सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती 

सुधारीत सोयाबीन आंतरपीक पद्धती
सुधारीत सोयाबीन आंतरपीक पद्धती

राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असली, तरी आपल्या देशात सोयाबीनची उत्पादकता निम्मी आहे.  उत्पादनवाढीसाठी महत्त्वाच्या बाबी  सुधारित वाण ः  जे.एस. ३३५, एम.ए.सी.एस. १३, एम.ए.सी.एस. ५८, एम.ए.सी.एस. १२४, एम.ए.सी.एस. ४५०, एम.ए.सी.एस. ११८८, फुले कल्याणी (डी.एस. २२८), फुले अग्रणी, जे.एस. ९३-०५ ,जे.एस. ९७-५२, जे.एस. ९५-६०, एन.सी.आर. ३७, एम.ए.यू.एस. ४७, एम.ए.यू.एस. ६१, एम.ए.यू.एस. ६१-२, एम.ए.यू.एस. ७१, एम.ए.यू.एस. ८१, एम.ए.यू.एस. १५८, टीए.एम.एस. ९८-२१.  पेरणी ः  सोयाबीनची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असावी. त्यासाठी वाफशावर पेरणी करावी. पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. पेरणी त्वरित ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी.पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.  खत व्यवस्थापन ः 

  • हेक्टरी ५० किलो नत्र + ७५ किलो स्फुरद + ३० किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. 
  • जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीवेळी द्यावे. 
  • तसेच, उत्पादनवाढीच्या दृष्टीने १० किलो बोरॅक्स प्रतिहेक्टरी पेरणीवेळी द्यावे. 
  • आंतरमशागत ः  सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तणवाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असतात. या काळात पीक तणविरहित ठेवण्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी, तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहित ठेवावे.  आंतरपीक पद्धती ः  बहुतांश ठिकाणी कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीन सलग पीक म्हणून घेतात. मात्र, सलग पीक घेण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. कारण...  १) कमी पर्जन्यमान व ज्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीतून शाश्वतता, स्थिर उत्पन्न मिळू शकते.  २) प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्या तरी एका पिकाचे उत्पादन हाती येते.  ३) आंतरपिकात सोयाबीनसारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश असल्यामुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर होते.  ४) आंतरपीक पद्धतीमुळे तणांच्या वाढीस आळा बसतो. रोग व किडींचे प्रमाण कमी आढळून येते.  ५) जनावरांकरिता सकस चारा उपलब्ध होतो.  तूर + सोयाबीनसारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास देशातील डाळ व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन वाढून तेल व डाळीची कमतरता भरून निघेल.  सोयाबीनमध्येसुद्धा सोयाबीन+ज्वारी+तूर, ६:२:१ किंवा ९:२:१ ओळी असे त्रिस्तरीय आंतरपीक घेता येते. सोयाबीन या मुख्य पिकाच्या २ किंवा ६ किंवा ९ ओळींनंतर तूर या आंतरपिकाची एक ओळ पेरणे आर्थिकदृष्ट्या फायद्याशीर दिसून आले आहे.  तूर + सोयाबीन (१:२)  कपाशी + सोयाबीन (१:१) .  सोयाबीन + भुईमूग (१४, १:६) .  सोयाबीन + ज्वारी (१:२, २:२) .  सोयाबीन + बाजरी (२:४, २:६)  संपर्क ः ८५७५५५५४४४  (सहाक प्राध्यापक, सौ. के. एस. के.(काकू) कृषि महाविद्यालय, बीड.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com