agriculture stories in marathi Sugarcane management in flood | Agrowon

पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन 

डॉ. भरत रासकर, डॉ. सुभाष घोडके 
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि जमिनीचा प्रकार यावर उसाचे नुकसान अवलंबून असते. अन्नद्रव्ये तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने पाने आणि फुटव्यांची संख्या, मुळांची संख्या, बेटातील उसाची संख्या, कांड्यांची संख्या, उसाचे वजन, वाढ्याचे वजन आणि साखर उत्पादनातसुद्धा घट येऊ शकते. पुराचे पाणी कमी कालावधीसाठी शेतात थांबल्यास त्याचा जास्त परिणाम होत नाही. 

पूरस्थितीचा पीक वाढीवर परिणाम ः 
पूर परिस्थिती साधारणपणे जुलै ते ऑगस्ट या महिन्यात येते. या तिन्ही महिन्यात वेगवेगळ्या लागवड

पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि जमिनीचा प्रकार यावर उसाचे नुकसान अवलंबून असते. अन्नद्रव्ये तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने पाने आणि फुटव्यांची संख्या, मुळांची संख्या, बेटातील उसाची संख्या, कांड्यांची संख्या, उसाचे वजन, वाढ्याचे वजन आणि साखर उत्पादनातसुद्धा घट येऊ शकते. पुराचे पाणी कमी कालावधीसाठी शेतात थांबल्यास त्याचा जास्त परिणाम होत नाही. 

पूरस्थितीचा पीक वाढीवर परिणाम ः 
पूर परिस्थिती साधारणपणे जुलै ते ऑगस्ट या महिन्यात येते. या तिन्ही महिन्यात वेगवेगळ्या लागवड

हंगामातील ऊस व त्यांचे वय व वाढीच्या अवस्था ः 

लागवड हंगाम पिकाचे वय (महिने) वाढीच्या अवस्था 
सुरु ७-८ जोमदार वाढ 
पूर्वहंगाम ९-१० जोमदार वाढ 
आडसाली ११-१२ जोमदार वाढ 
खोडवा ७-९ जोमदार वाढ 

वरील तक्‍त्यावरुन असे दिसून येते की, वेगवेगळ्या हंगामातील ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. या वाढीच्या अवस्थेत पिकाला पुरेसा ओलावा, जमिनीत खेळती हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि प्रमाणात आर्द्रता असेल तर अन्नद्रव्यांचे शोषण चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे कर्बग्रहण क्रिया व्यवस्थित होऊन उसाच्या वजनात चांगल्या प्रकारे वाढ होते. अशा कांड्या वाढीच्या अवस्थेत उसाचे पीक दीर्घकाळासाठी पुराच्या पाणखाली गेल्यास नुकसान होते. 

पुरामुळे होणारे नुकसानीचे प्रकार ः 

अ) पूर्णपणे पीक पुराच्या पाण्यात १२ ते १५ दिवसांपर्यंत बुडाले असेल तर ः 
१. उसाच्या शेंड्यात तसेच पानावर गाळ मिश्रित ओल्या चिखलाचा थर बसल्याने शेंडा कुजून पाने वाळू लागतात त्यामुळे वाढ खुंटते. 
२. ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो. 
३. पाण्यात बुडालेल्या कांड्यांना मुळे फुटतात. 
४. उसाला पांगशा फुटु लागतात. 
५. पांगश्‍या फुटलेल्या उसामध्ये दशी (पोकळा) होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे उत्पादनात २० टक्‍क्‍यांपासून १०० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. 

ब) उसाचे शेंडे (वाढे) पुराच्या पाण्याच्या वर असल्यास 

नदीबुड क्षेत्रातील उसाच्या कांड्या पुराच्या पाण्यात आणि उसाचे शेंडे (वाढे) पुराच्या पाण्याच्या वर असले तरी ऊस उत्पादनात २० ते ३० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. अशा परिस्थितीत पिकाची स्थिती खालीलप्रमाणे दिसून येते. 
१) उसाची खालील पाने पाण्यात जास्त दिवस राहिल्यामुळे पानावर तसेच कांडीवर ओल्या मातीचा थर साचून उसाची पाने वाळून जातात. 
२) कांडीवरील पानांच्या टोपणमध्ये गाळाची माती बसते, त्यामुळे कांड्यावरती मुळे फुटतात. तसेच, अशावेळी कांडीवरील डोळे फुगीर होवून पांगशा फुटण्यास सुरवात होते. त्यामुळे उस उत्पादनात घट येते, तसेच उसाची प्रत बिघडते. 
३. ऊस क्षेत्रात जास्त दिवस पाणी राहिल्याने जमिनीतील हवा आणि पाणी यांचा समतोल बिघडतो. पर्यायाने उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी होते. जमिनीमध्ये असणारी अन्नद्रव्ये पुराच्या पाणवाटे वाहून जातात. 
४. पूरबुडीत क्षेत्रातील उसाचे पीक लोळण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे उत्पादनात घट येते. 

उपाययोजना ः 
१. पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी पूर ओसरल्यावर त्वरीत काढून टाकावे. 
२. नुकसान झालेल्या उसाचा शक्‍य असल्यास त्याचा खोडवा राखावा. खोडवा ठेवताना बुडख्यावर १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

उसाचे शेंडे पाण्याच्या बाहेर असल्यास उत्पादनात येणारी घट कमी करण्यासाठी उपाययोजना ः 
१. वाफसा येताच उसाचे सरीमध्ये साठून राहिलेले पाणी छोटेसे चर काढून शेताबाहेर काढावे. 
२. उसाची खालील वाळलेली कुजलेली पाने काढून टाकून मोकळी हवा खेळती ठेवावी. 
३. पूरबुडीत क्षेत्रातील ऊस अस्ताव्यस्त पडलेले असतील तर ते उभे करून एकमेकास बांधून घ्यावेत, 
जेणेकरून उसाच्या कांड्या जमिनीला चिकटून कांड्यावर मुळ्या अथवा डोळे फुटणार नाहीत. 
४. पुरबुडी क्षेत्रात लहान उसाचे शेंडे (वाढे) कुजले अथवा वाळले असतील तर, असे वाळलेले / कुजलेले ऊस 
जमिनीलगत छाटून शेताबाहेर नष्ट करावेत. 
५. पूरबुडीत क्षेत्रातील ऊस वाढीच्या अवस्थेनुसार रासायनिक तसेच जैविक खतांचा वापर करावा. 
६. पूरबुडीत क्षेत्रामध्ये सुरु लागवड झालेल्या (डिसेंबर /जानेवारी / फेब्रुवारी) क्षेत्रासाठी 
शिफारशीच्या २५ टक्के नत्र, स्फुरद व पालाश ही रासायनिक खते जमीन वापश्‍यावर असताना सरीमधून 
द्यावीत. म्हणजे उसाची वाढ चांगली होऊन उत्पादनात होणरी घट कमी करता येईल. 
७. पूरबुडीत क्षेत्रातील एकरी १० किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतामधून द्यावे. 

संपर्क ः डॉ. सुभाष घोडके, ९४०५४१८२०४ 
( मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...