मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
तेलबिया पिके
सूर्यफूल लागवड नियोजन
मंगळवार, 9 जून 2020
सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि बांध जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
- जमीन : सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि बांध जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
- पूर्वमशागत : जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.
- वाणांची निवड : सुधारित जाती: फुले भास्कर, एस एस-५६, मॉर्डेन, ई सी-६८४१४, भानू
- संकरित वाण : के बी एस एच-१, एल एस एफ एच-१७१, एल एस एफ एच-३५, एल एस एफ एच -४४, फुले रविराज, एम एस एफ एच-१७
- पेरणीची वेळ : जुलै पहिला पंधरवडा.
- बीजप्रक्रिया : केवडा रोग टाळण्यासाठी अॅप्रॉन (३५ एस.डी.) ६ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच विषाणूजन्य (नेक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड (बीजप्रक्रियेसाठीचे फॉर्म्युलेशन) ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
- खतमात्रा : कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ६० किलो स्फुरद + ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खातात मिसळून द्यावे.
संपर्क ः ०२४२६ -२४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
इतर तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड...भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
उन्हाळी भुईमूगाचे लागवड तंत्रउन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि...
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापनसध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा...
करडईची सुधारित लागवड करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
खत, पाणी व्यवस्थापनातून वाढवा करडई...योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन, विरळणी आणि...
सुधारित जवस वाणांची लागवड कराजवसाच्या सुधारित वाणाची निवड केल्यास...
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन...गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक...
सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रणसद्य परिस्थितीत सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असून...
सोयाबीन पिकांवरील किडींचे एकात्मिक...सोयाबीन पिकात ९० ते ११० दिवसात येणाऱ्या ...
सोयाबीन पाने पिवळी पडण्याचे कारण जाणून...यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस...
तीळ लागवड तंत्रतीळ हे भारतातील सर्वांत जुने तेलबिया पीक आहे....
सोयाबीन लागवडीतील समस्यावरील उपाययोजनासोयाबीनचे योग्य वाण निवडताना...
सध्या बाजारात...
सूर्यफूल लागवड नियोजन
जमीन : सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
रुंद वरंबा सरी पद्धती भुईमुगासाठी आहे...भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
- 1 of 4
- ››