भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धती

कोकणामध्ये भाताची रोपवाटिका व नंतर पुनर्लागवड केली जाते. भात लागवडीसाठी डॉ. नारायण सावंत यांनी लागवडीची चार सूत्रे मांडलेली आहेत. त्यांनी विकसित केलेल्या पद्धतीमुळे भात उत्पादनाचा खर्च कमी होण्यासोबतच उत्पादनामध्ये वाढ होते.
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धती
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धती

सूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर

  • भाताच्या राख (पूर्ण जळालेली पांढरी राख नव्हे) रोपवाटिकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापुर्वी प्रति चौरस मीटर एक किलो या प्रमाणात ४ ते ७ से. मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी व नंतर प्रक्रिया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.
  • भाताचा पेंढा पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्टरी २ टन या प्रमाणात शेतात गाडून घ्यावा 
  • फायदे  यामुळे भातपिकांना सिलिका (१००-१२० किलो) व पालाश (२०-२५ किलो) यांचा पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थात वाढ होऊन रोपे निरोगी व कणखर होतात. खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.  सूत्र २  गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हिरवळीच्या खताचा वापर. यामध्ये गिरीपुष्प या हिरवळीच्या जलद वाढणाऱ्या वनस्पतीची बांधावर लागवड करावी. त्याच्या फांद्या जमिनीपासून ३० ते ४० सें. मी. उंचीवर तोडाव्यात. सर्वसाधारपणे २ ते ४ गिरिपुष्पाच्या झाडांची हिरवी पाने (अंदाजे ३० किलो) प्रति आर पुरेसे होते. त्याच झाडाच्या तोडलेल्या फांद्या चिखलणीपूर्वी ६ ते ८ दिवस अगोदर खाचरात पसराव्यात. चिखलणीवेळी पाने चिखलात व्यवस्थित मिसळतील असे पाहावे. त्यानंतर लागवड करावी. फायदे

  • भातरोपांना सेंद्रीय-नत्र हेक्टरी १० ते १५ किलो वेळेवर मिळतो. 
  • खाचरात सेंद्रीय पदार्थ मिसळली गेल्याने जमिनीची जडणघडण व उत्पादन क्षमता सुधारते.
  • भात खाचरांतून उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाण कमी होते.
  • गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब पळतात.
  • सूत्र ३ नियंत्रित पुर्नलागवड   सुधारित दोरीवर २५ सें. मी व १५ सें. मी आलटून पालटून (-२५-१५-२५-१५-सें. मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें. मी अंतरावर असलेल्या (प्रत्येक २ ते ३ रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरुन त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. खाचरात १५ बाय १५ सें. मी चुडांचे चौकोन व २५ सें. मी चालण्याचे रस्ते तयार होतात.  लावणी करताना प्रत्येक चुडात २ ते ३ रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे. रोपे सरळ व उथळ (२ ते ४ सें. मी. खोलीवर) लावावतीत फायदे 

  • प्रचलित पद्धतीपेक्षा बियाणांची ३०% बचत होते. श्रम व खर्च वाचतो.
  • पुनर्लागवड व कापणी यावरील मजूरीचा खर्चही कमी होतो. 
  • खताच्या गोळ्यांचा कार्यक्षम वापर करता येतो.
  • सूत्र ४ नियंत्रित पुर्नलागवडीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची  (यूरिया-डीएपी ६०:४० मिश्रण) १ ब्रिकेट (खताची गोळी) हाताने ७-१० सें. मी. खोल खोचावी.एका आर क्षेत्रासाठी ६२५ ब्रिकेटस (१.७५ किलो) पुरतात. यातून प्रती हेक्टरी ५७ कि. ग्रॅ. नत्र + २९ कि.ग्रॅ. स्फुरद इतकी उपलब्धता होते. फायदे 

  • पाण्याबरोबर नत्र व स्फुरदयुक्त खत वाहून जात नाही. खतामूळे होणारे प्रदुषण टळते. 
  • दिलेल्या खतापैकी ८०% पर्यंत नत्र भातपिकास उपयोगी पडते. खतात ४०% पर्यंत बचत होते.
  • ब्रिकेटस खोल खोचल्यामुळे अन्नद्रव्ये तणाला मिळत नाहीत. तणाचा त्रास कमी होतो. 
  • चारसूत्री पद्धतीचा वापर केल्यास खर्च कमी होऊन भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) निश्चित वाढते.   : डॉ. नरेंद्र काशिद, ९४२२८५१५०५,
  • (कृषी संशोधन केंद्र,  वडगांव (मावळ), जि. पुणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com