agriculture stories in Marathi startup readers connect, Thombre nursery | Agrowon

गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः ठोंबरे नर्सरी

सयाजी गायकवाड
रविवार, 9 ऑगस्ट 2020

प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक म्हणून ओळख मिळवलेल्या राजेंद्र ठोंबरे यांनी नर्सरीच्या माध्यमातून निरोगी आणि खात्रीशीर रोपांची निर्मिती सुरू केली.

प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक म्हणून ओळख मिळवलेल्या राजेंद्र ठोंबरे यांनी नर्सरीच्या माध्यमातून निरोगी आणि खात्रीशीर रोपांची निर्मिती सुरू केली. त्यातही सातत्याने गुणवत्ता जपल्याने विश्वासाचा ब्रॅण्ड म्हणून ठोंबरे नर्सरीची अल्पावधीतच ओळख निर्माण झाली आहे. खामगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील राजेंद्र ठोंबरे यांची प्रयोगशील शेतकरी ते नर्सरी उद्योजक ही वाटचाल प्रेरणादायी आहे.

बार्शी तालुक्यापासून अवघ्या १३ किलोमीटरवर असलेल्या खामगाव येथील राजेंद्र रावसाहेब ठोंबरे आणि संतोष रावसाहेब ठोंबरे या बंधूंनी सीताफळ लागवडीतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पुढे या विश्वासार्हतेवर नर्सरी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे. राजेंद्र पूर्णवेळ शेती करतात. तर संतोष हे ट्रॅक्टर व्यवसायात असून, त्यांच्याकडे कुबोटा या ट्रॅक्टरची सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याची डिलरशीप आहे. शेतीमध्ये सर्वाधिक रस असलेले दोन्ही बंधूच्या शेतीमध्ये आधुनिक पद्धती आणि नवतंत्रज्ञानाचा वापर हेच वैशिष्ट्य राहिलेले आहे. पूर्वी त्यांच्याकडे द्राक्षबाग होती. मात्र, द्राक्षशेतीतील वाढता उत्पादनखर्च आणि काही वर्षापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीठीने झालेले मोठे आर्थिक नुकसान यामुळे ते सीताफळ या काटक फळाकडे वळले. आता हेच पीक त्यांची ओळख बनले आहे.

२५ एकरवर सीताफळ लागवड

प्रतिकूल परिस्थितीत शेतीतील उत्पादन आणि उत्पन्नाचा मेळ घालण्यासाठी त्यांनी कमी पाण्यावरील सीताफळाचा विचार केला. २०१५ मध्ये प्रथम १० एकर क्षेत्रावर सुपरगोल्डन सीताफळाची लागवड केली. अवकाळी पावसातही कमी नुकसानकारक, पाण्याची जेमतेम गरज, उत्पादन खर्च कमी, निविष्ठांचा वापरही कमी, बाजारपेठ आणि दरही चांगला ही त्यामागील कारणे होत. सुदैवाने पुढील दोन वर्षात त्यांना
या सीताफळाने १८ लाखापेक्षाही अधिक उत्पादन दिले. प्रतिझाड ५ ते ६ किलो प्रमाणे दहा एकरातून सुमारे १५ टनापर्यंतचे उत्पादन मिळाले. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उत्पादनामुळे दर प्रती किलो १२५ ते १६० रुपयांपर्यंत मिळाला. अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देण्यास येऊ लागले. अनेकांनी सीताफळाच्या रोपांची मागणी केली. त्यातूनच सीताफळाची रोपे तयार करण्याचे ठरवले. त्याचवर्षी ‘ठोंबरे फार्म ॲण्ड नर्सरी’ हा उद्योग सुरू केला.

अवशेष मुक्त उत्पादनाला ‘क्युआर कोड’चा आधार

सीताफळ बागेमध्ये रासायनिक घटकांचा वापर टाळत अवशेष मुक्त (रेसिड्यु फ्री) उत्पादन घेतले. त्याचे प्रमाणीकरण करून घेतले. या दोन्ही गोष्टीचे स्वतंत्र मार्केटिंग केल्याने त्यांच्या सीताफळाला चांगली मागणी मिळू लागली. ग्राहकांना हे सीताफळ रेसिड्यु फ्री असल्याची खात्री पटावी, याकरिता सीताफळाच्या बॅाक्सवर ‘क्युआर कोड’ दिला. त्याद्वारे फार्मला मिळालेले ‘रेसिड्यु फ्री’ प्रमाणपत्र पाहता येते.

कुटुंबाची भक्कम साथ

राजेंद्र यांच्याकडे शेतीची प्रमुख जबाबदारी असली तरी संतोष यांचेही शेती न नर्सरी व्यवसायामध्ये तितकेच लक्ष असते. आई-वडील आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची शेतीकामात मदत होत असते. कुटुंबातील सर्वांची भक्कम साथ व सामुहिक प्रयत्नांमुळेच नर्सरी उद्योगामध्ये प्रगती झाल्याचे राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले.

