Agriculture stories in Marathi, special rights to tribles, AGROWON | Page 2 ||| Agrowon

ग्रामसभांना मिळणार वनहक्क कायद्याचे धडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

 राज्यातील सहा हजार ५०० ग्रामसभांत वनहक्क कायद्याबाबत धडे देण्यात आले आहेत. याबाबत मुंबई विद्यापीठातर्फे लवकरच अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. मुंबई स्कूल ऑफ इकोनॉमिक्‍स ॲण्ड पब्लिक पॉलिसी (अर्थशास्त्र) या विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला.

 राज्यातील सहा हजार ५०० ग्रामसभांत वनहक्क कायद्याबाबत धडे देण्यात आले आहेत. याबाबत मुंबई विद्यापीठातर्फे लवकरच अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. मुंबई स्कूल ऑफ इकोनॉमिक्‍स ॲण्ड पब्लिक पॉलिसी (अर्थशास्त्र) या विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला.

विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे नुकतेच मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ॲण्ड पब्लिक पॉलिसी असे नामकरण करण्यात आले. आदिवासींना त्यांचे हक्क, जीवनशैली वृद्धिंगत करण्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षण मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ॲण्ड पब्लिक पॉलिसीतर्फे देण्यात येणार आहे. त्यासाठी पदविका अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍सचे संचालक डॉ. नीरज हातेकर यांनी दिली.

सामूहिक वनहक्क व्यवस्थापन कसे करायचे, त्याबाबत ग्रामसभांतील दोन सदस्यांना धडे देणार आहेत, असे हातेकर यांनी सांगितले. वनसंपत्तीवर आदिवासींचा हक्क आहे. वनहक्क कायद्यांतर्गत आदिवासींना मिळालेले संरक्षण, त्याची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत त्यांना पुरेशी माहिती नाही. या हक्कांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. आदिवासी भागांनाही भेटी दिल्यांनतर त्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरले, असे हातेकर म्हणाले. 

असा आहे अभ्यासक्रम
जंगलातून मिळालेला माल कसा विकायचा, त्याची पद्धत, त्यासाठी आवश्‍यक नियम आदींबाबत आदिवासींना माहिती देण्यात येणार आहे. जैवविविधता व्यवस्थापन, शाश्वत शेती, सहकारी संघटनांची उभारणी, आवश्‍यक वित्त व लेखापालाचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...