डाळिंबातील बुरशीजन्य मररोगाचे व्यवस्थापन

डाळिंब बागेमध्ये सूत्रकृमी, वाळवी, शॉर्ट होल बोरर या किडी आणि सेरॅटो सिस्टिस फेन्ड्रियास व फ्युजारियम या बुरशीमुळे मररोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तोडणीनंतर ताणावर असताना खालीलपैकी एका पर्यायाने ड्रेचिंग करावे.
डाळिंबातील बुरशीजन्य मररोगाचे व्यवस्थापन
डाळिंबातील बुरशीजन्य मररोगाचे व्यवस्थापन

डाळिंब बागेमध्ये सूत्रकृमी, वाळवी, शॉर्ट होल बोरर या किडी आणि सेरॅटो सिस्टिस फेन्ड्रियास  व फ्युजारियम या बुरशीमुळे मररोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडी व बुरशीच्या नियंत्रणासाठी तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खालीलपैकी एका पर्यायाने ड्रेचिंग करावे. पर्याय १  पहिली ड्रेचिंग ः प्रोपीकोनॅझोल (२५%) २ मिली अधिक क्लोरपायरीफॉस २ मिली प्रती लीटर पाणी या प्रमाणे १० लीटर द्रावण प्रती झाड.  दुसरी ड्रेंचिंग (पहिल्या ड्रेचिंगनंतर ३० दिवसाने) ः अ‍ॅस्परजिलस नायजर ए एन २७  बुरशी ५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रती झाड.   तिसरी ड्रेचिंग ः दुसऱ्या ड्रेचिंगनंतर ३० दिवसांनी व्हीएएम बुरशी (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा - राइझोफॅगस इररेगुलरिस) २५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो.  पर्याय २   प्रोपिकोनॅझोल (२५%) २ मिली अधिक क्लोरपायरीफॉस २ मिली प्रती लीटर पाणी या प्रमाणे २० दिवसांच्या अंतराने ३ ड्रेचिंग करा.  पर्याय ३  पहिली ड्रेचिंग ः फोसेटिल ए एल (८०% डब्ल्यूपी) ६ ग्रॅम प्रती झाड (१० लीटर द्रावण.)  दुसरी ड्रेचिंग ः टेब्यूकोनॅझोल (२५.९% डब्ल्यू /डब्ल्यू ई सी) ३ मिली प्रती झाड (१० लीटर द्रावण)  तिसरी ड्रेचिंग ः फोसेटिल ए एल (८०% डब्ल्यूपी)  ६ ग्रॅम प्रती झाड ( १० लीटर द्रावण)  चौथी ड्रेचिंग ः टेब्यूकोनॅझोल (२५.९%) ३ मिली प्रती झाड (१० लीटर द्रावण)  टीप ः दोन ड्रेचिंगमध्ये २० दिवसांचे अंतर ठेवावे.

अ‍ॅस्परजिलस नायजर ए एन २७ बुरशीचे फायदे

 अ‍ॅस्परजिलस नायजरचा हे जैविक कीडनाशक आणि जैविक खत म्हणून उपयुक्त ठरते. अशा प्रकारचे कार्य करणारे एकमेव पेटंटप्राप्त बायोफॉर्म्यूलेशन आहे.   सूत्रकृमीसह मर रोगाच्या सर्व प्रकारच्या कारणीभूत घटकांवर नियंत्रण ठेवते.  सर्व प्रकारच्या हवामानात, माती व पाणी परिस्थितीमध्ये कार्य करते.  ही बुरशी फायदेशीर वनस्पती संप्रेरके सोडत असल्याने झाडाची वाढ, फुलधारणा फळ उत्पादनाला प्रोत्साहन मिळते. वनस्पतींमध्ये रोग व इतर तणाव प्रतिकारशक्ती वाढवते.  अ‍ॅस्परजिलस नायजर ए एन २७ बुरशी आणि  व्हीएएम बुरशी (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा-राइझोफॅगस इररेगुलरिस) यांच्या कार्यामध्ये एकरुपता आहे. (पूर्वी ग्लोमस इंट्रारेडिस म्हणून ओळखले जाई.)  व्हीएएम फंगस डाळिंबाच्या मुळांमध्ये स्थापित होते. पाण्याच्या ताण परिस्थितीत मदत करते.  दोन्ही बुरशी फॉस्फेट विरघळवणाऱ्या आहेत.

 ः ०२१७ २३५ ४३३०,  ः दिनकर चौधरी, ९६२३४४४३८०,  (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, केगाव, सोलापूर)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com