agriculture stories in marathi special Mechanical production of roasted peanuts by Prafulla Phale | Agrowon

यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे शेंगदाणे निर्मिती

गोपाल हागे
बुधवार, 15 जानेवारी 2020

मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या युवकाने आपल्या प्रक्रिया उद्योगाची गरज लक्षात घेऊन भुईमूग शेंगा फोडणीचे यंत्र स्वकल्पनेतून तयार करून घेतले आहे. हाताळणीस सोपे, कमी खर्चिक व तासाला एक क्विंटलपर्यंत शेंगा फोडणाऱ्या या यंत्रामुळे वेळ, मजुरी व श्रमात बचत होऊन खारा दाणा निर्मितीचा व्यवसाय सुकर झाला आहे.

मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या युवकाची घरची सात एकर शेती असून सुमारे ३५ एकर शेती ते कराराने कसतात. खरिपातील भुईमूग हे त्यांचे प्रमुख पीक आहे. दरवर्षी सुमारे सहा एकरांवर त्याचे क्षेत्र असते.

खारे दाणेनिर्मितीचा व्यवसाय

मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या युवकाने आपल्या प्रक्रिया उद्योगाची गरज लक्षात घेऊन भुईमूग शेंगा फोडणीचे यंत्र स्वकल्पनेतून तयार करून घेतले आहे. हाताळणीस सोपे, कमी खर्चिक व तासाला एक क्विंटलपर्यंत शेंगा फोडणाऱ्या या यंत्रामुळे वेळ, मजुरी व श्रमात बचत होऊन खारा दाणा निर्मितीचा व्यवसाय सुकर झाला आहे.

मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या युवकाची घरची सात एकर शेती असून सुमारे ३५ एकर शेती ते कराराने कसतात. खरिपातील भुईमूग हे त्यांचे प्रमुख पीक आहे. दरवर्षी सुमारे सहा एकरांवर त्याचे क्षेत्र असते.

खारे दाणेनिर्मितीचा व्यवसाय

भुईमुगाची विक्री बाजार समितीत केली, तर जेमतेम दरांवर समाधान मानावे लागते. अशावेळी उत्पादन आणि उत्पन्न यात फारसे अंतर नसते. त्यामुळे प्रफुल्लने प्रक्रिया करून खारे शेंगदाणे तयार करायचे ठरवले. कृषी विभाग- आत्माचे तालुका तंत्रज्ञान समन्वयक विजय शेगोकार यांच्या मदतीने याविषयातले प्रशिक्षण घेतले. उत्पादनासह पॅकिंग करण्याबाबतही शिकून घेतले.

व्यवसायातील पूर्वीच्या त्रुटी

 • सुरुवातीला शेंगदाणे महिला मजुरांकडून फोडून घेतले जायचे.
 • त्यासाठी त्यांना द्यावा लागणारा दर - १० रुपये प्रति किलो
 • दिवसभरात प्रति महिला १२ ते १५ किलोपर्यंतच शेंगदाणे फोडायची.
 • हाताने काम करताना काही शेंगदाणे फुटायचे. त्यावरील आवरण वेगळे व्हायचे. फूट व्हायची.

त्रुटी दूर करण्यासाठी यांत्रिक मार्ग शोधला

डोक्यातील कल्पना
हाताने शेंगा फोडणीसाठी वेळ, श्रम, मजूरबळ वाया जात होते. अशावेळी शेंगा फोडणीसाठी यंत्र तयार केले तर? अशी कल्पना प्रफुल्ल यांच्या डोक्यात आली. त्यांचा चुलतभाऊ अकोला औद्योगिक वसाहतीत काम करायचा. त्याला वेगवेगळी यंत्रे तयार करण्याचे तंत्र अवगत होते. भावाचीच मदत घ्यायचे ठरवले.
प्रचलित काम पद्धतीतील त्रुटी सांगून त्यात कोणत्या सुधारणा कशा करता येतील, याबाबत प्रफुल्ल यांनी आपल्या डोक्यातील कल्पना भावाला सांगितल्या.

कल्पनेचे रूपांतर

तसे यंत्र बनविताना असंख्य अडचणी आल्या. यंत्राचा ढाचा तीन ते चार वेळा मोडून नव्याने करावा लागला. त्यामध्ये खर्चसुद्धा झाला. गावातच काम केल्याने मजुरीचा खर्च मात्र थोडा कमी लागला. सातत्याने प्रयोग करीत अखेर प्रफुल्ल यांच्या डोक्यातील यंत्र सहा ते आठ महिन्यांत तयार झाले.

