agriculture stories in Marathi Start-Up’s Low-Cost Hydroponic Innovation “Kambala” address Green Fodder Crisis | Agrowon

चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स तंत्र ः कंबाला

वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन बेंगळूरू येथील हायड्रोग्रीन या स्टार्टअप कंपनीने हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर आधारीत कंबाला हे उत्पादन विकसित केले आहे.

अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन बेंगळूरू येथील हायड्रोग्रीन या स्टार्टअप कंपनीने हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर आधारीत कंबाला हे उत्पादन विकसित केले आहे.

कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि ओडिशा येथील लहान आणि मध्यम पशुपालकांशी विविध कारणाने संवाद साधताना त्यांच्या अनेक अडचणी वसंतकुमार यांना समजल्या. त्यात सर्वांत महत्त्वाची होती, ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची उपलब्धता करणे. कारण बहुतांश शेतकऱ्यांकडे शेती क्षेत्र कमी असून, बदलते वातावरण, सातत्याने येणारे दुष्काळ आणि आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी वसंतकुमार यांनी काम सुरू केले. मातीविरहित शेतीच्या ( हायड्रोपोनिक्स) अनेक मजली पद्धती यासाठी उपयुक्त ठरेल, असे वसंतकुमार यांना वाटले. लहान, मध्यम आणि मोठ्या पशुपालकांच्या गरजा लक्षात घेत त्याची विविध मॉडेल्स तयार केली. या प्रवासामध्ये २०१९ मध्ये भागीदार जीवन एम. यांच्यासह त्यांनी हायड्रोग्रीन ही कंपनी स्थापन केली. या उत्पादनाचे पेटंट घेतले.

असे आहे कंबाला यंत्र
एखाद्या मोठ्या रेफ्रिजरेटरप्रमाणे कंबालाची रचना असून, ३ फूट रुंदी बाय ४ फूट लांबी आणि उंची सुमारे ७ फूट इतकी आहे. प्रत्येक दिवसासाठी एक या प्रमाणे सात रॅक लावले आहेत. प्रत्येक रॅकवर चार ट्रे ठेवले असून, त्यात ७०० ग्रॅम मक्याचे बियाणे प्रत्येक दिवशी लावले जातात. मक्यासह गहू किंवा बार्ली यांचे बियाणेही वापरता येते. पुढील काही दिवसातच बियाणे अंकुरीत होऊन त्यातून ताजा हिरवा चारा उपलब्ध होतो. हे रॅक १४ मायक्रोस्प्रिंकलरच्या साह्याने एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार त्यांना पाणी देणे सोपे होते.

  • कंबाला यंत्राभोवती काळ्या रंगाचे नेट आच्छादन केले आहे. त्यामुळे आतील रोपांचे बाह्य उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते. तसेच उत्तम हवा खेळती राहते. राजस्थानसारख्या अतिउष्ण प्रदेशामध्येही ही यंत्रणा उत्तम रितीने काम करते.
  • या कंबाला यंत्रामध्ये प्रति दिन २५ ते ३० किलो हिरवा चारा उपलब्ध होतो. आठवड्यामध्ये चार ते पाच गाईंना ते पुरेसे होते.
  • यासाठी या यंत्रामध्ये केवळ ७० ते १०० लिटर पाणी लागते. एवढ्याच पाण्यामध्ये पारंपरिक पद्धतीने केवळ एक किलो चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.

अत्यल्प ऊर्जेवर चालते यंत्र
कंबाला यंत्राची किंमत ३० हजार रुपये आहे. हे यंत्र अत्यल्प ऊर्जेवर चालते. विजेचा खर्च प्रति वर्ष केवळ ७० रुपये येतो.
मात्र, ज्या ठिकाणी अजिबात विजेची उपलब्धता नाही, अशा ठिकाणी वापरण्यासाठी या यंत्राची सौर ऊर्जेवर चालणारी नवी आवृत्ती वसंतकुमार यांनी तयार केली आहे. त्याची किंमत ४५ हजार रुपये आहे. या यंत्राचा प्रसार वेगाने होत आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जेवरील ४१ कंबाला यंत्रे उभारण्यात आली आहेत. तर राजस्थान, गुजरात, कर्नाटक येथील सुमारे १३० पशुपालकांकडे कंबाला उभारणी केली आहे.

प्रमाणीकरणासाठी संस्थेची घेतली मदत ः
हायड्रोग्रीन या कंपनीची स्थापना करण्यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये वसंतकुमार आणि जीवन एम. यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बेंगळूरू येथील राष्ट्रीय प्राणी पोषण आणि शरीरशास्त्र संस्थेमध्ये गाईंचे खाद्य आणि चारा व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण घेतले होते. ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘हायड्रोग्रीन्स अॅग्री सोल्यूशन्य प्रा. लि.’ या कंपनीशी संस्थेने ‘अॅग्रोइनोव्हेटिव्ह इंडिया’ अंतर्गत संशोधनासाठी सामंजस्य करार केला. या करारामध्ये या तंत्रामध्ये चाऱ्यांची पोषकता वाढवण्यासाठी बियांची घनता, सिंचनासाठी पाण्याचे प्रमाण, वाढीदरम्यान येणाऱ्या बुरशीचे योग्य पद्धतीने नियंत्रण पद्धती विकसित करण्यात आल्या. त्यामुळे या तंत्रातून उत्पादन वाढण्यासोबतच आर्थिक दृष्ट्या सक्षमता वाढण्यास मदत झाली.

उष्ण वातावरणात उत्तम चारा उत्पादन ः
राजस्थान येथील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते पुकराज जयपाल यांची अनुभव महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितले, की आमच्याकडे उष्ण वातावरणामध्ये बाह्य वातावरणात चाऱ्याची उपलब्धता होत नाही. अशा वातावरणात हे यंत्र कितपत चालेल, याविषयी आमच्या मनामध्ये शंका होत्या. मात्र, यंत्रातून कमी पाण्यामध्ये अनेक वेळ हिरवा चारा उपलब्ध झाला. हिरवा चारा आणि कोरडा चारा यांचे योग्य मिश्रण देणे शक्य झाल्याने गाईंच्या दूध उत्पादनामध्ये वाढ झाली.

सामुदायिक चारा केंद्राची उभारणी
हायड्रोग्रीन या कंपनीने कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये २५ सामुदायिक चारा निर्मिती केंद्रे उभारली आहेत. येथे स्थानिक कृषी ना नफा संस्थांनी लहान आकाराची व्यावसायिक चारा उपलब्धी यंत्रणा कंबाला यंत्राच्या साह्याने उभारलेल्या आहेत. त्यामध्ये गावातील पशुपालक व गावकरी येथून आपल्या जनावरांसाठी उच्च प्रथिनयुक्त चारा विकत घेऊन जातात. त्यांचा वेळ व खर्च वाचतो.

(स्रोत ः राष्ट्रीय प्राणी पोषकता आणि शरीरशास्त्र संस्था, बेंगळूरू)

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...