घालावी.
 • सर्व मेंढ्यांना नीलजिव्हा रोग नियंत्रणासाठी लसीकरण करून घ्यावे.

जुलै 

 • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कळपामधील मेंढ्यांची लाल लघवीचा आजार व कावीळ या रोगाची तपासणी करून उपचार करावे.
 • मेंढ्यांना शिफारशीनुसार जंताचे औषध उपचार करावेत.
 • गाभण मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी.
 • ९ ते १२ महिने वयाच्या कोकरांचे शारीरिक वजन घ्यावे.
 • सर्व मेंढ्यांना धनुर्वात रोगाचे लसीकरण करून घ्यावे.
 • ऑगस्ट 
 • मेंढ्या व मेंढेनरांची वाढलेली खुरे कापावीत.
 • मेंढ्यांची खुरे आठवड्यातून दोन वेळेस कॉपर सल्फेटच्या द्रावणांनी धुऊन घ्यावीत.
 • दूध देणाऱ्या मेंढ्यांना प्रती मेंढी ३०० ग्रॅम पशुखाद्य  द्यावे.
 • नवजात कोकरांची योग्य काळजी घ्यावी.
 • सर्व मेंढ्यांना लाळ्या खुरकुत रोगाचे लसीकरण करावे.

सप्टेंबर 

 • या महिन्यामध्ये मेंढ्या विण्याचे प्रमाण जास्त असते. गाभण मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी.
 • व्यायलेल्या मेंढ्या व नवजात कोकरांची योग्य निगा राखावी.
 • मेंढ्या व्यायल्यानंतर वाडा गरम पाण्याने स्वच्छ करून घ्यावा.
 • जन्मानंतर १ तासाच्या आत कोकरांना चिक पाजावा
 • दूध देणाऱ्या मेंढ्यांना प्रती मेंढी ४०० ग्रॅम पशुखाद्य खाऊ घालावे.
 • माजावर आलेल्या मेंढ्या ओळखून कळपामध्ये मेंढानर सोडावा.

ऑक्टोबर

 • लेंडी नमुने तपासून जंताचे औषध द्यावे.
 • पैदासीकरिता निरुपयोगी असलेल्या नरांचे खच्चीकरण करावे.
 • मेंढ्यांचे वाड्यामधील मातीचा थर बदलावा.
 • बाह्यकीटक प्रतिबंधाकरिता गोचिडनाशक द्रावणाने मेंढ्या धुऊन घ्याव्यात.
 • मेंढ्यांची लोकर कातरणी करण्यात यावी.
 • निरुपयोगी मेंढ्या कळपातून काढून त्यांची विक्री करण्यात यावी.
 • बदलत्या वातावरणापासून (मुख्यत: सकाळी व संध्याकाळी) कळपातील मेंढ्यांचे संरक्षण   करावे.

नोव्हेंबर 

 • थंड हवेपासून कळपाचे संरक्षण करावे.
 • निरुपयोगी मेंढ्या कळपातून काढून त्यांची विक्री करण्यात यावी.
 • नवजात कोकरांना व मेंढ्यांचे थंडी पासून संरक्षण करावे.
 • कोकरांचे शारीरिक वजन घेऊन नोंदी ठेवाव्यात. 
 • गाभण मेंढ्या व मेंढेनरांना ४०० ग्रॅम पशुखाद्य खाऊ घालावे.

डिसेंबर

 • नवजात कोकरे व मेंढ्यांचे थंडी पासून संरक्षण करावे.
 • निरुपयोगी मेंढ्या कळपातून काढून त्यांची विक्री करण्यात यावी.
 • योग्य निवाऱ्याची सोय करावी.
 • गाभण मेंढ्या व मेंढेनरांना ४०० ग्रॅम पशुखाद्य खाऊ घालावे.

  ः डॉ. सचिन टेकाडे, ८८८८८९०२७०
(सहाय्यक संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)
 


इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...