पेरणी यंत्र
पेरणी यंत्र

पेरणीसाठी कोणती सुधारित यंत्रे वापरावीत?

पेरणीसाठी कोणती सुधारित यंत्रे वापरावीत?

बैलचलित तिफण  ही तीन ओळीची बैलचलित तिफण असून, खासकरून रब्बी ज्वारी पेरणीसाठी विकसित करण्यात आली आहे.  बियाणे १३ ते १५ सें.मी. पर्यंत खोलीवर पेरता येते. पेरणी करताना पूर्ण माती बियाण्यावर न पडता त्या ठिकाणी ६ ते ९ सें.मी. पर्यंत सरी पडते. याचा उपयोग हलका पाऊस झाल्यावर त्या ठिकाणी जलसंधारण म्हणजे पाणी अडविण्यासाठी होतो.  तिफणीसाठी विशिष्ट आकाराचे फारोळे (फण) असल्यामुळे १५ सें.मी. खोलीपर्यंत बियाणे टाकण्यासाठी शक्ती कमी लागते. मध्यम आकाराचे बैलसुद्धा ही तिफण ओढू शकतात. सर्वसाधारणतः एका दिवसामध्ये ५ ते ६ एकर क्षेत्रावर पेरणी करता येते.  ‘क्रीडा’ बैलचलित बहुपीक टोकण यंत्र  पारंपरिक पेरणी पद्धतीमधील त्रुटी लक्षात घेता केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद तर्फे क्रिडा बैलचलित बहुपीक टोकण यंत्र विकसित करण्यात अाले अाहे.  या यंत्राने ज्वारी, हरभरा, मका, भुईमूग, गहू पिकांची पेरणी एका मजुराद्वारे करता येते. या यंत्राचे बीज व खत पेटी, गती देणारी यंत्रणा, दिशा देणारी चाके, फण (दोन, तीन किंवा चार फणांमध्ये उपलब्ध) बियाण्याच्या तबकड्या, बियाणे नळ्या हे भाग आहेत. हे भाग मुख्य सांगाड्यावर बसविलेले आहे. संपर्क -  स्मिता सोलंकी, ८००७७५२५२६ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com