agriculture stories in marathi Technowon, Animal driven implements | Agrowon

बैलचलित अवजारे ठरताहेत फायदेशीर

प्रा. एस. एन. सोलंकी, ए. ए. वाघमारे, प्रा. डी. डी. टेकाळे
बुधवार, 8 जानेवारी 2020

शेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी, आंतरमशागत आणि बैलगाडीच्या साह्याने वाहतुकीसाठी होतो. शेतीमध्ये बैलचलित सुधारित अवजारे वापरल्यामुळे बैलाला वर्षभर काम मिळते. तसेच मशागत, पेरणीच्या खर्चात बचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बैल सांभाळणे सुलभ होणार आहे. 

लहान व मध्यम आणि व डोंगराळ भागातील 
 शेतकऱ्यांसाठी बैलशक्तीवर चालणाऱ्या अवजारांचा वापर अजूनही होतो. विदर्भ व मराठवाड्यामध्ये आंतरपीक पद्धतीने लागवड करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी बैलशक्ती हे शेतीसाठी अविभाज्य अंग आहे. 

बैलचलित तीन पासेचे फणासहीत कोळपे

शेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी, आंतरमशागत आणि बैलगाडीच्या साह्याने वाहतुकीसाठी होतो. शेतीमध्ये बैलचलित सुधारित अवजारे वापरल्यामुळे बैलाला वर्षभर काम मिळते. तसेच मशागत, पेरणीच्या खर्चात बचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बैल सांभाळणे सुलभ होणार आहे. 

लहान व मध्यम आणि व डोंगराळ भागातील 
 शेतकऱ्यांसाठी बैलशक्तीवर चालणाऱ्या अवजारांचा वापर अजूनही होतो. विदर्भ व मराठवाड्यामध्ये आंतरपीक पद्धतीने लागवड करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी बैलशक्ती हे शेतीसाठी अविभाज्य अंग आहे. 

बैलचलित तीन पासेचे फणासहीत कोळपे

सध्या शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने बीबीएफ यंत्राने रूंद वरंबा आणि सरी पध्दतीने पेरणी करत आहेत. परंतू रूंद वरंबा पध्दतीने पेरलेल्या पिकामध्ये आंतरमशागतीसाठी पारंपरिक कोळपे वापरता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुरपणी करावी लागते किंवा तणनाशकाची फवारणी करावी लागते. यामुळे खर्च वाढतो. हे लक्षात घेऊन बैलचलित तीन पासेचे फणासहित कोळपे विकसित करण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये ः

 • अवजाराची लांबी १८० 
 • सेंमी, उंची ३० ते ४५ सेंमीपर्यंत करता येते. त्यावर २२.५ ते ३० सेंमी रुंदीच्या पास बसवता येतात.
 • दोन्ही बाजूस फण बसविले असल्यामुळे सरीमधील आंतरमशागत करता येते.
 • कोळप्याच्या साह्याने एका दिवसात २.५ ते ३ एकर क्षेत्राची कोळपणी करता येते. 
 • पारंपरिक पद्धतीच्या कोळपणीच्या तुलनेत खर्च आणि वेळेमध्ये ४० ते ५० टक्के बचत होते. 
 • किंमत : सुमारे ६,००० रुपये 
शेतावरील घेतलेल्या चाचणीचे निष्कर्ष 
 तपशिल विवरण 
काम करण्याची रुंदी १८०  सेंमी
कोळपणीची खोली  ५  सेंमी
कामाचा वेग  (प्रतितास) २.२५ ते २.५० 
ओढशक्ती  ५८ किलो
कार्यक्षमता (हेक्टर प्रतितास) ०.२० 
आवश्यक मजूर (प्रतिहेक्टरी) १ 
एकूण खर्च (रुपये प्रतिहेक्टर) १००० ते १२०० 

बैलचलित धसकटे गोळा करण्याचे अवजार 

धसकटे गोळा करण्यासाठी प्रति हेक्टरी साधारणपणे १५ ते २० स्त्री मजूर लागतात त्यामुळे खर्च वाढतो. हे लक्षात घेऊन बैलचलित धसकटे गोळा करण्याचे अवजार तयार केले आहे. 

