agriculture stories in Marathi Soybean summer seed production part 2 | Agrowon

उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्र

डॉ. एस.पी. म्हेत्रे, डॉ. आर. एस. जाधव, व्ही. आर. घुगे
शनिवार, 9 जानेवारी 2021

घरगुती पातळीवर बियाणाच्या उपलब्धतेसाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन केल्यास उपयुक्त ठरेल.

गत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने बियाणांची उगवणशक्ती कमी राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी घरगुती पातळीवर बियाणाच्या उपलब्धतेसाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन केल्यास उपयुक्त ठरेल.

उत्तरार्ध

आंतरमशागत : पीक २० ते ३५ दिवसाचे असताना दोन कोळपण्या (१५ ते २० दिवस पहिली आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी) व एक निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे. एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करू नये, अन्यथा सोयाबीनच्या मुळ्या तुटून नुकसान होते.

सिंचन नियोजन : पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देवून पेरणी करावी. थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णत: उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागू शकतात. चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर ५ दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सोयाबीनमध्ये रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याचा ताणास संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे. ज्या शेतात बीजोत्पादन घ्यावयाचे आहे, त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पीक पेरणी ते काढणी या कालावधीत साधारणत: जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० पाणी पाळ्याची आवश्यकता आहे.

भेसळ काढणे : सोयाबीन पिकामध्ये झाडांची उंची, पानांचा आकार, झाडावरील लव, पान, खोड व फुलांचा रंग इत्यादी लक्षणांनुसार भेसळ ओळखून नष्ट करावी.

पीक संरक्षण :
किडी ः
उन्हाळी सोयाबीन पिकावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी, घाटेअळी, वाटाण्यावरील शेंगा पोखरणारी अळी तसेच पांढरी माशी व तुडतुडे इ. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी.
फवारणी प्रति लिटर पाणी
प्रोफेनोफॉस (५० ईसी) २ मि.लि. किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सी.एस.) ०.६ मि.लि. किंवा थायामिथोक्झाम (१२.६०%) अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.२५ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि.

रोग ः उन्हाळी सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. मात्र, ‘यलो व्हेन मोझॅक’ या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशी प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्यास या रोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकडे लक्ष ठेवावे. त्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
थायामिथोक्झाम (१२.६०%) अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.२५ मि.लि.

काढणी व मळणी : शेंगा पिवळ्या पडून पक्व होताच पिकाची काढणी करावी. कापणीनंतर पिकाचे छोटे-छोटे ढीग करून २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यावे. मळणी यंत्राची गती कमी करून मळणी करावी. बियाण्याच्या बाह्य आवरणाला इजा पोचणार नाही, याकडे लक्ष द्यावे. मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्क्यापर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्यांची गती ४०० ते ५०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्क्यापर्यंत असेल तर गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी. साधारणत: उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या बियाण्याचा रंग पिवळसर हिरवट असतो.

साठवण : मळणीनंतर बियाणे ताडपत्री किंवा सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरून बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यापर्यंत आणावे. बियाणे स्वच्छ केल्यानंतर पोत्यात भरून साठवण करावी. साठवणीचे ठिकाण थंड, ओलावारहित व हवेशीर असले पाहिजे. साठवण करताना एकावर एक चार पेक्षा जास्त पोती ठेवू नयेत.

उत्पादन : उन्हाळी सोयाबीनचे एकरी ३ ते ५ क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते.

महत्त्वाचे...

  • उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामासारखे होत नाही. दाण्याचा आकार लहान असतो. १०० दाण्याचे वजन ८ ते १० ग्रॅम असते.
  • उन्हाळी सोयाबीनचा हंगाम फक्त घरच्या घरी बीजोत्पादन करण्यासाठी चांगला आहे.
  • खरीप २०२० मध्ये सोयाबीन काढणीवेळी आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात भिजलेले असेल. अशा बियाण्याची उगवणक्षमता कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन घेण्यास हरकत नाही.

डॉ. एस.पी. म्हेत्रे, ७५८८१५६२१०
व्ही. आर. घुगे, ७५८८१५६२१३

( सोयाबीन संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगाची शास्त्रीय लागवड पद्धतखरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात जास्त...
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड...भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
उन्हाळी भुईमूगाचे लागवड तंत्रउन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि...
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापनसध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा...
करडईची सुधारित लागवड करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
खत, पाणी व्यवस्थापनातून वाढवा करडई...योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन, विरळणी आणि...
सुधारित जवस वाणांची लागवड कराजवसाच्या सुधारित वाणाची निवड केल्यास...
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन...गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक...
सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रणसद्य परिस्थितीत सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असून...
सोयाबीन पिकांवरील किडींचे एकात्मिक...सोयाबीन पिकात ९० ते ११० दिवसात येणाऱ्या ...
सोयाबीन पाने पिवळी पडण्याचे कारण जाणून...यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस...
तीळ लागवड तंत्रतीळ हे भारतातील सर्वांत जुने तेलबिया पीक आहे....
सोयाबीन लागवडीतील समस्यावरील उपाययोजनासोयाबीनचे योग्य वाण निवडताना... सध्या बाजारात...
सूर्यफूल लागवड नियोजन जमीन : सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
रुंद वरंबा सरी पद्धती भुईमुगासाठी आहे...भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या...