agriculture stories in Marathi Soil on moon and Mars likely to support crops | Agrowon

मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे उत्पादन शक्य
वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि मंगळावरील मातीची खास नक्कल विकसित केली आहे. या मातीमध्ये पिकांचे उत्पादन घेणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. भविष्यामध्ये अंतराळातील अन्नासाठी मंगळ आणि चंद्रावरील मातीचा वापर करता येईल, असा विश्वास वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला.

नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि मंगळावरील मातीची खास नक्कल विकसित केली आहे. या मातीमध्ये पिकांचे उत्पादन घेणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. भविष्यामध्ये अंतराळातील अन्नासाठी मंगळ आणि चंद्रावरील मातीचा वापर करता येईल, असा विश्वास वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला.

नेदरलॅंड येथील वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधक विगेर वॅमेलिंक आणि सहकाऱ्यांनी नासा या अवकाश संस्थेने मंगळ आणि चंद्रावरील मातीप्रमाणे तयार केलेल्या मातीमध्ये दहा वेगवेगळ्या पिकांची लागवडीचे प्रयोग केले आहेत. या पिकामध्ये गार्डन क्रेस गवत, टोमॅटो, मुळा, मोहरी, क्विनो, पालक, चिवे, वाटाणा आणि लिक यांचा समावेश आहे. सोबतच पृथ्वीवरील सामान्य मातीमध्येही नियंत्रित चाचण्या घेतल्या.
दहापैकी पालक वगळता नऊ पिके चांगल्या प्रकारे वाढली असून, त्यांपासून खाद्य उत्पादनांची काढणीही केली आहे. अर्थात पृथ्वीवरील मातीमध्ये पिकांचे बायोमास प्रति ट्रे अधिक मिळाले. मंगळावरील माती आणि चंद्रावरील माती यामध्ये लक्षणीय फरक आहे. गाजर, मोहरी आणि गार्डन क्रेस या पिकापासून या मातीतून मिळालेल्या बियांचे अंकुरणही उत्तम प्रकारे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संशोधन जर्नल ओपन अॅग्रीकल्चरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मंगळासमान मातीमध्ये जेव्हा प्रथमच टोमॅटो चांगल्या प्रकारे वाढून, उत्तम लाल रंगाचे झाले, त्या वेळी आम्ही सर्वजण थरारून गेलो. कारण भविष्यातील शाश्वत कृषी परिस्थितीकीकडे जाणारे ते पहिले पाऊल असणार आहे. या बियांचे अंकुरणही चांगले असल्यामुळे बिजोत्पादनाच्या दृष्टीनेही ही माती उपयुक्त ठरू शकते.
- विगेर वॅमेलिंक,
संशोधक, वॅगेनिंगन विद्यापीठ, नेदरलॅंड.

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...