agriculture stories in Marathi soybean intercrop system | Agrowon

सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती 
दीपाली मुटकुळे, विवेक राऊत 
बुधवार, 17 जुलै 2019

राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असली, तरी आपल्या देशात सोयाबीनची उत्पादकता निम्मी आहे. 

उत्पादनवाढीसाठी महत्त्वाच्या बाबी 

सुधारित वाण ः 
जे.एस. ३३५, एम.ए.सी.एस. १३, एम.ए.सी.एस. ५८, एम.ए.सी.एस. १२४, एम.ए.सी.एस. ४५०, एम.ए.सी.एस. ११८८, फुले कल्याणी (डी.एस. २२८), फुले अग्रणी, जे.एस. ९३-०५ ,जे.एस. ९७-५२, जे.एस. ९५-६०, एन.सी.आर. ३७, एम.ए.यू.एस. ४७, एम.ए.यू.एस. ६१, एम.ए.यू.एस. ६१-२, एम.ए.यू.एस. ७१, एम.ए.यू.एस. ८१, एम.ए.यू.एस. १५८, टीए.एम.एस. ९८-२१. 

राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असली, तरी आपल्या देशात सोयाबीनची उत्पादकता निम्मी आहे. 

उत्पादनवाढीसाठी महत्त्वाच्या बाबी 

सुधारित वाण ः 
जे.एस. ३३५, एम.ए.सी.एस. १३, एम.ए.सी.एस. ५८, एम.ए.सी.एस. १२४, एम.ए.सी.एस. ४५०, एम.ए.सी.एस. ११८८, फुले कल्याणी (डी.एस. २२८), फुले अग्रणी, जे.एस. ९३-०५ ,जे.एस. ९७-५२, जे.एस. ९५-६०, एन.सी.आर. ३७, एम.ए.यू.एस. ४७, एम.ए.यू.एस. ६१, एम.ए.यू.एस. ६१-२, एम.ए.यू.एस. ७१, एम.ए.यू.एस. ८१, एम.ए.यू.एस. १५८, टीए.एम.एस. ९८-२१. 

पेरणी ः 
सोयाबीनची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असावी. त्यासाठी वाफशावर पेरणी करावी. पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. पेरणी त्वरित ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी.पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. 

खत व्यवस्थापन ः 

  • हेक्टरी ५० किलो नत्र + ७५ किलो स्फुरद + ३० किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. 
  • जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीवेळी द्यावे. 
  • तसेच, उत्पादनवाढीच्या दृष्टीने १० किलो बोरॅक्स प्रतिहेक्टरी पेरणीवेळी द्यावे. 

आंतरमशागत ः 
सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तणवाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असतात. या काळात पीक तणविरहित ठेवण्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी, तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहित ठेवावे. 

आंतरपीक पद्धती ः 
बहुतांश ठिकाणी कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीन सलग पीक म्हणून घेतात. मात्र, सलग पीक घेण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. कारण... 
१) कमी पर्जन्यमान व ज्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीतून शाश्वतता, स्थिर उत्पन्न मिळू शकते. 
२) प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्या तरी एका पिकाचे उत्पादन हाती येते. 
३) आंतरपिकात सोयाबीनसारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश असल्यामुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर होते. 
४) आंतरपीक पद्धतीमुळे तणांच्या वाढीस आळा बसतो. रोग व किडींचे प्रमाण कमी आढळून येते. 
५) जनावरांकरिता सकस चारा उपलब्ध होतो. 
तूर + सोयाबीनसारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास देशातील डाळ व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन वाढून तेल व डाळीची कमतरता भरून निघेल. 

सोयाबीनमध्येसुद्धा सोयाबीन+ज्वारी+तूर, ६:२:१ किंवा ९:२:१ ओळी असे त्रिस्तरीय आंतरपीक घेता येते. सोयाबीन या मुख्य पिकाच्या २ किंवा ६ किंवा ९ ओळींनंतर तूर या आंतरपिकाची एक ओळ पेरणे आर्थिकदृष्ट्या फायद्याशीर दिसून आले आहे. 
तूर + सोयाबीन (१:२) 
कपाशी + सोयाबीन (१:१) . 
सोयाबीन + भुईमूग (१४, १:६) . 
सोयाबीन + ज्वारी (१:२, २:२) . 
सोयाबीन + बाजरी (२:४, २:६) 

संपर्क ः ८५७५५५५४४४ 
(सहाक प्राध्यापक, सौ. के. एस. के.(काकू) कृषि महाविद्यालय, बीड.) 

इतर कृषी सल्ला
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
सोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...
अजैविक ताणाविरोधी लढाईत जैवसंप्रेरके...पुणे येथे द्राक्ष बागायतदार संघ महाअधिवेशन ३ ते ५...
पाणी साचलेल्या द्राक्षबागांसाठी...द्राक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात गेल्या...
फळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य... एकूण फळागळीमध्ये ७० ते ८० टक्के फळे ही...
तणनियंत्रण पद्धतींचा विकास हाताने तण उपटून टाकण्यापासून सुरू झालेला हा...
तणांचे आच्छादन हा सर्वोत्तम पर्याय तणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतानाच तणांचे...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
तणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास माणसाने शेतीला सुरवात केल्यानंतर काही काळात अन्य...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
कृषी सल्ला : ज्वारी, सोयाबीन ज्वारी      रोप अवस्था...
शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख, उद्दिष्टे मागील भागापर्यंत आपण गटशेती कशी करावी, याची...
ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड...कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर...
भातावरील खोडकिडीचे एकात्मिक नियंत्रण महाराष्ट्रात कोकणासह पूर्व विदर्भातील गोंदिया,...
अधिक पाऊस, ढगाळ वातावरणात करावयाच्या...द्राक्ष विभागातील बहुतांश भागांमध्ये सध्या सतत...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, भाजीपाला...भात  फुटवे अवस्था   पुढील...
तणविज्ञानाची तत्त्वे अनेक वाचकांना सूक्ष्मजीवशास्त्राच्या...
कीड-रोग नियंत्रण : योग्य वेळी वापरा...परजीवी कीटकांचे स्थलांतर खूप कमी अंतरापर्यंतच...