 • धसकटे गोळा करण्याचे अवजार बैलचलित असून, ते १.६५ मीटर रुंद व ३० सेंमी उंच लोखंडी फ्रेममध्ये बनविलेले आहे. त्यास १२ मिमी जाडीचा सळईमध्ये ७.५ सेंमी 
 • अंतरावर टोकदार दात बनविलेले आहेत. 
 • जमीन व धसकटाच्या प्रकारानुसार अवजारावर उभे राहून किंवा उभे न राहता चालवता येते. त्यासाठी अवजारांवर लाकडी फळ्या बसविलेल्या आहेत. 
 • अवजाराच्या साह्याने धसकटे 
 • गोळा करत असताना ढेकळे फुटून जमीन भुसभुशीत व समपातळीत करता येते. 
 • अवजाराच्या साह्याने बैलास काम करण्याकरिता ४७ किग्रॅ ओढशक्ती लागते. 
 • धसकटे गोळा करण्याच्या अवजाराच्या साह्याने एक दिवसात अंदाजे २.५ ते ३ एकर क्षेत्रावरील धसकटे गोळा करता येतात. 
 • किंमत ः २२०० ते २५०० रुपये 
शेतावर घेतलेल्या चाचणीचे निष्कर्ष 
 तपशील  विवरण 
कामाची खोली (सेंमी) ५.५ ते ७.५० 
कामाचा वेग (किमी/प्रतितास) २.९५ ते ३ 
ओढशक्ती (किग्रॅ)  ४६.५ ते ४८ 
मजूर (तास प्रतिहेक्टर)   ३ ते ५ 
एकूण खर्च (रुपये/हेक्टर)  ११०० ते १२००

बैलगाडी, आंतरमशागतीसाठी सुधारित जू 

शेतकरी बैलगाडी, वखरणी व आंतरमशागतीसाठी वेगवेगळ्या आकाराचे, लांबीचे व जास्त वजनाचे जू वापरतात. त्यामुळे बैलांच्या मानेला जखमा होऊन त्रास होतो, बैलाला ओढशक्ती जास्त लागते, त्याची काम करण्याची क्षमता व वेग कमी होतो. हे लक्षात घेऊन बैलगाडी, वखर व आंतरमशागतीसाठी लाकडापासून जू तयार केलेला आहे.

वैशिष्ट्ये 

 • बैलाच्या मानेवर व्यवस्थित बसण्यासाठी जू ला अर्धवर्तुळाकार दिला आहे. त्यामुळे बैलास ओढशक्ती कमी लागते. 
 • वखरणीसाठी जू ची लांबी १५८ सेंमी व रुंदी १०.८ सेंमी व जाडी ८ सेंमी आहे. वजन ९ किलो आहे. 
 • बैलगाडी जू ची लांबी १७८ सेंमी, रुंदी १४.५ सेंमी व जाडी ९ सेंमी असून, वजन १० किलो आहे. 
 • आंतरमशागतीच्या जू ची लांबी १८८ सेंमी, रुंदी १२.३ सेंमी असून त्याचे वजन ११ किलो आहे. 
 • या जू मुळे बैलांची कार्यक्षमता १५ ते २० टक्के वाढते. १० ते १५ टक्के ओढशक्ती कमी लागल्याचे आढळून आले. 
 • किंमत ः  बैलगाडी व वखरणी जू ः २५०० रुपये, आंतरमशागत जू ः  ३००० रुपये

  (अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प, कृषी क्षेत्रात पशु शक्तीचा योग्य वापर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
   


इतर टेक्नोवन
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...
कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेकांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या,...
दुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला...बीड : शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या सचिन...
हवामान अनुकूल रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानबदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
पशुआहारातील घटकांची तपासणी महत्वाचीआपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
आंतरमशागतीसाठी अवजारे ठरतात फायदेशीरतण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,...
नारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी...
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...