agriculture stories in Marathi Sprinkler irrigation for pulses gives high yield | Agrowon

तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे उत्पादन

वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

कडधान्य पिकांमध्ये तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला. या पद्धतीमुळे पाण्यामध्ये सुमारे ४० टक्के बचत झाली असून, उत्पादनामध्ये ३४.८ टक्क्यानी वाढ झाली

हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी गटासोबत कडधान्य पिकांमध्ये तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला. या पद्धतीमुळे पाण्यामध्ये सुमारे ४० टक्के बचत झाली असून, उत्पादनामध्ये ३४.८ टक्क्यानी वाढ झाली. या तंत्राचा प्रसार आता सर्व बुंदेलखंड प्रांतामध्ये करण्याचे नियोजन फळबाग विभाग करत आहे.

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रांतातील हमिरपूर जिल्हा हा कडधान्यांचे कोठार म्हणून ओळखले जातो. या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण कमी असून, सिंचनाच्या सुविधा फारशा नाहीत. येथील केवळ २७.७ टक्के कृषिक्षेत्र हे सिंचनाखाली असून, उर्वरित ७२.३ टक्के कोरडवाहू आहे. जे भाग सिंचनाखाली आहेत, तिथे कालवे हा सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. या टप्प्यामध्ये जमिनीमध्ये अधिक ओलावा राहत असल्याने कडधान्य पिकांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात जाणवतो. या प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचन तंत्राचा अवलंब वाढविण्यासाठी हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला. त्यांनी या विभागामध्ये सिंचन पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच कडधान्य पिकांचे मर रोगाने होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले.

सामान्यतः येथील कडधान्य उत्पादक शेतकरी पाटपाणी पद्धतीचा अवलंब करतात. मात्र पिकांच्या चांगल्या वाढीसाठी संवेदनशील अवस्थेमध्ये जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा असणे आवश्यक असते. पिकाला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच पाणी देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने तुषार सिंचन पद्धतीचा पुरस्कार केला.

निष्कर्ष ः

  • कडधान्याची पेरणी ऑक्टोबर महिन्यामध्ये पेरणी यंत्राद्वारे ३० सेंमी बाय १० सेंमी अंतरावर केली. रोपावस्थेमध्ये आणि फुलोरा अवस्थेच्या किंचित आधी असे दोन पाणी तुषार पद्धतीने देण्यात आले.
  •  तुषार सिंचन पद्धतीखालील कडधान्यांचे उत्पादन १७.३१ क्विंटल प्रति हेक्टर म्हणजेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये ६.०४ क्विंटल प्रति हेक्टरने जास्त होते. (३४.८ टक्के)
  • तुषार सिंचन पद्धतीच्या शेतातील उत्पादन खर्च हा २२,७०० रुपये प्रति हेक्टर म्हणजेच २५०० रुपयांनी (११.० टक्के) कमी होता.
  •  एकूण हेक्टरी उत्पन्न ७९९७२ रुपये मिळाले. जे पारंपरिक पिकापेक्षा हेक्टरी २७,९०५ रुपये (३४.८ टक्के) जास्त होते.
  •  निव्वळ हेक्टरी उत्पन्न ५७,२७२ रुपये मिळाले, जे पारंपरिक पिकापेक्षा हेक्टरी ३०,४०५ रुपये (५३.० टक्के) जास्त होते.
  •  तुषार सिंचन पद्धतीचे नफा खर्च गुणोत्तर हे २.५२ ः १ इतके राहिले. पारंपरिक पिकामध्ये ते केवळ १.३२ ः१ इतके होते.

यशाचे तोरण
१) शेतकरी गट आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी राबवलेल्या या तुषार सिंचन तंत्राचे विश्लेषण करण्यात आले. त्यात नफा आणि खर्च यांचे गुणोत्तर हे ३४ टक्क्यांपासून ५२ टक्क्यांपर्यंत नोंदविण्यात आले. या तंत्रज्ञानाच्या यशामुळे राज्याच्या फळबाग विभागाने त्याचा प्रसार केवळ हमिरपूर जिल्ह्यापुरताच न करता संपूर्ण बुंदेलखंड प्रांतामध्ये करण्याचे नियोजन केले आहे.
२) पाण्याची बचत ः कडधान्य पिकांच्या आवश्यकतेइतकेच हलके पाणी पिकांच्या योग्य अवस्थेमध्ये तुषार सिंचन पद्धतीने दिल्याने पारंपरिक पाट पाणी पद्धतीच्या तुलनेमध्ये पाण्यामध्ये ४० ते ४५ टक्क्यांनी बचत झाली. अधिक पाण्यामुळे होणारा मर रोगाचा प्रादुर्भाव घटला.
---
(स्रोत ः कृषी विज्ञान केंद्र, हमिरपूर, उत्तर प्रदेश)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
गोचिड निर्मूलनासाठी पर्यावरणपुरक पद्धतीजनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी...
सुधारित भोपळा जातीच्या लागवडीतून...ओडिशा येथील चंदन कुमार खुंटिया यांनी केवळ...
फवारणी यंत्राची देखभालआपण शेतामध्ये फवारणी यंत्रांचा अनेक वेळा वापर करत...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगररोटरी नांगर हे प्राथमिक मशागतीसाठी वापरले जाणारे...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
कार्यक्षम जल व्यवस्थापनासाठी नव्या दिशाकाटेकोर सिंचन व कार्यक्षम जलवापर पद्धतीच्या...
शेती नियोजनासाठी ड्रोन तंत्रज्ञानपिकांमधील पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची...
पर्वतीय, पठारी प्रदेशातील शेतीसाठी...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय...
हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणाआज अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे असले, तरी भविष्यात...
आधुनिक काळाची गरज ः कृषी यंत्रमानवजागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कृषी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग व्हावामहाराष्ट्र राज्य अवर्षण, दुष्काळ याबरोबरच अनियमित...
‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञानावर आधारित...नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पुयणी (ता. नांदेड...
ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रेरोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी...
अर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड...आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी...
शून्य मशागतीसह पेरणी यंत्राचा वापरतागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक...
शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव,...
हुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध...भारतीय कृषी संशोधन  संस्थेच्या बंगळूर येथील...
तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...