agriculture stories in Marathi Soil microbes could promote better farm outputs | Agrowon

शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू महत्त्वाचे

वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील उपयुक्त जिवाणू अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हे जिवाणू वेगळे करून त्यांचा वापर कृषी उत्पादन अधिक शाश्वत करणे शक्य असल्याचा दावा फ्लिंडर्स विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील उपयुक्त जिवाणू अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हे जिवाणू वेगळे करून त्यांचा वापर कृषी उत्पादन अधिक शाश्वत करणे शक्य असल्याचा दावा फ्लिंडर्स विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

फ्लिंडर्स विद्यापीठ, ला ट्रोब विद्यापीठ, CSIRO संस्थेतील संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये स्थानिक झाडे झुडपांच्या मुळांजवळील उपयुक्त जिवाणू पीक उत्पादनाच्या शाश्वततेसाठी आणि मातीच्या जैविक आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे समोर आले आहे. त्याविषयी माहिती देताना फ्लिंडर्स विद्यापीठातील अभ्यागत संशोधक डॉ. रिकार्डो अरावजो यांनी सांगितले, की औषध व्यवसायामध्ये विविध प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी सूक्ष्मजीव महत्त्वाचे असतात. त्याच प्रकारे विविध नैसर्गिक पर्यावरणामध्ये मुबलक आढळणारे जिवाणू (अॅक्टोनोबॅक्टेरिया) वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात. हे सूक्ष्मजीवांचे समुदाय जागतिक कार्बन साखळीमध्ये मोलाचे असून, विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता करतात. परिणामी पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होते. ते पर्यावरणासाठीही पूरक ठरतात. ऑस्ट्रेलियातील कोरड्या आणि उष्ण वातावरणामध्ये त्यांची संख्या मोठी आहे.

असा झाला अभ्यास

  • दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलिया येथील विविध प्रदेशामध्ये आढळणारी सूक्ष्मजीवांची विविधता या अभ्यासामध्ये तपासण्यात आली आहे. त्यांची जनुकीय माहिती गोळा करण्यात आली. जनुकीय माहिती उपलब्ध नसेल, ती वेगवेगळे माती नमुने घेऊन तयार करण्यात आली. त्यासाठी मुख्य भूमी, तस्मानिया बेट, किंग बेट, ख्रिसमस बेट येथील नमुने तपासण्यात आले. या नमुन्यांची तुलना उत्तम अंटार्क्टिकावरील माती नमुन्यांशी करण्यात आली.
  • ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीवरील २२११ अॅक्टिनोबॅक्टेरियाचे आणि तस्मानिया, किंग, ख्रिसमस इ. ठिकाणचे ४९० अॅक्टिनोबॅक्टेरियाचे विश्लेषण करण्यात आले.
  • CSIRO संस्थेचे कृषी आणि अन्न विषयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गुप्ता वडकट्टू यांनी सांगितले, की मातीतील विविध जिवाणूंची विविधता ही शेती क्षेत्राच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारी आहे. स्थानिक वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या जिवाणू हे शेजारच्या शेतीक्षेत्रासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरू शकतात. भविष्यातील शाश्वत उत्पादनासाठी त्यांची नक्कीच मदत होऊ शकते.
  • या परिसरामध्ये अलग अलग बेटे असल्यामुळे या उपयुक्त जिवाणूंच्या मोकळ्या प्रसाराची संधी तुलनेने कमी आहेत.
  • हे जिवाणू शेतीबरोबरच मानवी आणि प्राण्याच्या आरोग्यासाठी फायद्याच्या ठरतील.
  • या जिवाणूंची विविधता आणि संरचना ही वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. त्यांचे विविध प्रकार हे अगदी वाळवंटापासून अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशापर्यंत पसरलेले आढळून येतात. त्यांच्याविषयी जितके जाणून घेता येईल, तितका त्यांचा वापर करून घेणे शक्य होणार असल्याचे प्रो. फ्रॅन्को यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...