ठोंबरे नर्सरीची ओळख सुपर गोल्डन

स्वतः सीताफळ बागेतील फळांची गुणवत्ता आणि दर्जा योग्य ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण खबरदारी घेतली जाते. ठोंबरे नर्सरीच्या माध्यमातून सीताफळाच्या सुपर गोल्डन सीताफळाचा ब्रॅण्ड तयार केला आहे. त्या माध्यमातून ते निरोगी आणि खात्रीशीर रोपांची विक्रीही करत आहेत. त्यासाठी स्वतःच्या शेतात तयार होणाऱ्या सुपर गोल्डन सीताफळाच्या मातृवृक्षापासून सीताफळाची कलमे ते भरतात. परिणामी रोपाची शुद्धता, गुणवत्ता आणि खात्रीशीरपणा जपला जातो.

परराज्यातही रोपांची विक्री

रोपाच्या निरोगी वाढीला ठोंबरे यांचे अधिक प्राधान्य असते. खरेदीदार शेतकऱ्यांना रोपांची शंभर टक्के खात्री दिली जाते. हा केवळ व्यवसाय म्हणून न पाहता व्रत असल्याचे मानतात. शेतकऱ्यांना केवळ रोपांची विक्री करून न थांबता त्यापलीकडेही सीताफळाची लागवड, पाणी आणि खत व्यवस्थापन या अनुषंगाने आवश्यक ती सर्व माहिती दिली जाते. त्यामुळेच खरेदीदार प्रत्येक शेतकऱ्याशी नर्सरीची वेगळी नाळ जोडली गेल्याचे ते सांगतात. त्यांच्याकडील गुणवत्तापूर्ण रोपे या विश्वासाच्या बळावरच आज केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या परराज्यातही पोचली आहेत. आज वर्षाकाठी सुमारे दहा लाखाहून अधिक सीताफळ रोपांची विक्री त्यांच्या नर्सरीतून होते.
ठोंबरे नर्सरी ही सीताफळासाठी नावलौकिक राखून असली तरी अन्य फळांची रोपेही तयार केली जाते. विशेषतः केसर आंबा, गोडचिंच, पेरू, चिक्कू, जांभूळ, लिंबू या फळपिकांची रोपेही त्यांच्याकडे खात्रीशीर मिळतात. या रोपांनाही शेतकऱ्यांकडून सातत्यपूर्ण मागणी असते.

ठोंबरे नर्सरीची वेबसाईट, फेसबुकपेज आणि युट्युबवरही

सीताफळाच्या खात्रीशीर रोपांच्या लौकिकाने ठोंबरे फार्म ॲण्ड नर्सरी हे नाव बार्शीसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचले आहे.
शेतकऱ्यांना रोपांच्या बुकींग करण्यासाठी फार्मवर येण्याची गरज नाही. त्यासाठी स्वतंत्र तीन वेबसाईट तयार केल्या आहेत. www.sitaphalnursery.com, www.thombarenursery.com आणि www.custardapplenursery.com या वेबसाईट जाऊन शेतकरी आपली मागणी नोंदवू शकतात. साधारण जानेवारी ते मे या पाच महिन्यात सर्वाधिक बुकींग या वेबसाईटवरुन होत असल्याचे राजेंद्र यांनी सांगितले. डिजिटल माध्यमामध्ये ठोंबरे फार्म आणि नर्सरीचे स्वतंत्र फेसबुकपेज असून, युट्यूबवरही नर्सरीसंदर्भातील अनेक व्हिडीओ व माहिती पाहण्यासाठी उपलब्ध केले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.

ट्रॅक्टर उद्योगातही भरारी

संतोष ठोंबरे यांच्याकडे कुबोटा या नामवंत ट्रॅक्टरची सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याची डिलरशीप आहे. शेतीबरोबरच शेतीशी संबंधित या उद्योगातही त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. ट्रॅक्टरची विक्री आणि विक्रीपश्चात सेवा या दोन्हींमध्ये कंपनीकडून त्यांना उत्कृष्ट सेवा देणारे विक्रेते म्हणून देशातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
 

आम्ही स्वतःच शेतकरी असून, आमच्याकडून रोपे नेणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबेही उन्नतीने, प्रगतीने बहरली पाहिजेत, हा आमचा हेतू आहे. नर्सरीतून केवळ रोपे तयार करणे आणि विकणे, यापेक्षाही रोपांची गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचा विश्वास याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. या वृत्तीमुळेच ठोंबरे नर्सरीची स्वतःची ओळख तयार झाली आहे.
- राजेंद्र ठोंबरे, ९६७३६०६३८७, ९१४६१८५९५९ ठोंबरे फार्म ॲण्ड नर्सरी, खामगाव


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...