agriculture stories in Marathi sweet onion | Agrowon

न रडवणारा गोड कांदा!

वृत्तसेवा
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

तीन दशकाच्या अथक संशोधन आणि प्रयत्नानंतर न रडवणारा, गोड कांदा सुनिऑन्स कंपनीने विकसित केला आहे. कांद्याची लागवडीपासून काढणीपर्यंत प्रत्येक प्रक्रियेवर कंपनीचे लक्ष असते.

कांदा हा नेहमीच कोणाला न कोणाला रडवतोच... एकतर कांदा चिरणाऱ्या व्यक्ती किंवा शेतकऱ्यांना. ही झाली सामान्य स्थिती. पण न रडवणारा कांदा तयार असल्याचे सांगितल्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. अमेरिकेतील सुनिऑन्स या कंपनीने गोड कांद्याची जात विकसित केली आहे. त्यांची टॅगलाईनही सुंदर आहे - ‘कांद्यावर खर्चू नका तुमचे अश्रू, तुमच्यासाठीच जपून ठेवा!’

कांद्याच्या या जातीविषयी माहिती देताना कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक जेफ बोईट्टगे म्हणाले, की
तीन दशकाच्या अथक संशोधन आणि प्रयत्नानंतर न रडवणारा, गोड कांदा सुनिऑन्स कंपनीने विकसित केला आहे. कांद्याची लागवडीपासून काढणीपर्यंत प्रत्येक प्रक्रियेवर कंपनीचे लक्ष असते. सध्या केवळ कंपनीच्या नेवाडा आणि वॉशिंग्टन येथील प्रक्षेत्रामध्ये या कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

कांद्याची वैशिष्ट्ये ः
१) कांदा चिरताना अजिबात अश्रू येत नाहीत. याच्या चाचण्या बायर सेन्सर लॅब आणि ओहिओ राज्य विद्यापीठातील प्रयोगशाळांमध्ये घेण्यात आल्या आहेत.
२) या कांद्याला विशिष्ट गोडी आहे. ती प्रत्येक कांद्यामध्ये सारख्याच प्रमाणात असल्याचा दावा कंपनी करते.
३) या कांद्याला एक कुरकुरीतपणा आहे, त्यामुळे खाद्य पदार्थांमध्ये शिजवून वापरण्यासोबतच कच्चा सॅलड म्हणूनही सहज खाता येतो.
४) या कांद्याची गोडी साठवणीमध्ये वाढत जाते. अन्य कांदे ज्या वेळी खराब होतात, विशेषतः त्यांच्या चवीमध्ये तिखटपणा वाढत जातो. कापतेवेळी डोळ्यातून पाणी काढतो. त्यावेळी या कांद्याची गोडी अधिक असते.

का रडवतो आपल्याला कांदा?
कांद्यातील काही त्वरित हवेत मिसळणारे घटक कापल्यानंतर हवेत पसरतात. त्यामुळे सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यात पाणी येते. कांद्यातील ही संयुगे जातीनुसार कमी अधिक प्रमाणात असतात. साठवणीमध्ये कांद्यातील त्यांचे प्रमाण वाढत जात असल्याचा अनुभव आहे. मात्र, सुनिऑन्स कंपनीच्या कांद्यामध्ये साठवणीमध्ये कांदा अधिक गोड व न रडवणारा सौम्य होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पूर्वी गोड पदार्थामध्ये किंवा सोबत कांदा वापरता येत नव्हता. आता तो वापरता येईल, असेही सांगितले जाते.

कांदा उत्पादक ः
नुकत्याच पेरी ॲण्ड सन्स आणि ओनियन्स ५२ या कांदा उत्पादक कंपन्यांनी या कांद्याचे उत्पादन घेतले आहे. हा कांदा सध्या काढण्याच्या स्थितीमध्ये आहे. या कांद्याने योग्य पक्वता गाठल्यानंतरही काही काळासाठी कांदा तसाच जमिनीमध्ये ठेवला जातो. या क्युरींग प्रक्रियेमुळे कांद्याला एक विशिष्ट चव येत असल्याचे सुनिऑन्स कंपनीच्या वतीने सांगितले जाते. काढणीची नक्की स्थिती जाणण्यासाठी तीन स्तरीय प्रक्रिया पार पाडली जाते. १३ ते १५ ऑक्टोबर या काळामध्ये या कांदा उत्पादक कंपन्याचा कांदा ‘पीएमए व्हर्च्यूअल फ्रेश समिट’ या ऑनलाइन कार्यक्रमामध्ये सादर करण्यात येणार आहे. या वर्षी कंपनीच्या कांद्याची उपलब्धता डिसेंबरच्या मध्यावधीमध्ये सुरू होईल. ती साधारणपणे मार्च एप्रिलपासून सुरळीतपणे सुरू होईल.


इतर टेक्नोवन
महिलांसाठी शेतीपयोगी अवजारेसुधारीत अवजारांचा वापर केल्याने शेतीच्या...
पिकातील सूर्यप्रकाशाची प्रत मोजणारी...आपल्याकडेही हरितगृह, शेडनेटगृहातील लागवड वेगाने...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
संरक्षित व नियंत्रित शेतीचे तंत्रज्ञानकृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण...
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनीवनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये...
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे...कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र...
वेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी...द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे...
कृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा...वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (...
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणेशेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध...
न रडवणारा गोड कांदा!कांदा हा नेहमीच कोणाला न कोणाला रडवतोच... एकतर...
संपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला...वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने...
निर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, ...जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला...
तापमान, वारे, सापेक्ष आर्द्रता...पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (...
सीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...