फ्लॉवर पिकातील विकृतीची लक्षणे

फ्लॉवर पिकामध्ये विविध कारणांमध्ये शारीरीक विकृती दिसून येतात. त्यासाठी उपाययोजना करावा.
 फ्लॉवर पिकातील विकृतीची लक्षणे
फ्लॉवर पिकातील विकृतीची लक्षणे

व्हीप टेल  या विकृतीमध्ये फुलकोबीच्या पानाची नेहमीसारखी वाढ न होता पाने अरुंद आणि खुरटलेली दिसतात. पान चाबकाच्या (व्हीप टेल ) टोकासारखे लांब वाढलेले दिसते. झाडाचा शेंडा खुरटलेला राहतो आणि गड्डा भरत नाही. मॉलिब्डेनम ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती दिसून येते. ज्या जमिनीचा सामू ४.५ पेक्षा कमी असतो, अशा जमिनीत मॉलिब्डेनमची उपलब्धता होण्यात अडचणी येतात. परिणामी अशा ठिकाणी ही विकृती दिसून येते. उपाय 

  • लागवडीपूर्वी माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. 
  • जमिनीची आम्लता ४.५ टक्क्यापेक्षा कमी असल्यास जमिनीमध्ये चुना मिसळून जमिनीची आम्लता कमी करता येते. त्याने ही विकृती कमी होते. 
  • अमोनियम किंवा सोडियम मॉलिब्डेट १.२ किलो प्रती हेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळल्यास ही विकृती टाळता येते. 
  • गरजेनुसार मॉलिब्डेनम ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारणीद्वारे वापर   करावा. (प्रमाण ः  अमोनियम किंवा सोडियम मॉलिब्डेट ०.२५ ग्रॅम प्रती लीटर)
  • गड्डा कुजणे (ब्राऊन रॉट)  बोरॉन ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती आढळून येते. फुलकोबीचा गड्डा धरू लागेपर्यंत सहसा हा दोष दिसून येत नाही.  गड्डे धरण्यास सुरुवात झाल्यावर खोड आणि गड्ड्यावर भुरकट डाग दिसतात. त्यातून पाणी बाहेर येते. गड्ड्याचा दांडा पोकळ आणि काळपट पडून कुजू लागतो. संपूर्ण गड्ड्यावर भुरकट काळे, कुजकट डाग दिसतात. म्हणून ह्या विकृतीला गड्डा  कुजणे (ब्राऊन रॉट) ही विकृती म्हणतात. बाजारात अशा गड्ड्यांना अजिबात मागणी नसते. उपाय 

  • एकाच जमिनीत सतत कोबीवर्गीय पिके घेतल्यास ही विकृती वाढते. मूग, उडीद, हरभरा, वाटाणा यासारखी कडधान्याची पिके फेरपालट म्हणून घ्यावीत. 
  • बोरॉनची कमतरता असलेल्या जमिनीत बोरॅक्स पावडर हेक्टरी २० किलो या प्रमाणात मिसळून घ्यावी. 
  • फवारणीद्वारे बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा. (प्रमाण ः  ०.५ ते १ ग्रॅम प्रती लीटर)
  • अशाप्रकारे फुलकोबी पिकातील शारीरिक विकृती वेळीच ओळखून त्यावर योग्य प्रकारे उपाययोजना करावी. फुलकोबीचे दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.    
  • : योगेश भगुरे, ९९२२४१४८७३ (उद्यानविद्या विभाग, के. डी. एस. पी. कृषी महाविद्यालय, नाशिक.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com