agriculture stories in marathi Sweet potato uses a single odor to warn its neighbors of insect attack | Agrowon

रताळे वनस्पती गंधाद्वारे देते अन्य रोपांना इशारा

वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

एखाद्या हल्ल्याची चाहूल लागल्यास बहुतांश सजीव आपल्या कळपाला किंवा शेजाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने जागे करतात. अशीच स्थिती रताळे पिकांमध्येही दिसून येते. ही वनस्पती हवेमध्ये त्वरित मिसळून जाणाऱ्या संयुगांद्वारे स्वतःमध्ये प्रतिकार घटकांची निर्मिती करतानाच शेजारच्या रताळे रोपालाही सूचना देण्याचे काम करत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे ही प्रतिक्रिया काही विशिष्ट रताळ्यांमध्येच दिसून येते. या विशिष्ट रताळ्यांतील घटकांचा अभ्यास करून भविष्यामध्ये कीडरोधक जातींची पैदास करणे शक्य होणार आहे.

एखाद्या हल्ल्याची चाहूल लागल्यास बहुतांश सजीव आपल्या कळपाला किंवा शेजाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने जागे करतात. अशीच स्थिती रताळे पिकांमध्येही दिसून येते. ही वनस्पती हवेमध्ये त्वरित मिसळून जाणाऱ्या संयुगांद्वारे स्वतःमध्ये प्रतिकार घटकांची निर्मिती करतानाच शेजारच्या रताळे रोपालाही सूचना देण्याचे काम करत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे ही प्रतिक्रिया काही विशिष्ट रताळ्यांमध्येच दिसून येते. या विशिष्ट रताळ्यांतील घटकांचा अभ्यास करून भविष्यामध्ये कीडरोधक जातींची पैदास करणे शक्य होणार आहे. हे संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्टस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

रताळे (शा. नाव - Ipomoea batatas) हे कंदपीक उपवासाचे पदार्थ, सूप, चिप्स आणि अन्य उत्पादनासाठी लोकप्रिय होत आहे. अर्थात, त्याची यामध्ये आधीच लोकप्रिय असलेल्या बटाटा या पिकांशी स्पर्धा होत आहे. आशियाई देशामध्ये पोषक घटकांचा स्रोत म्हणूनही त्याची मोठी उपयुक्तता आहे. त्याच्या अनेक जाती लागवडीखाली असून, समान स्थितीमध्ये उत्पादनामध्ये मोठा फरक पडताना दिसतो. त्यात ताईनोंग ५७ सारख्या जातींमध्ये ताईनोंग ६६ सारख्या अन्य जातींच्या तुलनेमध्ये किडीच्या हल्ल्याबाबत अधिक प्रतिकारकता असल्याचे दिसून येते. यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न जेना (जर्मनी) येथील मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्यूट फॉर केमिकल इकॉलॉजी व नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी केला आहे. त्यांनी या जातींमध्ये किडींच्या हल्ल्यानंतर तयार होणाऱ्या एका संप्लवनशील संयुग (गंध) शोधला आहे.

असे झाले संशोधन

  • जेव्हा रताळ्याच्या ताईनोंग ५७ या जातीवर पाने खाणाऱ्या किडीचा हल्ला होतो, त्या वेळी नेमके काय होते, याचा शोध घेण्यात आला. पानांना झालेल्या जखमेमध्ये विशिष्ट संप्रेरक तयार होते. ते संरक्षणाच्या यंत्रणेला कार्यान्वित करण्याचे काम करते. या वनस्पती विशिष्ट गंध प्रसारित करतात. त्यातील संयुगाचे नाव स्पोरामीन असून, ते किडीच्या पाचक विकरांना रोखण्याचे काम करते. परिणामी किडीची भूक संपूर्णपणे नष्ट होते. काही वेळेला कंदामध्ये स्पोरामीन हे लक्षणीयरीत्या वाढलेले आढळते. या गंधामध्ये DMNT हा एक घटक असून, तो प्रतिकारकतेसाठी कारणीभूत असतो. या घटकांमुळेच खाण्यापूर्वी रताळी ही शक्यतो शिजवून घेतली पाहिजेत.
  • DMNT हा टर्पेन संयुग असून, त्याचा वास हा बाम किंवा औषधांसारखा असतो. या घटकांमुळे संरक्षण प्रथिनांचा निर्मितीला चालना मिळते. केवळ एका रताळे रोपामध्ये नव्हे, तर शेजारच्या अन्य रोपांमध्येही संरक्षण प्रथिनांची निर्मिती सुरू होत असल्याचे संशोधिका अंजा मिन्ट व संशोधन प्रमुख अॅक्सेल मिथोफेर यांनी सांगितले.
  • तुलनेमध्ये अन्य जात ताईनोंग ६६ मध्ये DMNT चे प्रमाण अत्यंत कमी असते. परिणामी ही जात पाने खाणाऱ्या किडीच्या हल्ल्यासाठी संवेदनशील ठरते.
  • या कीडरोधकतेसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या DMNT निर्मितीमागील यंत्रणेचा शोध घेतला जात असून, त्यातून भविष्यामध्ये नव्या अधिक प्रतिकारक जातींचा विकास सोपा होऊ शकतो. परिणामी कीडनाशकांच्या फवारण्या कमी करणे शक्य होईल.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...