दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
टेक्नोवन
सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र
गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांच्याकडून धिंगरी आळिंबीला मागणी वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती पूरक उद्योग म्हणून धिंगरी उत्पादन प्रकल्पांना सुरवातदेखील झाली आहे. सध्या पारंपरिक पद्धतीने धिंगरी आळिंबीचे उत्पादन घेतले जाते.
गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांच्याकडून धिंगरी आळिंबीला मागणी वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती पूरक उद्योग म्हणून धिंगरी उत्पादन प्रकल्पांना सुरवातदेखील झाली आहे. सध्या पारंपरिक पद्धतीने धिंगरी आळिंबीचे उत्पादन घेतले जाते.
लहानस्तरावर आळिंबी उत्पादकांची गरज लक्षात घेऊन बंगळूर येथील भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेने सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र विकसित केले आहे. हे संयंत्र कोठेही नेता येते. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात या संयंत्रात योग्य तापमान नियंत्रित करता येत असल्याने चांगले आळिंबी उत्पादन घेता येते. या संयंत्रामुळे लहानस्तरावर आळिंबी उत्पादन करणे शक्य आहे, त्याचबरोबरीने ग्रामीण भागात याच्या निर्मितीचा व्यवसायही तयार होऊ शकतो. महिला बचत गटासाठी हे संयंत्र पूरक उद्योगासाठी उपयुक्त ठरणारे आहे.
असे आहे संयंत्र ः
१) सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्राचा आकार १.३५ मीटर x ०.९३ मीटर x १.६९ मीटर आहे.
२) हे संयंत्र पीव्हीसी पाइपच्या फिटिंगपासून तयार केलेले आहे.
३) संयंत्रात आळिंबी उत्पादन करताना कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच हवा खेळीत राहावी, यासाठी त्यावर नॉयलॉन जाळीचे आच्छादन करण्यात आलेले आहे.
४) संयंत्रावर गोणपाटाचे आच्छादन करता येते. गोणपाट ओले केल्याने संयंत्रात पुरेशी आद्रता राखणे सोपे जाते.
५) संयंत्रात ३० वॉट डीसी क्षमतेचा पंप बसविलेला आहे. त्याच्या पाइपला ०.१ मि.मि. आकाराचे नोझल बसविले असल्याने आळिंबी उत्पादनाच्या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म तुषार फवारले जातात. हा पंप सौरऊर्जा तसेच विद्युत ऊर्जेवर चालतो. सौरऊर्जेसाठी ३०० वॉट पॅनल बसविलेले आहेत. याचबरोबरीने एक इन्व्हर्टर, १२ वॉट बॅटरी आणि टायमर संयंत्रात आहे.
६) आळिंबी उत्पादनाचे संपूर्ण युनिट १.०८ मीटर x १.४८ मीटर x १.८ मीटर च्या स्टील फ्रेममध्ये बसविलेले आहे. या फ्रेमची मधील उंची २.२ मीटर ठेवण्यात आली आहे. फ्रेमला चाके लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे हे संयंत्र कोणत्याही ठिकाणी हालवणे सोपे जाते.
७) संयंत्राच्या फ्रेमवर सौर पॅनेल बसविलेले आहेत. त्याचबरोबरीने या फ्रेममध्ये इन्व्हर्टर आणि बॅटरी बसविण्याची सोय करण्यात आली आहे. या फ्रेमच्या तळाला पाण्याची टाकी आणि सूक्ष्म तुषार सिंचनासाठी पंप बसविलेला आहे.
आळिंबी उत्पादनाचा प्रयोग ः
- संस्थेतील तज्ज्ञांनी दोन वर्षे या संयंत्राच्या चाचण्या घेतल्या. या संयंत्रामध्ये तज्ज्ञांनी धिंगरी आळिंबीच्या इल्म आणि व्हाईट जातीचे उत्पादन घेतले. यासाठी एक किलोच्या २० बॅग संयंत्रात ठेवण्यात आल्या. याचबरोबरीने नेहमीच्या पद्धतीनेही या जातींचे उत्पादन घेण्यात आले.
- प्रयोगातून असे दिसून आले, की पारंपरिक पद्धतीपेक्षा इल्म ऑस्टर जातीचे १०८ टक्के आणि व्हाईट ऑस्टर जातीचे ५१ टक्के उत्पादन जास्त प्रमाणात मिळाले.
- संयंत्रातून प्रती महिना २५ ते २८ किलो आळिंबी उत्पादन घेणे शक्य आहे.