असे आहे सुधारीत तंत्र

 • विजेवर चालते
 • ताशी फोडली जाणारी शेंग - एक क्विंटल
 • त्यापासून मिळणारे शेंगदाणे - ६५ ते ७० किलो
 • यंत्र हाताळणीस सोपे
 • वरील हॉपरमधून शेंगा टाकण्यात येतात.
 • खालील बाजूस असलेल्या चाळणीतून प्रतवारी होते.
 • एक एचपीच्या मोटरची ऊर्जा
 • खालील बाजूस फॅन. त्यामुळे फोलपटे वेगळी होतात.
 • यंत्रनिर्मितीसाठी आलेला खर्च - २८ हजार रु.

झालेले फायदे

 • दाणे फुटण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले
 • मानवी श्रमाची मोठी बचत होऊन कामांत वेगही आला.
 • दररोज दोन ते तीन तास शेंगफोडणी करणे शक्य होते.
 • यंत्राच्या आधारे दाण्यांची प्रतवारी होते. त्यातून जाड दाणे वेगळे होतात.
 • दुय्यम दर्जाचे दाणे वेगळे होतात. त्यापासून गूळपट्टी तयार केली जाते.
 • गावातील अन्य शेतकऱ्यांनाही शेंगा फोडून दिल्या जातात. त्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

शेती ते प्रक्रिया उद्योग

शेती

 • भुईमूग शेती - सहा एकर
 • एकरी उत्पादन - १० ते १८ क्विंटलपर्यंत

वाण

 • पीडीकेव्ही एके ३०३
 • वाण जाड दाण्याचा. त्यापासून उत्कृष्ट दर्जाचे खारे शेंगदाणे (खारेमुरे) तयार करता येतात.

वैशिष्ठ्ये

 • यांत्रिक शेंगाफोंडणी
 • खारे शेंगदाणे निर्मिती

विक्री

 • मार्चपर्यंत सुमारे ६० ते ७० क्विंटल

ठळक आकडेवारी

 • भुईमूग बाजारात विकला असता तर खारे शेंगदाणा विक्रीतून
 • क्विंटलला ४००० ते ४५०० रुपये मिळणारा दर २०० रुपये प्रति किलो 
 • म्हणजे किलोला ४० ते ४५ रुपये दर मिळाला असता.

पूर्वी दिवसभरात होणारी शेंगाफोडणी आता यंत्राद्वारे तासाला १०० किलो
१२ ते १५ किलो

प्रयोगशीलता

यावर्षी अतिपावसामुळे अन्य भागातील भुईमुगाच्या ओल्या शेंगा अकोला बाजारात विक्रीला आल्या नाहीत. अशा काळात फायदा उठवित फाले कुटूंबाने जवळपास महिनाभर दररोज दोन क्विंटल ओली शेंग बाजारात विक्री केली. त्यास ४५ ते ५० रुपये प्रति किलो दर मिळाला. प्रफुल्ल यांनी भुईमुगात आपली प्रयोगशीलता जपली आहे. यावर्षी राहुरी कृषी विद्यापीठाच्या पूर्व प्रसारीत केडीएस १६० वाणाचे ३० किलो बियाणे लावले. त्यापासून पाच क्विंटल उत्पादन घेतले. बियाणे वृद्धींगत करण्याचे काम सुरू केले आहे.

खाऱ्या शेंगदाण्यांना मार्केट

खारेमुऱ्यांचे ‘वावर’ या ब्रॅंडनेमखाली पॅकिंग केले आहे. अकोलाशहरातील किराणा शॉपी, हॉटेल्सला त्यांचा नियमित पुरवठा होतो. आपल्यातील कल्पनाशक्तीला वाव देऊन उद्योगाला यंत्राची जोड दिलेल्या प्रफुल्ल यांना विविध संस्था, शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत.

संपर्क : प्रफुल्ल फाले - ९९७०७११३७०, ८३२९०२८०३०


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रेतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदेभविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार...
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेकोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या...
नत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन...कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापरपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त...
किफायतशीर बैलचलित अवजारेबैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार...
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
मातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्रमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत...
बैलचलित अवजारे ठरताहेत फायदेशीरशेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना महाराष्ट्रामध्ये शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक...
गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रेग्रामीण पातळीवर दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय...
भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेतीबहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
बहुपयोगी पॉवर टिलरपॉवर टिलरमधील रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे...
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक...काढणीपश्चात अन्नधान्यांच्या साठवणीमध्ये अधिक...